Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Arshdeep Singh Engagement : अर्शदीप सिंगच्या आयुष्यात नवी इनिंग! अभिनेत्री समरीन कौरसोबत उरकला साखरपुडा

Arshdeep Singh Engagement : भारतीय क्रिकेटपटू अर्शदीप सिंगने अभिनेत्री समरीन कौरसोबत न्यूझीलंडमध्ये साखरपुडा केला. समरीनने इन्स्टाग्रामवर खास फोटो शेअर करत आनंदाची बातमी दिली.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 11, 2026 | 06:31 PM
Arshdeep Singh Engagement : अर्शदीप सिंगच्या आयुष्यात नवी इनिंग! अभिनेत्री समरीन कौरसोबत उरकला साखरपुडा

Arshdeep Singh Engagement : अर्शदीप सिंगच्या आयुष्यात नवी इनिंग! अभिनेत्री समरीन कौरसोबत उरकला साखरपुडा

Follow Us
Follow Us:
  •  वेगवान गोलंदाज अर्शदीपची नवी इनिंग
  • समरीन कौरने इन्स्ट्राग्रामवर शेअर केले फोटो
  • न्यूझीलंडमध्ये पार पडला साखरपूडा
 

Arshdeep Singh Engagement : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याच्या आयुष्यात एका नव्या प्रवासाची सुरुवात झाली आहे. अर्शदीपने अभिनेत्री समरीन कौर हिच्यासोबत साखरपुडा केला आहे. दोघांनी सोशल मीडियावर खास फोटो शेअर करत आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केली. न्यूझीलंडमध्ये हा साखरपुडा पार पडला असून, त्यांच्या या आनंदाच्या बातमीने चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

अर्शदीप आणि समरीन गेल्या काही काळापासून एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होती. मात्र, आता दोघांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब केले आहे. समरीन कौर हिने इन्स्टाग्रामवर साखरपुड्याचे खास क्षण टिपणारे फोटो शेअर केले आहेत. यातील एका छायाचित्रात अर्शदीप गुडघ्यावर बसून समरीनला प्रपोज करताना दिसत आहे.

समरीनची भावणिक पोस्ट

या फोटोंसोबत समरीनने भावनिक संदेशही लिहिला आहे. ‘आयुष्याने आपल्याला अनेक गोष्टी दिल्या असतील; पण एकमेकांची साथ मिळणे ही सर्वांत आनंदाची गोष्ट आहे. आयुष्यभर एकत्र राहण्यासाठी…’ अशा आशयाची भावना तिने व्यक्त केली आहे. तसेच 11 नोव्हेंबर 2026 हा दिवस त्यांच्या आयुष्यातील खास दिवस असल्याचेही या पोस्टमधून स्पष्ट झाले आहे.

ICC Top 10 Test Ranking : अफगाणिस्तानचा इतिहास घडला! रहमत शाह यांची आयसीसी टेस्ट रँकिंगच्या टॉप-10 मध्ये एंट्री

न्यूझीलंड दौऱ्यातच साखरपुड्याचा खास क्षण

सध्या अर्शदीप सिंग भारतीय संघासोबत न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या वनडे मालिकेत तो खेळत आहे. समरीन कौरही त्याच्यासोबत न्यूझीलंडमध्ये असल्याचे समोर आले आहे. या दौऱ्यादरम्यानच दोघांनी साखरपुडा करत नव्या आयुष्याची सुरुवात केली. मालिकेतील 13 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या चौथ्या वनडे सामन्यात अर्शदीप खेळण्याची अपेक्षा आहे.

Usman Khawaja : कानाजवळ आला अन् वर्णद्वेषी टिपण्णी… उस्मान ख्वाजानं लॉर्ड्समधील तो धक्कादायक प्रसंग सांगितला

आयपीएल 2027 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणार

दरम्यान, अर्शदीप सिंग अलीकडेच आयपीएलमधील मोठ्या ट्रेडमुळे चर्चेत आला होता. आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या पंजाब किंग्जकडे गेला असून, अर्शदीप सिंग मुंबई इंडियन्सच्या संघात दाखल झाला आहे. त्यामुळे आगामी हंगामात तो वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसोबत मुंबईच्या गोलंदाजीची धुरा सांभाळताना दिसणार आहे.

मुंबई इंडियन्सने 2020 मध्ये अखेरचे आयपीएल विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर संघाला अपेक्षित यश मिळवता आलेले नाही. 2026 च्या हंगामात संघाने 14 पैकी केवळ चार सामने जिंकले होते आणि गुणतालिकेत नववे स्थान मिळवले होते. त्यामुळे आगामी हंगामात अर्शदीपच्या कामगिरीकडे चाहत्यांचे लक्ष असेल.

Web Title: Arshdeep singh engagement samreen kaur new zealand rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2026 | 06:31 PM

Topics:  

  • Arshdeep Singh
  • IPL
  • mumbai indians

संबंधित बातम्या

IPL 2027: अखेर सस्पेन्स संपला! Hardik Pandya पंजाबच्या ताफ्यात, तर Arshdeep ची मुंबई इंडियन्समध्ये एन्ट्री; किती कोटींची डील?
1

IPL 2027: अखेर सस्पेन्स संपला! Hardik Pandya पंजाबच्या ताफ्यात, तर Arshdeep ची मुंबई इंडियन्समध्ये एन्ट्री; किती कोटींची डील?

IPL Breaking: मोठा धमाका होणार! ‘हे’ झाल्यास पोरं नाय ऐकणार; 2028 मध्ये दोन नवीन संघ एन्ट्री घेणार?
2

IPL Breaking: मोठा धमाका होणार! ‘हे’ झाल्यास पोरं नाय ऐकणार; 2028 मध्ये दोन नवीन संघ एन्ट्री घेणार?

Juhi Chawla: IPL च्या वेळापत्रकाबाबत KKR ची सहमालकीण जूही चावलाने मांडली भूमिका, अभिनेत्रीच्या पोस्टने क्रिकेटविश्वात चर्चेत उधाण
3

Juhi Chawla: IPL च्या वेळापत्रकाबाबत KKR ची सहमालकीण जूही चावलाने मांडली भूमिका, अभिनेत्रीच्या पोस्टने क्रिकेटविश्वात चर्चेत उधाण

IPL बाबत ललित मोदीचं वक्तव्य ऐकतलं का? थेट बाजारंच उठवला
4

IPL बाबत ललित मोदीचं वक्तव्य ऐकतलं का? थेट बाजारंच उठवला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.