
युनिटी करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत आर्यन्स क्रिकेट अकादमी संघाचे धडाकेबाज विजय
रितेश मुंडे, प्रियांश राठोड यांची शतकी खेळी
लोणी काळभोर येथील क्रिकप्लस येथे सुरु आहे स्पर्धा
पुणे: युनिटी कमिटी यांच्या वतीने आयोजित युनिटी करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत आर्यन्स क्रिकेट अकादमी, सीएनए या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांविरुद्व धडाकेबाज विजय मिळवले. लोणी काळभोर येथील क्रिकप्लस (sports) येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत रितेश मुंडे(११९धावा) याने केलेल्या धडाकेबाज शतकी खेळीच्या जोरावर आर्यन्स क्रिकेट अकादमी संघाने ब्रिलियंट्स स्पोर्ट्स अकादमी २५७ धावांनी पराभव करत दुसऱ्या विजयची नोंद केली.
रॉक २७ स्पोर्ट्स अकादमी येथील क्रिकेट मैदानावरील लढतीत प्रियांश राठोड(११८धावा) याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर सीएनए संघाने एमजे क्रिकेट अकादमी संघाचा १६६ धावांनी पराभव करत पहिला विजय मिळवला.
Cricket News: नाद खुळा! PCMC क्रिकेट लीगमध्ये ‘या’ टीम्सचा जलवा; २नाईन स्पोर्ट्स क्लब थेट…
आर्यन्स क्रिकेट अकादमी: ५० षटकात ९बाद ३१५ धावा(रितेश मुंडे ११९(१२९,१३x४), राजवर्धन वाघ ३३, राजवीर होले ३४, आयुष देशमुख २४, आदित्य काळे २०, सिद्ध राठोड १८, परम राज २-३१, अथर्व शिंदे २-४२, शौर्य शेलार १-३७) वि.वि. ब्रिलियंट्स स्पोर्ट्स अकादमी: २६.४षटकात सर्वबाद ५८धावा(चेतन रेड्डी १२, समर भोगे १०, स्टीफन शिरोडकर १३, मनन ३-९, वीर कोळेकर २-४, सोहम चव्हाण २-१५); सामनावीर – रितेश मुंडे;
सीएनए: ४६.२ षटकात सर्वबाद ३२६धावा(प्रियांश राठोड ११८(८२,१८x४,१x६), अनीश्वर मिश्रा ७०(८४, ९x४), अगस्त्य कुद्रे १७, कबीर जोशी १३, पार्थ के ३-४६, शौर्य शेळके ३-५०, रुद्र वाघोले २-३३) वि.वि.एमजे क्रिकेट अकादमी: ४५.४षटकात सर्वबाद १६०धावा(जयंत सिंग नाबाद २०, स्वराज घोडके १६, मनन पटेल १५, ध्रुव रामदासी ४-३२, देवांग मच्छा ४-१५); सामनावीर – प्रियांश राठोड; १६६
DSP Cup 2026: सार्थक पाटीलची अष्टपैलू कामगिरी; पुणे Cricket क्लबचा ‘या’ संघावर थरारक विजय
सार्थक पाटीलची अष्टपैलू कामगिरी
डीएसपी स्पोर्ट्स अँड इव्हेंटस यांच्या वतीने आयोजित पहिल्या डीएसपी करंडक १४ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत सार्थक पाटील याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर पुणे क्रिकेट क्लब संघाने सार्क क्रिकेट अकादमी संघाचा ४ गडी राखून पराभव करत विजेतेपद संपादन केले. हे आव्हान पुणे क्रिकेट क्लब संघाने ३८.१ षटकात ६ बाद १८२ धावा करून पूर्ण केले. यात राजवीर राऊत ३२, रोनक गोयल नाबाद ३२, अमरेंद्र यादव २८, सार्थक पाटील २२, सचिन चव्हाण २१ यांनी छोटी पण महत्वपूर्ण खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.