Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cricket News: नाद खुळा! PCMC क्रिकेट लीगमध्ये ‘या’ टीम्सचा जलवा; २नाईन स्पोर्ट्‌स क्लब थेट…

Cricket: स्पर्धेचे उद्घाटन पिंपरी चिंचवड क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष जगदीश शेट्टी, संघटनेचे सचिव राजू कोतवाल, खजिनदार संजय शिंदे आणि स्पर्धेचे संयोजक सुशील जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 23, 2026 | 09:45 PM
२नाईन स्पोर्ट्‌स क्लब, सह्यांद्री किंग्ज्‌ ची विजयी सुरूवात

२नाईन स्पोर्ट्‌स क्लब, सह्यांद्री किंग्ज्‌ ची विजयी सुरूवात

Follow Us
Follow Us:
  • पिंपरी चिंचवड करंडक‌’ आंतरक्लब खुला गट टी-२० क्रिकेट स्पर्धा
  • २नाईन स्पोर्ट्‌स क्लब, सह्यांद्री किंग्ज्‌ ची विजयी सुरूवात
  • हिंजेवाडी येथील फोर स्टार क्रिकेट मैदानावर सुरू आहे स्पर्धा 
पुणे/Cricket: पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित ‘पिंपरी चिंचवड करंडक‌’ आंतरक्लब खुल्या गटाच्या टी-२० क्रिकेट स्पर्धेत २नाईन स्पोर्ट्‌स क्लब आणि सह्यांद्री किंग्ज्‌ या संघांनी प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून उद्घाटनाचा दिवस गाजवला.
हिंजेवाडी येथील फोर स्टार क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या (PCMC) या स्पर्धेत सागर नागमुळे याने फटकावलेल्या ६६ धावांच्या जोरावर २नाईन स्पोर्ट्‌स क्लबने एचएस पँथर्सचा १०२ धावांनी सहज पराभव केला.

पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या २नाईन स्पोर्ट्‌स क्लबने १८३ धावांचे लक्ष्य उभे केले. सागर नागमुळे याने ६६ धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजुने शुभम मोहीते याने नाबाद ५३ धावांचे योगदान दिले. याला उत्तर देताना एचएस पँथर्स संघाचा डाव ८१ धावांवर आटोपला. २नाईन स्पोर्ट्‌सच्या कमल कुमार याने चार गडी टिपले. के. करण याने तीन गडी तर, हिमांशु यादव याने दोन गडी बाद करून संघाचा विजय सोपा केला.

DSP Cup 2026: सार्थक पाटीलची अष्टपैलू कामगिरी; पुणे Cricket क्लबचा ‘या’ संघावर थरारक विजय

सुशांत अभंग याने केलेल्या कामगिरीच्या जोरावर सह्यांद्री किंग्ज्‌ने व्हिडीआर क्रिकेट ॲकॅडमीचा ६९ धावांनी पराभव करून स्पर्धेत विजयी सलामी दिली. पहिल्यांदा खेळताना सह्यांद्री किंग्ज्‌ने १७९ धावा धावफलकावर लावल्या. यैशले कुच्चल (नाबाद ४४ धावा), सुशांत अभंग (४१ धावा), सुयश देसाई (३१ धावा) आणि सईश शिंदे (२६ धावा) यांनी धावा जमवून संघाचा डाव उभा केला. या लक्ष्याचा पाठलाग करताना व्हिडीआर क्रिकेट ॲकॅडमीचा डाव ११० धावांवर मर्यादित राहीला. प्रसाद पांडे याने नाबाद ५२ धावांची खेळी करून एकहाती लढा दिला.

यांच्या हस्ते झाले स्पर्धेचे उद्घाटन

स्पर्धेचे उद्घाटन पिंपरी चिंचवड क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष जगदीश शेट्टी, संघटनेचे सचिव राजू कोतवाल, खजिनदार संजय शिंदे आणि स्पर्धेचे संयोजक सुशील जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संघटनेचे डॉ. दिलीपसिंग मोहीते, मुकेश गुजराथी, पद्मनाभ बांदेकर आदि मान्यवर उपस्थित होते.

सामन्यांचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरी

२नाईन स्पोर्ट्‌स क्लबः २० षटकात ६ गडी बाद १८३ धावा (सागर नागमुळे ६६ (४९, ४ चौकार, ३ षटकार), शुभम मोहीते नाबाद ५३ (३९, ४ चौकार, २ षटकार), प्रद्युम्न आटपदार ३२, आदित्य गायकवाड २-३२) वि.वि. एचएस पँथर्सः १५.५ षटकात १० गडी बाद ८१ धावा (समर्थ आगवे नाबाद १९, श्रीराज गायकवाड १८, कमल कुमार ४-८, के. करण ३-२३, हिमांशु यादव २-२२); सामनावीरः सागर नागमुळे;

सह्यांद्री किंग्ज: २० षटकात ६ गडी बाद १७९ धावा.यैशले कुच्चल नाबाद ४४, सुशांत अभंग ४१, सुयश देसाई ३१, सईश शिंदे २६, साहील तेवोतिया २-२७ वि.वि. व्हिडीआर क्रिकेट ॲकॅडमीः २० षटकात ९ गडी बाद ११० धावा. प्रसाद पांडे नाबाद ५२, गंधर्व अरगडे २०, मयुर गोखले २-२८, सुयश देसाई  २-२, अभिषेक राय २-१५, सामनावीरः सुशांत अभंग.

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय

💡

Frequently Asked Questions

  • Que: स्पर्धेचे आयोजन कुठे केले गेले आहे?

    Ans: ‘पिंपरी चिंचवड करंडक‌’चे आयोजन हिंजेवाडी येथील फोर स्टार क्रिकेट मैदानावर केले गेले आहे.

  • Que: कोणाच्या हस्ते झाले स्पर्धेचे उद्घाटन?

    Ans: पिंपरी चिंचवड क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष जगदीश शेट्टी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

Web Title: 2nine sports club sahyadri kings make a winning start pcmc league tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 09:45 PM

Topics:  

  • cricket news
  • PCMC News
  • Sports News

संबंधित बातम्या

ज्युनिअर क्रिकेटमध्ये नव्या पर्वाची सुरुवात; Parvinder Awana निवड समितीचे अध्यक्ष, BCCI चा मोठा निर्णय
1

ज्युनिअर क्रिकेटमध्ये नव्या पर्वाची सुरुवात; Parvinder Awana निवड समितीचे अध्यक्ष, BCCI चा मोठा निर्णय

Cricket: सिद्ध राठोडचा तडाखा अन्…; आर्यन्स क्रिकेटने 333 रन्सने चारली आदिनाथ अकादमीला धूळ
2

Cricket: सिद्ध राठोडचा तडाखा अन्…; आर्यन्स क्रिकेटने 333 रन्सने चारली आदिनाथ अकादमीला धूळ

IND Vs PAK: स्वतःची सुरक्षा वाऱ्यावर अन् Pakistan च्या उलट्या बोंबा; ‘या’ कारणासाठी भारतात जाण्यास नकार
3

IND Vs PAK: स्वतःची सुरक्षा वाऱ्यावर अन् Pakistan च्या उलट्या बोंबा; ‘या’ कारणासाठी भारतात जाण्यास नकार

Cricket: युवा क्रिकेटपटूंचा धमाका! ‘पुना वेस्टर्न क्लब करंडक’मध्ये दोन संघांची विजयी सलामी
4

Cricket: युवा क्रिकेटपटूंचा धमाका! ‘पुना वेस्टर्न क्लब करंडक’मध्ये दोन संघांची विजयी सलामी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.