Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय संघात धर्म महत्वाचा? सरफराज खानचे नाव घेत मुस्लिम नेत्यांचा प्रशिक्षक गंभीरवर हल्लाबोल 

बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आलेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय 'अ' संघात सरफराज खानला भारतीय 'अ' संघात स्थान देण्यात आले नाही. या निर्णयानंतर दोन भारतीय मुस्लिम नेत्यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 22, 2025 | 06:26 PM
Is religion important in the Indian team? Muslim leader attacks coach Gambhir, naming Sarfaraz Khan

Is religion important in the Indian team? Muslim leader attacks coach Gambhir, naming Sarfaraz Khan

Follow Us
Close
Follow Us:

Sarfaraz Khan not selected in India ‘A’ team  : बीसीसीआयकडून अलीकडेच  दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय ‘अ’ संघाची घोषणा करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी सरफराज खानला भारतीय ‘अ’ संघात स्थान देण्यात आले नाही. त्यानंतर चांगलाच  वाद निर्माण झाला आहे. मागील  पाच वर्षांत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ११०.४७ च्या प्रभावी सरासरीने १० शतके आणि ५ अर्धशतके ठोकणाऱ्या सरफराजकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. आता यावर भारतातील दोन मुस्लिम नेत्यांनी देखील भाष्य केले आणि आपली नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा : हार्दिक पंड्याला लॉटरी? ‘या’ मालिकेसाठी भारतीय संघात करणार ‘रॉयल’ पुनरागमन

या दोन मुस्लिम नेत्यांमध्ये आम्ही ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी आणि काँग्रेस पक्षाच्या महिला नेत्या डॉ. शमा मोहम्मद यांचा समावेश आहे. या दोघांनी देखील सरफराजकडे वारंवार दुर्लक्ष केल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. या निर्णयानंतर चाहत्यांनी देखील आपली निराशा व्यक्त केली आहे.  या दोन मूलसिम नेत्यांचे म्हणणे आहे की, सरफराज खान मुस्लिम असल्याने त्याला भारतीय संघात स्थान देण्यात येत नाही.

काँग्रेस नेत्याकडून गंभीरवर गंभीर आरोप

काँग्रेस नेत्या डॉ. शमा मोहम्मद यांनी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर आरोप करत म्हटले आहे की, सरफराज खानची निवड न होणे हे त्याच्या धर्म आणि आडनावाशी जोडले गेले होते, ज्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे. डॉ. शमा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करताना यांनी लिहिले की, “सरफराज खानची निवड त्याच्या आडनावामुळे संघात झाली नाही का? गौतम गंभीरचे याबद्दल  काय मत आहे हे आम्हाला आमहित आहे.” डॉ. शमा मोहम्मद यांच्या पोस्टने एकच खळबळ उडाली आहे. या पोस्टने आता मुद्दा केवळ क्रीडा वादापासून राजकीय वादामध्ये रूपांतरित झाला आहे.

ओवेसी यांनी डागली  तोफ

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी देखील सरफराज खानला भारतीय अ संघात स्थान न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित निर्माण केले आहेत. ते म्हणाले की,  “सरफराज खानची भारतीय अ संघात निवड का झाली नाही?”

हेही वाचा : ICC Ranking : ‘यॉर्कर किंग’ बुमराह कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल! सिराजची ODI सामन्यांमध्ये मोठी झेप घेतली

सरफराज खानची आकडेवारी

सरफराज खानने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सातत्याने आपल्या शानदार कामगिरीने प्रभावित केले आहे. त्याने ५६ सामन्यांमध्ये ६५.१९ च्या सरासरीने ४७५९ धावा फटकावल्या आहेत. ज्यामध्ये त्याने १६ शतके आणि १५ अर्धशतके झळकावली आहेत. त्याने भारतीय संघासाठी सहा कसोटी सामने खेळले असून त्यामध्ये त्याने ३७.१० च्या सरासरीने ३७१ धावा केल्या आहेत.

Web Title: Asaduddin owaisi criticizes sarfaraz khan for being left out of india a team against south africa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2025 | 06:25 PM

Topics:  

  • Asaduddin Owaisi
  • bcci
  • Gautam Gambhir
  • Ind Vs Sa
  • Sarfraz Khan

संबंधित बातम्या

IND vs SA 2nd T20I Live Streaming: दुसरा टी-२० सामना कधी अन् किती वाजता होणार सुरू? कुठे पाहणार लाईव्ह ॲक्शन? घ्या जाणून
1

IND vs SA 2nd T20I Live Streaming: दुसरा टी-२० सामना कधी अन् किती वाजता होणार सुरू? कुठे पाहणार लाईव्ह ॲक्शन? घ्या जाणून

संजू सॅमसन वर्ल्ड कपबाहेर! जितेश शर्माची यष्टीरक्षकासाठी लॉटरी; माजी खेळाडूचे खळबळजनक भाकीत
2

संजू सॅमसन वर्ल्ड कपबाहेर! जितेश शर्माची यष्टीरक्षकासाठी लॉटरी; माजी खेळाडूचे खळबळजनक भाकीत

IND vs SA 1st T20 : ‘मी नाणेफेकीवेळी म्हटले होते…” दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विजयानंतर सूर्याने सहकाऱ्यांना दिला संदेश….
3

IND vs SA 1st T20 : ‘मी नाणेफेकीवेळी म्हटले होते…” दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विजयानंतर सूर्याने सहकाऱ्यांना दिला संदेश….

IND vs SA 1st T20 : खतरो का खिलाडी ‘रॉकस्टार’ पंड्या…! षटकार-चौकारांनी चाहते बेभान; हार्दिकने केले जादूचे रहस्य उघड 
4

IND vs SA 1st T20 : खतरो का खिलाडी ‘रॉकस्टार’ पंड्या…! षटकार-चौकारांनी चाहते बेभान; हार्दिकने केले जादूचे रहस्य उघड 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.