जसप्रीत बुमराह(फोटो-सोशल मीडिया)
ICC ODI and Test rankings : भारताचा ‘यॉर्कर किंग’ वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आयसीसी पुरुष कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले आहे. परंतु ताज्या अपडेटमध्ये भारतीय खेळाडूंमध्ये काही बदल झाले आहे. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने एकदिवसीय क्रमवारीत शानदार पुनरागमन केले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अलिकडच्या एकदिवसीय मालिकेतील त्याच्या प्रभावी कामगिरीनंतर, एका वर्षापेक्षा जास्त काळानंतर तो प्रथमच खेळत असून त्याने १७ व्या स्थानी उडी मारली आहे. दरम्यान, कसोटी क्रमवारीमध्ये बुमराहची आघाडी पाकिस्तानच्या नोमान अलीपेक्षा फक्त २९ गुणांनी कमी झाली असून अलीने लाहोरमध्ये त्याच्या जोरदार कामगिरीनंतर कारकिर्दीतील नवीन सर्वोच्च रेटिंग प्राप्त करण्यात यश मिळवले आहे.
हेही वाचा : हार्दिक पंड्याला लॉटरी? ‘या’ मालिकेसाठी भारतीय संघात करणार ‘रॉयल’ पुनरागमन
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाकिस्तानच्या ९३ धावांच्या विजयात नोमानने काढलेल्या १० बळींमुळे तो एकूण ८५३ रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर जाऊन पोहोचला आहे. त्याच कसोटीच्या दुसऱ्या डावात चार बळी घेतल्यानंतर त्याचा सहकारी शाहीन आफ्रिदी देखील आता तीन स्थानांनी पुढे सरकला असून त्याने १९ स्थान पटकावले आहे.
पाकिस्तानी फलंदाजांमध्ये, मोहम्मद रिझवानला चार स्थानांचा फायदा झाला आहे. तो १६ व्या स्थानावर, तर बाबर आझम दोन स्थानांनी पुढे सरकून २२ व्या स्थानावर आणि सलमान आगा आठ स्थानांनी पुढे सरकला आणि ३० व्या स्थानावर विराजमान झाला आहे. तथापि, इंग्लंडचा जो रूट कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी कायम आहे. दक्षिण आफ्रिकेचा रायन रिकल्टनने पहिल्यांदाच टॉप ५० मध्ये प्रवेश केला आहे, तर टोनी डी झोर्झी ५४ व्या स्थानावर पोहोचला आहे.
तसेच अनेक ऑस्ट्रेलियन आणि इंग्लिश खेळाडूंना पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दलचे त्यांना फळ मिळाले आहे. पर्थमध्ये, ऑस्ट्रेलियाचा स्थायी कर्णधार मिचेल मार्श भारताविरुद्धच्या सामन्यातील सर्वोत्तम कामगिरीनंतर त्याला एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत दोन स्थानांचा फायदा झाला असून तो ४२ व्या स्थानावर पोहोचला आहे.
त्याबरोबरच ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड आणि मिशेल स्टार्क यांना देखील मोठा फायदा झाला आहे, ही दोघे एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीत अनुक्रमे १० व्या आणि २१ व्या स्थानावर पोहचले आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध सातत्यपूर्ण कामगिरीनंतर बांगलादेशचा फिरकी गोलंदाज मेहदी हसन मिराजला देखील सहा स्थानांचा फायदा होऊन तो १८ व्या स्थानावर पोहोचला आहे.
हेही वाचा : IND vs AUS: किंग कोहलीला 50 वर्षांच्या इतिहासात चालून आली ‘विराट’ संधी! अॅडलेड ODI मध्ये घालणार धुमाकूळ