Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashes 2025 : अ‍ॅडलेडमध्ये Travis Head चे ऐतिहासिक शतक! ‘हा’ पराक्रम करणारा तो ठरला पहिलाच ऑस्ट्रेलियन खेळाडू

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या अ‍ॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सालामीवीर ट्रॅव्हिस हेडने शानदार शतक झळकावून इतिहास रचला आहे. त्याने एकाच मैदानावर लागोपाठ ४ शतके ठोकली आहेत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 19, 2025 | 02:46 PM
Ashes 2025: Travis Head scores a historic century in Adelaide! He became the first Australian player to achieve this feat.

Ashes 2025: Travis Head scores a historic century in Adelaide! He became the first Australian player to achieve this feat.

Follow Us
Close
Follow Us:

Travis Head’s historic century : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात  पाच सामन्यांची प्रतिष्ठेची अ‍ॅशेस मालिका सुरू आहे, या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सालामीवीर ट्रॅव्हिस हेडने शानदार शतक झळकावून इतिहास रचला आहे. या शतकासह, हेड एकाच ऑस्ट्रेलियन मैदानावर सलग चार कसोटी सामन्यांमध्ये शतके झळकावणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे.

हेही वाचा : T20 World Cup 2026 : श्रीलंकेने खेळला डाव! T20 World Cup साठी संघ जाहीर! वाचा कुणाची लागली लॉटरी? 

या ऐतिहासिक कामगिरीसह, ट्रॅव्हिस हेड आता डॉन ब्रॅडमन, मायकेल क्लार्क आणि स्टीव्ह स्मिथ सारख्या महान खेळाडूंच्या पकस्तीत जाऊन बसला आहे. ३१ वर्षीय हेड ऑस्ट्रेलियन भूमीवर सलग चार कसोटी शतके झळकवण्याची किमया साधणारा इतिहासातील पाचवा फलंदाज बनला आहे.

ऑस्ट्रेलियन भूमीवर लागोपाठ चार कसोटी सामन्यांमध्ये शतके झळकावणारे फलंदाज

  1. डॉन ब्रॅडमन (ऑस्ट्रेलिया), मेलबर्न (१९२८-१९३२)
  2. वॉली हॅमंड (इंग्लंड), सिडनी (१९२८-१९३६)
  3. मायकेल क्लार्क (ऑस्ट्रेलिया), अॅडलेड (२०१२-२०१४)
  4. स्टीव्हन स्मिथ (ऑस्ट्रेलिया), मेलबर्न (२०१४-२०१७)
  5. ट्रॅव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया), अॅडलेड (२०२२-२०२५)
उल्लेखनीय बाब म्हणजे, अ‍ॅडलेड ओव्हलवर हे ट्रेवीस हेडचे सलग चौथे कसोटी शतक ठरले आहे. या कामगिरीसह, तो अ‍ॅडलेडवर चार कसोटी शतके झळकावणारा तिसराच ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला आहे. २०२२ पासून या मैदानावर एकूण चार सामने खेळवण्यात आले आहे. त्याने चारही सामन्यांमध्ये शतके ठोकली आहेत.

अ‍ॅडलेड ओव्हलवर ट्रॅव्हिस हेडने १४६ चेंडूत शतक पूर्ण केले. हे हेडचे हे ११ वे कसोटी शतक ठरले असून तिसऱ्या दिवसाच्या खेळाच्या शेवटी, ट्रॅव्हिस हेडने १९६ चेंडूंचा सामना करत १४२ धावा केल्या. त्याने १३ चौकार आणि २ षटकार मारले. त्याला अ‍ॅलेक्स कॅरीची साथ मिळत आहे, त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या डावात ४ बाद २७१ धावा करून ३५६ धावांची आघाडी घेतली आहे.

सामन्याची स्थिती

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ३७१ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडू पहिल्या डावा त अॅलेक्स कॅरीच्या १०६, उस्मान ख्वाजाच्या ८२ आणि मिशेल स्टार्कच्या ५४ धावांची खेळी केली आहे. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ३७१ धावा केल्या. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने ५, ब्रायडन कार्स आणि विल जॅक्सने प्रत्येकी २ बळी टिपले. तर जोश टँगने १ बळी घेण्यात यश मिळवले.

हेही वाचा : Ashes series 2025 : स्टोक्स-आर्चर यांच्यात मैदानातच राडा! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडच्या खेळाडूंचे थरार नाट्य; VIDEO

यानंतर धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडला सुरुवातीलाच धक्के बसले आहेत. तथापि, बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चरने ९व्या विकेटसाठी शतकी भागीदारी केल्याने संघाला २८६ धावा करता आल्या. बेन स्टोक्सने ८३, तर जोफ्रा आर्चरने ५१ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. बेन डकेटने २९, जो रूटने १९, हॅरी ब्रूकने ४५ आणि जेमी स्मिथने २२ धावा केल्या.  ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक ३ बळी आणि स्कॉट बोलँडने ३ बळी टिपले, तर लायनने २ विकेट घेतल्या. तर मिचेल स्टार्क आणि ग्रीनने प्रत्येकी १ विकेट घेतली.

ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव

ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात देखील आपल्या प्रभावी फलंदाजीचे दर्शन घडवले. तिसऱ्या दिवससाचा खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाने  ४ बाद २७१ धावा केल्या होत्या. ट्रॅव्हिस हेड १४२ आणि अॅलेक्स कॅरी ५२ धावांवर नाबाद राहिले. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा ४०, मार्नस लाबुशेन १३ आणि कॅमेरॉन ग्रीन ७ धावा फटकावल्या. इंग्लंडकडून जोश टोंगने दोन बळी टिपण्यात यश मिळवले.

Web Title: Ashes 2025 travis head scores a historic century in adelaide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2025 | 02:46 PM

Topics:  

  • Ashes 2025
  • AUS vs ENG
  • Travis Head

संबंधित बातम्या

AUS vs ENG: ट्रॅव्हिस हेडने शतक झळकावून इंग्लंडला दिला धक्का, रोहित शर्माचा प्रभावी विक्रम मोडला!
1

AUS vs ENG: ट्रॅव्हिस हेडने शतक झळकावून इंग्लंडला दिला धक्का, रोहित शर्माचा प्रभावी विक्रम मोडला!

AUS vs ENG : अशाच एका चेंडूने घेतला होता एक खेळाडूंचा जीव… स्टार्कच्या त्या बाॅलने बेन स्टोक्स थोडक्यात बचावला! पहा Video
2

AUS vs ENG : अशाच एका चेंडूने घेतला होता एक खेळाडूंचा जीव… स्टार्कच्या त्या बाॅलने बेन स्टोक्स थोडक्यात बचावला! पहा Video

AUS vs ENG 3rd Test: नॅथन लिऑनने तोडला ग्लेन मॅकग्राचा महारेकॉर्ड, टेस्टमध्ये रचला इतिहास; क्रिकेटच्या महानायकाला सलाम
3

AUS vs ENG 3rd Test: नॅथन लिऑनने तोडला ग्लेन मॅकग्राचा महारेकॉर्ड, टेस्टमध्ये रचला इतिहास; क्रिकेटच्या महानायकाला सलाम

Ashes series 2025 : शतकासाठी अ‍ॅलेक्स कॅरीचा ‘फ्रॉड’ गेम? VIDEO व्हायरल होताच ‘ती’ चूक समोर; चाहते ‘सदम्यात’ 
4

Ashes series 2025 : शतकासाठी अ‍ॅलेक्स कॅरीचा ‘फ्रॉड’ गेम? VIDEO व्हायरल होताच ‘ती’ चूक समोर; चाहते ‘सदम्यात’ 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.