बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर यांच्यात वाद(फोटो-सोशल मीडिया)
Controversy between Jofra Archer and Ben Stokes : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात अॅशेस मालिकेतील तिसरा सामना अॅडलेडमध्ये खेळला जात आहे. या सामन्याचा दूसरा दिवसाचा खेळ संपला असून इंग्लंडने ८ बाद २१३ धावा केल्या आहे. ऑस्ट्रेलियाकडे अजूनही १५८ धावांची आघाडी आहे. दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या शेवटी इंग्लंडची स्थिती नाजुक दिसत असताना कर्णधार बेन स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यांनी संयमी फलंदाजी करत संघाला बळकटी देण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी ४५ धावांची महत्त्वाची भागीदारी केली. दरम्यान या दोन्ही खेळाडुंमध्ये वाद झाल्याचे दिसून आले.
ऑस्ट्रेलियन डावादरम्यान बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर यांच्यात जोरदार वाद झाला आणि सामन्यादरम्यान वातावरण एकदमच तापले. इंग्लंडचा कर्णधार आर्चरच्या वागण्यावर नाराज होता आणि त्याने उघडपणे आपली नाराजी व्यक्त देखील केली. यावेळी इतर इंग्लिश खेळाडू देखील हस्तक्षेप करताना दिसून आले.
संपूर्ण वाद क्षेत्ररक्षण सेटअपवरून सुरू झाला असताना, कर्णधार बेन स्टोक्सने लावलेल्या क्षेत्ररक्षणावर जोफ्रा आर्चर समाधानी दिसून आला नाही आणि त्याने कर्णधाराकडे आपली नाराजी देखील व्यक्त केली. आर्चरची ही वृत्ती स्टोक्सला आवडली नाही आणि त्याचे रूपांतर वादात झाले.
मैदानावर, स्टोक्सने रागाने आर्चरला चांगलेच फटकारले. स्टोक्सच्या या टिप्पणीनंतर, आर्चरने कर्णधाराला रागाने प्रतिउत्तर दिले. तथापि, परिस्थिती बीघडल्याचे पाहून, इतर संघ सदस्यांनी ताबडतोब या घटनेत हस्तक्षेप केला आणि दोघांना देखील शांत केले. संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
ऑस्ट्रेलियाचा डाव ३७१ धावांवर गुंडाळल्यानंतर, इंग्लंडची सुरुवात निराशाजनकच झाली. जॅक क्रॉलीने पॅट कमिन्सला फक्त ९ धावांवर माघारी पाठवले. ऑली पोपला ३ धावांवर नाथन लायनने बाद केले. जो रूट १९ धावां करून बाद झाला, तर बेन डकेट फक्त २९ धावांच करता आल्या. इंग्लंडने ७१ धावांवर आपल्या चार विकेट गमावल्या. त्यानंतर हॅरी ब्रूक आणि जेमी स्मिथ यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. ब्रुक ४५ धावांवर माघारी गेला. तर स्मिथ २२ धावा काढून बाद झाला. विल जॅक्स फक्त सहा धावा करू शकले आणि ब्रायडन कार्सेला बोलँडने एकही धाव न देता बाद आपली शिकार बनवले.
Ben Stokes saying to Archer
Mate don’t complain about the field placings when you bowl 💩
“Bowl on the stumps” he says and yep and look what happens #ashes25@7Cricket #AUSvsENG pic.twitter.com/RFaoSnH02Z — Bernie Coen (@berniecoen) December 17, 2025
हेही वाचा : WI VS NZ : टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉनवे जोडीचा WTC मध्ये धुमाकूळ! सलामीच्या ‘त्या’ पराक्रमाने रचला विश्वविक्रम
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बेन स्टोक्स ४५ धावांवर आणि जोफ्रा आर्चर ३० धावांवर नाबाद राहिले होते. इंग्लंड अजूनही ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येपासून १५८ धावांनी पिछाडीवर असून त्यांच्या केवळ फक्त दोन विकेट शिल्लक आहेत. परिणामी, तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा मार्ग अत्यंत कठीण असल्याचे दिसून येत आहे.






