Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asia Cup 2025 Final : सूर्या दादा मानलं तुला…आशिया कपमधील सर्व कमाई भारतीय सैन्याला केली दान

अंतिम सामन्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने मोठा निर्णय घेतला. त्याने भारतीय सैन्य आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी त्याची मॅच फी दान केली.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 29, 2025 | 10:52 AM
फोटो सौजन्य - यूट्युब

फोटो सौजन्य - यूट्युब

Follow Us
Close
Follow Us:

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये काल आशिया कप 2025 चा फायनलचा सामना खेळवण्यात आला. या सामन्यामध्ये भारताच्या संघाने पाकिस्तानला 5 विकेट्सने पराभूत केले होते. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आशिया कप २०२५ मध्ये शानदार कामगिरी केली आणि विजेतेपद पटकावले. टीम इंडियाने २८ सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध अंतिम सामना खेळला आणि ५ विकेट्सने सामना जिंकला. तिलक वर्माने पाकिस्तानला पूर्णपणे हरवत टीम इंडियासाठी शानदार कामगिरी केली. कुलदीप यादवनेही गोलंदाजीमध्ये पदार्पण केले.

अंतिम सामन्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने मोठा निर्णय घेतला. त्याने भारतीय सैन्य आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी त्याची मॅच फी दान केली. त्याने पत्रकार परिषदेत याची घोषणा केली आणि सोशल मीडियावर एक पोस्ट देखील शेअर केली. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आशिया कप २०२५ मध्ये अपराजित राहिला आणि त्याने सर्व सात सामने जिंकले.

IND vs PAK : पाकिस्तानला मिर्ची झोंबली! ‘हा’ तर लष्करप्रमुख असीम मुनीर यांचा अपमान’; आदिल राजा भडकलेे

अंतिम फेरीत पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर, सूर्यकुमार यादवने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर लिहिले की, “मी या स्पर्धेतील माझी मॅच फी आपल्या सशस्त्र दलांना आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही नेहमीच माझ्या विचारात असाल.” सूर्यकुमार यादवने “जय हिंद” आणि भारतीय ध्वजाचे इमोजी देखील शेअर केले.

सूर्याला त्यांच्या निर्णयाबद्दल देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारतीय संघाने आशिया कप २०२५ चा पहिला सामना १४ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्ध खेळला. या सामन्यातही भारतीय संघाने शानदार कामगिरी केली आणि विजय मिळवला. सामन्यानंतरच्या सादरीकरणात सहभागी असलेल्या सूर्यकुमार यादवने हा विजय भारतीय सैन्य आणि पहलगाम हल्ल्यातील बळींना समर्पित केला. आता, अंतिम सामन्यानंतर, सूर्याने भारतीय सैन्याबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

I have decided to donate my match fees from this tournament to support our Armed Forces and the families of the victims who suffered from the Pahalgam terror attack. You always remain in my thoughts 🙏🏽 Jai Hind 🇮🇳 — Surya Kumar Yadav (@surya_14kumar) September 28, 2025

टीम इंडियाने आशियाई क्रिकेट परिषद आणि पीसीबी प्रमुख मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. परिणामी, भारतीय खेळाडूंनी ट्रॉफीशिवाय आशिया कप विजय साजरा केला, ज्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात मोहसीन नक्वी यांच्यावर टीका केली जात आहे. या फायनलच्या सामन्यामध्ये तिलक वर्माने कमालीची कामगिरी या फायनलच्या सामन्यामध्ये केली.

Web Title: Asia cup 2025 final suryakumar believed in you donated all the earnings from the asia cup to the indian army

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2025 | 10:34 AM

Topics:  

  • Asia cup 2025
  • cricket
  • indian army
  • Sports
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

मी मरायला तयार आहे… एकटेपणाशी झुंजणारे युवराज सिंगच्या वडीलांनी केले आयुष्यातील काळे सत्य उघड
1

मी मरायला तयार आहे… एकटेपणाशी झुंजणारे युवराज सिंगच्या वडीलांनी केले आयुष्यातील काळे सत्य उघड

Ashes 2025 : कोण होणार चॅम्पियन? मायकेल वॉनने अ‍ॅशेस मालिकेबद्दल केली भविष्यवाणी! क्रिकेट जगतही झाले आश्चर्यचकित
2

Ashes 2025 : कोण होणार चॅम्पियन? मायकेल वॉनने अ‍ॅशेस मालिकेबद्दल केली भविष्यवाणी! क्रिकेट जगतही झाले आश्चर्यचकित

IND vs SA 2nd Test : दुसऱ्या कसोटीतून शुभमन गिल बाहेर, कोण घेणार जागा? हे 3 खेळाडू दावेदार; भारताच्या प्लेइंग 11 मध्ये होणार बदल
3

IND vs SA 2nd Test : दुसऱ्या कसोटीतून शुभमन गिल बाहेर, कोण घेणार जागा? हे 3 खेळाडू दावेदार; भारताच्या प्लेइंग 11 मध्ये होणार बदल

भारताने फिरकीसाठी बनवली खेळपट्टी, पण ‘या’ कारणामुळे डाव आला अंगाशी! ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचा खुलासा
4

भारताने फिरकीसाठी बनवली खेळपट्टी, पण ‘या’ कारणामुळे डाव आला अंगाशी! ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.