फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारताचा संघ पाकिस्तानविरुद्ध सामना खेळणार आहे, त्याआधी टीम इंडियाचे अनेक क्रिकेट चाहते हे या सामन्याला विरोध करत आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय नागरीक हे संतापलेले आहेत. त्यानंतर या वादानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध सर्व संबंध तोडले होते. लेजेंड्स लीगमध्ये झालेल्या सामन्यामध्ये देखील भारताच्या संघाने पाकिस्तानविरुद्ध सामन्याला विरोध केला होता आणि सामना खेळण्यास नकार दिला होता.
भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सुधारेपर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये द्विपक्षीय क्रिकेट मालिका खेळवता कामा नये, असे मत माजी अनुभवी ऑफ स्पिनर हरभजन सिंग यांनी व्यक्त केले. भारत आणि पाकिस्तानमधील आशिया कप सामन्यापूर्वी भज्जीने आपले मत व्यक्त केले. ऑपरेशन सिंदूर नंतर, भारत आणि पाकिस्तान पहिल्यांदाच आमनेसामने क्रिकेट सामना खेळणार आहेत. दोन्ही संघांचे कर्णधार सूर्यकुमार यादव आणि सलमान अली आगा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे की ते या हाय व्होल्टेज सामन्याला हलके घेण्याची चूक करणार नाहीत.
भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेट सामने नेहमीच चर्चेत असतात. पण ऑपरेशन सिंदूर नंतर, सर्वांनी सांगितले की दोन्ही देशांमध्ये क्रिकेट आणि व्यापार होऊ नये. आम्ही वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स खेळत होतो, पण आम्ही पाकिस्तानविरुद्ध खेळलो नाही.
प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते, पण जोपर्यंत दोन्ही देशांमधील संबंध सुधारत नाहीत तोपर्यंत क्रिकेट आणि व्यापार दोन्ही होऊ नये असे माझे मत आहे. पण हे माझे मत आहे. जर सरकार म्हणत असेल की सामना व्हायला हवा तर तो खेळवला पाहिजे. पण दोन्ही देशांमधील संबंध सुधारले पाहिजेत.
भारतीय क्रिकेट संघाबद्दल बोलताना हरभजन सिंग म्हणाला की, रोहित शर्मा आणि विराट कोहली गेल्यानंतरही संघ मजबूत आहे. एका सोसायटी मॅगझिन कार्यक्रमादरम्यान माध्यमांशी बोलताना भज्जी म्हणाले, ‘जर कोणी भारतीय संघाला हरवू शकते तर ते स्वतः टीम इंडिया आहे. हा खूप मजबूत संघ आहे. आमचे क्रिकेट वेगळ्या पातळीचे आहे. विराट आणि रोहित निवृत्त झाले असले तरी, संघ खूप मजबूत आहे.’
भज्जी म्हणाला, ‘दुबईमध्ये खेळणे घरासारखे वाटते. फिरकीपटूंची भूमिका मोठी आहे आणि मला आशा आहे की भारतीय संघ जेतेपदासह परत येईल.’