फोटो सौजन्य - सोशल मिडिया
आशिया कप २०२५ आजपासून सुरू होत आहे. या स्पर्धेसाठी सर्वच क्रिकट चाहते फारच उत्सुर आहेत. चॅम्पियन ट्राॅफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर पहिल्यांदाच आता मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. यावेळी आशिया कप टी-२० स्वरूपात खेळला जात आहे. या स्पर्धेची सुरुवात अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यातील सामन्याने होईल. या दोन्ही संघांचा गट-ब मध्ये समावेश आहे. हा सामना अबू धाबी येथील झायेद क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.
हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होईल. या सामन्यात चाहत्यांच्या नजरा अफगाणिस्तानच्या प्लेइंग इलेव्हनवर असतील. दोन्ही संघासाठी पहिला सामना हा महत्वाचा असणार आहे, हे दोन्ही संघ दुसऱ्या गटामध्ये आहेत.आज दुसऱ्या गटामधील अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग यांच्यामध्ये सामना खेळवला जाणार आहे. पहिल्या गटाचा पहिला सामना हा उद्या म्हणजेच 10 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे, हा सामना भारत विरुद्ध यूएई यांच्यामध्ये होणार आहे त्याआधी अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग या सामन्याच प्लेइंग 11 कशी असू शकते यावर नजर टाका.
🏏Sep 09 Asia Cup 2025 Prediction: AFG vs HKG 🇦🇫🇭🇰
🔥Afghanistan vs Hong Kong Match Winning Prediction: Afghanistan
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Afghanistan had 3 wins in the Tri-Series (5 matches, only loss vs Pakistan), powered by a strong spin attack and steady recent form.
For… pic.twitter.com/Vbh015h2OY
— Dubai7 (@dubai7_india) September 8, 2025
कर्णधार रशीद खान किती फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरतो हे पाहणे मनोरंजक असेल. अफगाणिस्तान संघाची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची फिरकी गोलंदाजी, ज्याच्या आधारावर या संघात मोठ्या संघांनाही हरवण्याची ताकद आहे. कर्णधार रशीद खान स्वतः टी-२० क्रिकेटमध्ये जगातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांपैकी एक आहे. अफगाणिस्तानचा संघ फिरकी गोलंदाजांनी भरलेला असला तरी, आज रशीद खानची योजना ३ फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरण्याची असेल.
यात रशीद खानचाही समावेश असेल. त्याच्याशिवाय नूर अहमद आणि मुजीब उर रहमान हाँगकाँगच्या फलंदाजांना डोकेदुखी देताना दिसतील. या वर्षीचा आयपीएल नूर अहमदसाठीही खूप चांगला होता. त्याने आतापर्यंत १७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने गोलंदाजी करताना १२ विकेट्स घेतल्या आहेत.
लाजीरवाण्या पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेला आणखी एक धक्का; ICC ने बावुमाच्या संघाला ठोठावला दंड
मुजीब उर रहमानने ५२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने गोलंदाजी करताना ६५ विकेट्स घेतल्या आहेत. कर्णधार रशीद खानने आतापर्यंत अफगाणिस्तानसाठी १०० टी-२० सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने गोलंदाजी करताना १७० विकेट्स घेतल्या आहेत.
रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झदरन, सेदीकुल्ला अटल, करीम जनात, अजमतुल्ला उमरझाई, दरविश रसूली, मोहम्मद नबी, रशीद खान (कर्णधार), नूर अहमद, मुजीब उर रहमान, फजलहक फारुकी.