फोटो सौजन्य - X
आशिया कप 2025 : 8 मे रोजीच्या सामन्यानंतर बीसीसीआयने स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये तणावाचे वातावरण वाढत चालले आहे. 8 मे रोजी पाकिस्तानने भारतावर हल्ला केला आणि त्यामुळे सामना लगेचच रद्द करण्यात आला होता. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आणि आयपीएल2025 मध्येच थांबवले. बीसीसीआयने शुक्रवारी हा निर्णय घेतला.
दोन्ही देशांमधील परिस्थिती आता खूपच वाईट आहे आणि संबंध अजिबात सुधारताना दिसत नाहीत. अशा परिस्थितीत, प्रश्न असा आहे की या वर्षी सप्टेंबरमध्ये होणारी आशिया कप स्पर्धा खेळवली जाईल की नाही? परिस्थिती पाहता, या स्पर्धेवर संकटाचे ढग दाटून येत आहेत. भारत सप्टेंबरमध्ये ही स्पर्धा आयोजित करणार आहे. खरंतर, भारत बऱ्याच काळापासून पाकिस्तानसोबत द्विपक्षीय मालिका खेळत नाहीये. हे दोन्ही देश फक्त आशिया कप आणि आयसीसी स्पर्धांमध्ये एकमेकांशी खेळतात.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानविरुद्ध प्रचंड संताप आहे. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदुर केले आणि यामध्ये पाकिस्तानचे 9 दहशतवादी स्थळ उद्धवस्त केली. या हल्ल्यानंतर अनेक माजी भारतीय क्रिकेटपटूंनी पाकिस्तानसोबत कोणत्याही प्रकारचा क्रिकेट सामना खेळणार नसल्याचे म्हटले होते. भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी या संदर्भात म्हटले होते की, जोपर्यंत दहशतवाद संपत नाही तोपर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये काहीही घडू नये, मग तो क्रिकेट सामना असो, बॉलिवूड असो किंवा इतर काहीही.
यावर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवण्यास भारताने नकार दिला होता. टीम इंडियाने त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळले. आशिया कपमध्येही असेच काहीसे घडणार होते आणि पाकिस्तानला त्यांचे सर्व सामने दुसऱ्या देशात खेळावे लागले होते, परंतु सध्याच्या परिस्थितीनंतर असे वाटत नाही की भारत आणि पाकिस्तानचे संघ कोणत्याही प्रकारचा क्रिकेट सामना खेळतील. अशा परिस्थितीत आशिया कप रद्द होण्याचा धोकाही निर्माण झाला आहे.
त्याचबरोबर टी-20 विश्वचषक 2026 चे आयोजन भारत आणि श्रीलंका करणार आहे. यावेळी भारताचा संघ पाकिस्तानविरूध्द सामना खेळणार कि नाही यासंदर्भात अजुनही प्रश्नचिन्ह आहे.