पीसीबी प्रमुख मोहसिन नक्वी(फोटो-सोशल मीडिया)
Indo pak war : ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताकडून पाकिस्तानमध्ये असलेल्या 9 दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला. त्यानंतर पाकिस्तानमध्ये एकच खळबळ माजली. पाकिस्तानकडून उत्तरादाखल ड्रोन आणि मिलिशियाने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु भारतीय सैन्याने सारे वार परतवून लावले. या पार्श्वभूमीवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पीएसएल युएईला हलवले आहे. तथापि, पीसीबी प्रमुख मोहसीन नक्वी यांनी भारतावर गरळ ओकली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावामुळे, गुरुवारी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून एक एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तान सुपर लीग यूएईमध्ये हलवली आहे.
त्यानंतर रावळपिंडी येथे खेळवण्यात येणारा पेशावर झल्मी आणि कराची किंग्ज यांच्यातील सामना पुढे ढकलण्यात आला आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर पीसीबी प्रमुख मोहसिन नक्वी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ज्यामध्ये त्यांनी भारतावर गरळ ओकल्याचे दिसून येत आहे. त्यांच्याकडून दावा करण्यात आला आहे की, भारताचा ‘रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवरील हल्ला’ हा पीएसएल २०२५ मध्ये व्यत्यय आणण्याच्या उद्देशाने करण्यात आला आहे.
मोहसीन नक्वी म्हणाले की, “भारताने रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमला निशाणा बनवणे हे एक अतिशय बेजबाबदार आणि धोकादायक पाऊल होते. ही बाब लक्षात घेऊन, पीसीबीकडून उर्वरित पीएसएल सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एक जबाबदार बोर्ड म्हणून, आमचे प्राधान्य नहेमी क्रिकेट पुढे जात राहावे आणि खेळाडूंचे मानसिक आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी आहे. म्हणूनच आम्ही हे आवश्यक पाऊल उचलले आहे.”
Pakistan Super League shifted to UAE amid India-Pakistan conflict
Players’ mental well-being a priority, says PCB chairman Mohsin Naqvihttps://t.co/X2VAjM4ABf
— Gulf News (@gulf_news) May 9, 2025
रावळपिंडी स्टेडियमवरील हल्ल्यासाठी पाकिस्तान भारताला दोष देत असला तरी, बुधवारी रात्री पाकिस्तानने भारताच्या उत्तर आणि पश्चिम भागात १५ ठिकाणी हल्ला केल्यानंतर गुरुवारी फक्त हवाई संरक्षण रडार आणि यंत्रणांना लक्ष्य करण्यात आल्याचे भारतीय संरक्षण मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
भारत आणि पाकिस्तान या दोन देशात तणाव वाढत आहे. आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताकडून देखील जोरदार उत्तर दिले जात आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारतीय सैन्याने प्रथम ७ मे रोजी ९ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. त्यानंतर ८ मे च्या रात्री पाकिस्तानचे रावळपिंडी स्टेडियम उध्वस्त करण्यात आले आहे. या दरम्यान त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने २०२५ ची पाकिस्तान सुपर लीग यूएईमध्ये हलवण्यात आले आहे. या पाठोपाठ आता बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. भारतात सुरू असलेली आयपीएल २०२५ बीसीसीआयने स्थगित केली आहे.