Asia Cup 2025: 'This is a big surprise..' Former India captain upset over Shreyas Iyer being dropped..
Mohammad Azharuddin’s commentary on Shreyas Iyer : आशिया कप २०२५ साठी बीसीसीआयकडून भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून संघात १५ खेळाडूंची निवड केली आहे. ९ सप्टेंबरपासून सुरू होणऱ्या आशिया कपसाथी भारतीय संघाची धुरा सूर्यकुमार यादवकडे देण्यात आली आहे. तर उपकर्णधार म्हणून शुभमन गिल याची निवड केली आहे. बीसीसीआयच्या निवड समितीने निवडलेल्या संघावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्याचे कारण म्हणजे चॅम्पियन ट्रॉफी आणि आयपीएल च्या १८ व्यय हंगामात आपल्या बॅट ने छाप सोडणाऱ्या श्रेयस अय्यरला संघात स्थाने देण्यात आले नाही. यावरून समालोचक आकाश चोप्रा, टीम इंडियाचे माजी सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायरने देखील शंका उपस्थित केली आहे. अशात आता भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने देखील प्रतिक्रिया दिली आहे.
टीम इंडिया १० सप्टेंबरपासून आशिया कपमधील आपल्या मोहिमेला यूएई विरुद्ध सामना खेळून सुरवात करणार आहे. बीसीसीआयकडून करण्यात आलेली भारतीय संघाची निवड अनेकांना आश्चर्यचकित करणारी आहे. काहींच्या मते श्रेयस अय्यरला संघात स्थान न दिल्याने त्याच्यावर अन्याय झाला असल्याचे बोलले जात आहे. याच दरम्यान संघाच्या घोषणेनंतर, माजी भारतीय कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने यावर प्रतिक्रिया देत अझरुद्दीनने श्रेयस अय्यरला संघात निवडले न गेल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे. याबबत अझरुद्दीनने सोशल मीडियावर एक पोस्ट देखील शेअर केली आहे.
माजी भारतीय कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने आपल्या सोशल मीडिया च्या x प्लॅटफॉर्मवर लिहिले आहे की “श्रेयस अय्यरला संघातून वगळण्यात आले आहे, हे एक मोठे आश्चर्य आहे.” मोहम्मद अझरुद्दीनची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल देखील होत आहे.
हेही वाचा : Asia cup 2025 : भारतीय संघ नव्या ‘शुभ’ मनाच्या दिशेने; मिस्टर 360 चे कर्णधारपद तात्पुरते? बीसीसीआयकडून इशारा
Shreyas Iyer left out of the squad. Big surprise. #AsiaCup2025 @ShreyasIyer15
— Mohammed Azharuddin (@azharflicks) August 19, 2025
श्रेयस अय्यरने आयपीएल-२०२५ मध्ये शानदार कामगिरी करत सर्वांना प्रभावित केले आहे. त्याने १८ व्या हंगामातील १७ सामन्यांमध्ये ५०.३३ च्या सरासरीने ६०४ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याच्या बॅटने त्याने सहा अर्धशतके ठोकली आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्जने आयपीएल २०२५ च्या अंतिम फेरीत धडक मारली होती.
हेही वाचा : Asia cup 2025 : ‘त्यांच्यावर अन्याय झाला…’, भारतीय संघ निवडीवर आकाश चोप्राचा संताप
श्रेयस अय्यरने अय्यरने २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देण्यात भारतीय संघाकडून खेळताना मोठी भूमिका बजावली होती. ही स्पर्धा दुबईमध्ये खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत स्पर्धेत तो भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता आणि संघाला जेतेपद मिळवून देण्यात त्याने योगदान दिले होते. असे असून देखील आशिया कपसाठी त्याचा विचार करण्यात आलेला नाही. यावरून आता क्रीडा विश्वात