भारतीय संघ निवडीवर आकाश चोप्राचे भाष्य(फोटो-सोशल मिडिया
Asia cup 2025 : बीसीसीआयने आशिया कप २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारताचा १५ सदस्यीय संघ जाहीर झाला असून सूर्यकुमार यादवकडे संघाची धुरा देण्यात आली आहे. तर शुभमन गिलला संघाचा उपकर्णधार असणार आहे. आशिया कपसाठी निवडण्यात आलेल्या संघाबबत अनेकांना प्रश्न पडला आहे. भारताचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यरने अलीकडे स्थानिक क्रिकेट आणि आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करून देखील त्याला संघात स्थान देण्यात आले नाही. याबाबत आता बीसीसीआयवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहेत. अशातच माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राने संघाच्या निवडीवर भाष्य केला आहे. त्याच्या मते, गिलला उपकर्णधार बनवण्याचा अर्थ असा की भारत आता सर्व स्वरूपातील कर्णधाराच्या दिशेने वाटचाल करत आहे. तसेच त्याने अक्षर पटेलबद्दल बोलताना म्हटले आहे की त्याच्यावर अन्याय झाला आहे.
आशिया कपसाठी टीम इंडियाच्या निवडीबद्दल भाष्य करताना आकाश चोप्रा त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला की, “शुभमन गिल आता भारताच्या नवीन टी-२० संघाचा उपकर्णधार झाला आहे. त्याची केवळ आशिया कपसाठी निवड झाली नाही, तर त्याला उपकर्णधारपद देखील देण्यात आले आहे, याचा अर्थ काय? तर भारताने सर्व फॉरमॅटच्या कर्णधाराकडे वाटचाल सुरू केली असल्याचे हे संकेत आहे.”
पुढे आकाश चोप्रा म्हणाला की. “तो कसोटी संघाचा कर्णधार असून तो अखेर एकदिवसीय संघाचा कर्णधार होईल. म्हणजे याचा अर्थ भविष्यातील कर्णधाराची तयारी सुरू करण्यात आली आहे. ती दिशा आता स्पष्ट झाली आहे.” चोप्रा पुढे म्हणाला की, “जर तो उपकर्णधार असेल तर तो सलामीवीर देखील होईल. जर तो सलामीवीर झाला तर कोण खेळणार नाही. संजू सॅमसनला ११ मध्ये स्थान मिळण्याची शक्यता नाही आणि म्हणूनच तुम्हाला संघात जितेश शर्माचे नाव बघायाला मिळत आहे. कारण मधल्या फळीतील खेळाडूची गरज असणार आहे.”
चोप्रा म्हणाला की “जितेशला त्याच्या कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे. त्याने आरसीबीसाठी चांगली कामगिरी केली आहे. त्याला संघाला जेतेपद मिळाले आणि आता तो भारतीय संघाचा भाग बनला आहे.” पुढे बोलताना चोप्रा म्हणाला की.”श्रेयस अय्यरसाठी संघात जागा नाही. आता याचा अर्थ काय घ्यावा? संघाची निवड स्लॉटनुसार करण्यात आली आहे. तिलक तिसऱ्या क्रमांकावर आहे, सूर्या चौथ्या क्रमांकावर येईल अक्षर पाचव्या क्रमांकावर खेळवणार खेळतो, हार्दिक सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करतो. त्यामुळे अय्यर त्यात कुठेच बसत नाही. म्हणून त्यांनी त्याला संधी दिली नाही. त्याने सर्व काही आजवर व्यवस्थित केले आहे. पण त्याला संघात जागा मिळत नाही.”
हेही वाचा : Asia cup 2025 : ‘आशिया कपमधून बाहेर ठेवणे..’,अभिषेक शर्मा-संजू सॅमसनबाबत अजित आगरकरकडून मोठा खुलासा..
अक्षर पटेल संघाचा उपकर्णधार होता, पण आता गिलला ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यावर आकाश चोप्रा म्हणाला की, “तुम्हाला अक्षर पटेलबद्दल भावना असायला हव्या होत्या, कारण त्याने काहीही चुकीचे केलेले आही. तो संघाचा उपकर्णधारही होता, पण आता तो उपकर्णधार नसणार. त्याच्यावर थोडा अन्याय झाला. संघ ठीक दिसत आहे.”