Asia Cup 2025: That Shahid Afridi, he will spit poison! Watching 'this' video before the India-Pakistan match will make your blood boil
Asia cup 2025 : आशिया कप २०२५(Asia cup 2025 )स्पर्धेला सुरुवात झाली असून भारत आणि पाकिस्तानमधील सामना १४ सप्टेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. या सामन्याकडे सर्वांच्या नजरा असणार आहे. या बहुप्रतिक्षित सामन्यापूर्वी, माजी पाकिस्तानी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी पुन्हा एकदा त्याच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आला आहे. शाहिद आफ्रिदी नेहमीच भारताविरुद्ध वादग्रस्त विधान करण्यात पटाईत आहे. आता देखील त्याने असेच काहीसे विधान केले आहे. यावेळआय त्याने एका माजी भारतीय खेळाडूला टार्गेट केले आहे.
पाकिस्तानी टीव्ही चॅनेलवरील एका क्रीडा कार्यक्रमा दरम्यान आफ्रिदीने भारत आणि भारतीय खेळाडूंबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये आफ्रिदी असे बोलताना दिसत आहे की, भारतात खेळाडूंना त्यांची घरे जाळण्याच्या धमक्या देण्यात येतात. तिथे लोक खेळाडूंच्या घरी पोहोचतात आणि त्यांना धमकावतात.
हा पाकिस्तानी खेळाडू पुढे म्हणाला की, असे काही लोक आहेत जे सतत ते भारतीय असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतात. हीच त्यांची खरी ओळख आहे. आता तो आपल्याला आशिया कपमध्ये समालोचन करताना दिसत आहे.
शाहिद आफ्रिदीने एका टीव्ही शो दरम्यान भारतीय दिग्गज इरफान पठाणवर लक्ष्य केले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओ क्लिपमध्ये त्याने त्याच्याकडून ज्या खेळाडूबद्दल भाष्य करण्यात आले आहे भारतीय खेळाडू इरफान पठाण आहे. कारण आशिया कपमध्ये इरफानचा सोनी नेटवर्कच्या समालोचन पॅनेलमध्ये समावेश आहे.
Shahid Afridi said, “Some players are still proving that they are Indians. Ever since they were born, they’ve been showing that we are Indians.”
pic.twitter.com/hYjUDkN9AD— Sheri. (@CallMeSheri1_) September 11, 2025
शाहिद आफ्रिदीच्या विधानामुळे भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे. भारतीय चाहते वारंवार वादग्रस्त टिप्पण्या करणाऱ्या आफ्रिदीवर वातावरण बिघडवल्याचा आरोप करत असतात. तर दुसऱ्या बाजूने पाकिस्तानमधील शाहिद आफ्रिदीचे समर्थक त्याला निर्भयपणे सत्य बोलण्याचे धाडस असणारा खेळाडू म्हणत असतात.
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्समध्ये इरफान पठाण, शिखर धवन, हरभजन सिंग आणि युवराज सिंग यासारख्या इंडिया चॅम्पियन संघातील भारतीय दिग्गज खेळाडूंकडून पाकिस्तानविरुद्ध सामना खेळण्यास नकार देण्यात आला होता. भारतीय खेळाडूंनी घेतलेल्या या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानवर बरीच टीका झाली होती.
या निर्णयाचे भारतीय चाहत्यांकडून देखील कौतुक करण्यात आले होते आणि म्हटले होते की, दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या आणि निष्पाप लोकांची हत्या करणाऱ्या देशासोबत कोणत्याही प्रकारचे क्रीडा संबंध ठेवण्यात येऊ नये. असे मानले जात आहे की, बहिष्कारापासून शाहिद आफ्रिदी सतत चिथावणीखोर विधाने करत असल्याचे दिसत आहे.