
Asia Cup 2025 (Photo Credit - X)
ग्रुप ए मध्ये सर्वात आधी ओमानचा प्रवास संपला. त्यानंतर पाकिस्तानकडून झालेल्या पराभवामुळे यूएई संघही स्पर्धेतून बाहेर पडला. ग्रुप बी मध्ये हाँगकाँगचा संघ सर्वात आधी बाहेर झाला, कारण त्यांना एकही सामना जिंकता आला नाही. ओमान आणि हाँगकाँगने एकही विजय मिळवला नाही, तर यूएईने एक सामना जिंकला आणि दोन गमावले.
Points Table 📊 Pakistan climb the table and officially qualify for the Super 4! The action intensifies in Group B, as three teams are in the fray & it could come down to NRR in the final league clash. ⚔️#PAKvUAE #DPWorldAsiaCup2025 #ACC pic.twitter.com/K1DSHbsiOT — AsianCricketCouncil (@ACCMedia1) September 18, 2025
सुपर-४ मध्ये ग्रुप बी मधून कोण पात्र ठरेल, हे आज बऱ्याच अंशी स्पष्ट होईल. १८ सप्टेंबर रोजी म्हणजे आज श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात एक अत्यंत महत्त्वाचा सामना खेळला जाईल. या सामन्याच्या निकालावरच सुपर-४ मध्ये प्रवेश करणाऱ्या दुसऱ्या संघाचे भवितव्य अवलंबून आहे.