Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PAK vs SL: पाकिस्तान-श्रीलंका ‘करो या मरो’ लढत, पराभूत होणाऱ्या संघाला थेट घरचा रस्ता!

आशिया कप २०२५ मध्ये आज पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात ‘करो या मरो’ची लढत होणार आहे. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर जाईल. अंतिम फेरीच्या शर्यतीत कोण टिकणार, कोण बाहेर पडणार, जाणून घ्या.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 22, 2025 | 08:39 PM
पाकिस्तान-श्रीलंका 'करो या मरो' लढत (Photo Credit- X)

पाकिस्तान-श्रीलंका 'करो या मरो' लढत (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:
  • पाकिस्तान-श्रीलंका ‘करो या मरो’ लढत
  • पराभूत होणाऱ्या संघाला थेट घरचा रस्ता!
  • अंतिम फेरीच्या शर्यतीचे समीकरण

PAK vs SL: सुपर-४ फेरीतील पहिल्या सामन्यात पराभव पत्करल्यानंतर आता पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन्ही संघांसाठी पुढील लढत ‘करो या मरो’ ची झाली आहे. उद्या, मंगळवारी (२३ सप्टेंबर) हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध मैदानात उतरतील. या सामन्यात विजय मिळवणारा संघ अंतिम फेरीच्या शर्यतीत आपले स्थान मजबूत करेल, तर पराभूत होणाऱ्या संघाचा आशिया कप २०२५ मधून पत्ता कट होईल.

दोन्ही संघांची सद्यस्थिती आणि चिंता

श्रीलंका ग्रुप स्टेजमध्ये अपराजित राहिली होती, पण सुपर-४ च्या पहिल्या सामन्यात त्यांना बांगलादेशकडून चार गडी राखून पराभव पत्करावा लागला. यामुळे टी-२० एशिया कपमधील त्यांचे सलग आठ सामन्यांचे विजयी अभियान थांबले. दुसरीकडे, पाकिस्तानचा संघ मैदानाबाहेरील वादामुळे अधिक चर्चेत राहिला आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात त्यांना पुन्हा एकदा एकतर्फी पराभव स्वीकारावा लागला.

Points Table 📊 The Super 4️⃣s are off to a thrilling start, with 🇮🇳 & 🇧🇩 recording important wins in their respective rivalry clashes and occupy top spots.#DPWorldAsiaCup2025 #ACC pic.twitter.com/eRw9yRHzco — AsianCricketCouncil (@ACCMedia1) September 22, 2025


रिकव्हरीसाठी पुरेसा वेळ मिळाला नसला तरी, सलमान आगाच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघाला कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवणे अनिवार्य आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात त्यांच्या अव्वल फळीतील फलंदाजांनी (साहिबजादा फरहान, फखर जमां, सईम अयूब) चांगल्या सुरुवातीची आशा दिली होती, मात्र त्यानंतर मधली फळी लवकर कोसळली. दुसरीकडे, श्रीलंकेची सर्वात मोठी चिंता कमकुवत मधली फळी आहे. त्यांच्यासाठी दासुन शनाका वगळता इतर फलंदाज खास कामगिरी करू शकलेले नाहीत.

अंतिम फेरीच्या शर्यतीचे समीकरण

गुणतालिकेत भारत आणि बांगलादेश प्रत्येकी २ गुणांसह अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत, तर श्रीलंका आणि पाकिस्तान अजूनही गुणांचे खाते उघडलेले नाही.

पाकिस्तानला अंतिम फेरी गाठण्यासाठी समीकरण:

  • पाकिस्तानला कोणत्याही परिस्थितीत श्रीलंकेचा पराभव करणे आवश्यक आहे. जर ते हरले, तर त्यांचे स्पर्धेतून बाहेर पडणे जवळपास निश्चित होईल.
  • श्रीलंकेला हरवल्यानंतर पाकिस्तानचा पुढील सामना गुरुवारी बांगलादेशशी होईल.
  • बांगलादेशविरुद्ध विजय मिळाल्यास पाकिस्तानचे आशिया कप २०२५ च्या अंतिम फेरीतील स्थान जवळपास निश्चित होईल.

IND vs PAK : पाकिस्तानने लाजच सोडली! भारताकडून पराभव जिव्हारी; पंचांना टार्गेट केल्याने नव्या वादाला जन्म 

बांगलादेश आणि श्रीलंकाही शर्यतीत

बांगलादेश किंवा श्रीलंका हे दोन्ही संघ अंतिम फेरीच्या शर्यतीतून अजून बाहेर झालेले नाहीत. बांगलादेशने आधीच एक विजय मिळवला आहे. तर श्रीलंकेकडे कोणत्याही संघाला धक्का देण्याची क्षमता आहे.

दोन्ही संघाची खेळाडू

पाकिस्तानः सलमान अली आगा (कर्णधार), अबरार अहमद, फहीम अश्रफ, फखर जमान, हारिस रौफ, हसन अली, हसन नवाज, हुसैन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद हरिस, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, साहिबजादा फरहान, सैम अयुब, सलमान मिर्झा, शाहीन शाह आफ्रिदी, सुफयान मोकीम.

श्रीलंका: चारिथ असलंका (कर्णधार), पाथुम निसांका, कुसल मेंडिस, कुसल परेरा, नुवानिंदू फर्नांडो, कामिंदू मेंडिस, कामिल मिश्रा, दासुन शनाका, जेनिथ लियानागे, चमिका करुणारत्ने, दुनिथ वेललागे, वानिंदू हसरंगा, महेश थेक्षाना, दुष्मंथा चमीरा, बिनुरा फर्नांडो, नुवान तुषारा, मथीशा पाथीराना.

Web Title: Asia cup pakistan srilanka elimination match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2025 | 08:39 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • cricket
  • pakistan
  • Sports
  • Sports News
  • Sri Lanka

संबंधित बातम्या

IND VS BAN : ‘भारताला पराभूत करू…’, बांगलादेशची शिरजोरी, सामन्यायाधीच प्रशिक्षकाने उधळली मुक्ताफळे 
1

IND VS BAN : ‘भारताला पराभूत करू…’, बांगलादेशची शिरजोरी, सामन्यायाधीच प्रशिक्षकाने उधळली मुक्ताफळे 

Asia Cup 2025 Super 4 : पाकिस्तानचा TOSS जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय; श्रीलंका करणार फलंदाजी 
2

Asia Cup 2025 Super 4 : पाकिस्तानचा TOSS जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय; श्रीलंका करणार फलंदाजी 

Umpire Dickie Bird Passes Away: क्रिकेट जगतातील महान अंपायर डिकी बर्ड यांचे निधन; ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3

Umpire Dickie Bird Passes Away: क्रिकेट जगतातील महान अंपायर डिकी बर्ड यांचे निधन; ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

IND vs PAK : ‘पुढे काही सांगायचच नाही…’अभिषेक शर्माकडून पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई पाहून आनंद महिंद्रा चकित..
4

IND vs PAK : ‘पुढे काही सांगायचच नाही…’अभिषेक शर्माकडून पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई पाहून आनंद महिंद्रा चकित..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.