Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asia Cup Trophy Row: टीम इंडिया मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी कधी घेणार? BCCI ने दिलं स्पष्ट उत्तर

When BCCI Will Take Trophy From Mohsin Naqvi: महिला आशिया कप जिंकल्यानंतर टीम इंडियाला ट्रॉफी मिळाली नाही. तसेच , अद्याप पुरुष आशिया कपची ट्रॉफीही मिळालेली नाही. आता बीसीसीआयने यावर स्पष्टीकरण दिले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 15, 2026 | 03:59 PM
BCCI Will Take Trophy From Mohsin Naqvi

BCCI Will Take Trophy From Mohsin Naqvi

Follow Us
Follow Us:
  • ट्रॉफीचा वाद पुन्हा चर्चेत
  • टीम इंडियाला ट्रॉफी का मिळाली नाही?
  • BCCIने सांगितले कारण
टीम इंडियाने महिला आशिया कप २०२६ मध्ये शानदार कामगिरी करत श्रीलंकेचा पराभव करून विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेवर ७२ धावांनी मात करत आठव्यांदा आशिया कपवर आपले नाव कोरले. मात्र, विजेतेपद मिळवल्यानंतरही भारतीय महिला संघाच्या हातात अद्याप ट्रॉफी आलेली नाही. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी पुरुष संघाने जिंकलेली आशिया कपची ट्रॉफीही भारताकडे अद्याप नाही. भारतीय संघाने एसीसी प्रमुख आणि पाकिस्तानी कॅबिनेट मंत्री मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता.या ट्रॉफी कधी परत केल्या जातील, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता बीसीसीआयने स्पष्टीकरण दिले आहे.

Shahid Afridi: शाहिद आफ्रिदीची पाकिस्तान क्रिकेटमध्ये पुन्हा एन्ट्री? माजी खेळाडूचा मोठा खुलासा

भारताला आशिया कपची ट्रॉफी कधी मिळेल?

बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी पीटीआयला सांगितले की, भारतीय संघाला लवकरच पुरुष आणि महिला आशिया कपच्या ट्रॉफी मिळतील. त्यांच्या वक्तव्यावरून असे सूचित होते की, संघाने ट्रॉफी मिळवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सैकिया म्हणाले की, ‘आशा आहे की, आम्हाला लवकरच केवळ महिला आशिया कपची ट्रॉफीच नाही, तर पुरुष आशिया कपची ट्रॉफीसुद्धा मिळेल, जी गेल्या वर्षभरापासून आमच्याकडे नाही. आम्हाला लवकरच दोन्ही ट्रॉफी मिळतील.’

बीसीसीआयचा प्रस्ताव फेटाळला

देवजीत सैकिया म्हणाले की, बीसीसीआयने सुचवले होते की आशियाई क्रिकेट परिषदेचे उपाध्यक्ष खालिद अल जरुनी यांनी विजेत्या संघाला ट्रॉफी प्रदान करावी. सैकिया म्हणाले, ‘आमची भूमिका अगदी स्पष्ट होती. जो आपल्या देशाच्या हितासाठी काम करत नाही, अशा व्यक्तीकडून आम्ही ट्रॉफी स्वीकारणार नव्हतो. आम्ही सुचवले होते की, एसीसीचे उपाध्यक्ष आणि अमिरात क्रिकेट बोर्डाचे अधिकारी खालिद अल जरुनी यांनी ट्रॉफी प्रदान करावी.परंतु, आमची सूचना स्वीकारली गेली नाही. त्यामुळे, ट्रॉफीवर बहिष्कार टाकण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.’

मोहसिन नक्वी यांचा अपमान

पुरुष आशिया कपमध्ये टीम इंडियाच्या विजयानंतर मोहसिन नक्वीने ट्रॉफी स्वतःसोबत नेली, ज्यामुळे त्याला ‘ट्रॉफी चोर’ हे टोपणनाव मिळाले. अगदी महिला आशिया कप २०२६ मध्ये सुद्धा, बीसीसीआयने पूर्वसूचना देऊनही मोहसिन नक्वीने ट्रॉफी प्रदान करण्याचा आग्रह धरला. भारतीय महिला संघ ट्रॉफी स्वीकारायला गेला नाही, त्यामुळे नक्वीला सुमारे ४५ मिनिटे थांबावे लागले. लाज वाटल्यामुळे त्याला स्टेडियम सोडावे लागले. सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भारतीय चाहते मोहसिन नक्वीला ‘ट्रॉफी चोर’ म्हणून चिडवत आहेत.

Kranti gaud: क्रांती गौडला ICC चा दणका! फायनलमध्ये श्रीलंकन खेळाडूला केलेल्या ‘त्या’ इशाऱ्याची मिळाली शिक्षा

Web Title: Asia cup trophy row team when bcci will take asia cup trophy from mohsin naqvi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 03:57 PM

Topics:  

  • bcci
  • Mohsin Naqvi
  • Women's Asia Cup 2026

संबंधित बातम्या

WPL 2027 चं वेळापत्रक जाहीर! ट्रॉफीसाठी भिडणार पाच संघ; कधी, कुठे अन् केव्हा रंगणार थरार?  पाहा संपूर्ण शेड्यूल
1

WPL 2027 चं वेळापत्रक जाहीर! ट्रॉफीसाठी भिडणार पाच संघ; कधी, कुठे अन् केव्हा रंगणार थरार? पाहा संपूर्ण शेड्यूल

Rishabh Pant न्यूझीलंडच्या विमानात बसणार की नाही? फिटनेस टेस्टमध्ये अपयशी अन्…; 48 तासांमध्ये होणार निर्णय
2

Rishabh Pant न्यूझीलंडच्या विमानात बसणार की नाही? फिटनेस टेस्टमध्ये अपयशी अन्…; 48 तासांमध्ये होणार निर्णय

भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ! ‘… मी थकलोय’; Gautam Gambhir च्या ‘त्या’ विधानाने चर्चांना उधाण
3

भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ! ‘… मी थकलोय’; Gautam Gambhir च्या ‘त्या’ विधानाने चर्चांना उधाण

U19 आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा! द्रविड-सहवागच्या लेकांची संघात एन्ट्री, पाहा संपूर्ण स्क्वॉड
4

U19 आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा! द्रविड-सहवागच्या लेकांची संघात एन्ट्री, पाहा संपूर्ण स्क्वॉड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.