Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

U19 आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा! द्रविड-सहवागच्या लेकांची संघात एन्ट्री, पाहा संपूर्ण स्क्वॉड

Anvay Dravid Aaryavir Sehwag Selected for U19 Asia cup: बीसीसीआयने १९ वर्षांखालील आशिया कप २०२६ साठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या स्पर्धेसाठी १५ सदस्यीय भारतीय १९ वर्षांखालील संघाची निवड करण्यात आली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 30, 2026 | 05:19 PM
Anvay Dravid Aaryavir Sehwag

Anvay Dravid Aaryavir Sehwag

Follow Us
Follow Us:
  • U19 आशिया कपसाठी भारताचा संघ जाहीर
  • द्रविड-सहवागच्या मुलांची लागली वर्णी
  • वडिलांनी गाजवलं क्रिकेटविश्व, आता मुलांची वेळ
U19 Asia cup: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) १९ वर्षांखालील आशिया कप २०२६ (Asia Cup 2026) साठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. ५ ते १४ नोव्हेंबर दरम्यान ओमानमध्ये होणाऱ्या या मोठ्या स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघाची निवड करण्यात आली आहे. भारतीय संघाचे कर्णधारपद लक्ष्य रायचंदानीकडे, तर उपकर्णधारपदाची जबाबदारी यशवर्धन सिंग चौहानकडे देण्यात आली आहे. या संघात माजी भारतीय क्रिकेटपटू राहुल द्रविडचा मुलगा अन्वय द्रविड आणि वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवाग यांचाही समावेश करण्यात आला आहे.

IND vs NZ 4th T20 Live: न्यूझीलंडने फोडलं; Philips एअरलाइन्सने ठोकले तुफानी शतक; भारताला 260 रन्सचे टार्गेट

भारत नेपाळविरुद्ध करणार मोहिमेची सुरुवात

ज्युनियर क्रिकेट समितीने ५ ते १४ नोव्हेंबर दरम्यान ओमानमधील मस्कत येथे होणाऱ्या एसीसी पुरुष अंडर-१९ आशिया कपसाठी १५ सदस्यीय भारतीय अंडर-१९ संघाची घोषणा केली आहे. भारताला ‘अ’ गटात संयुक्त अरब अमिरात (UAE), नेपाळ आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान यांच्यासोबत स्थान देण्यात आले आहे. तर ‘ब’ गटात बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि मलेशिया यांचा समावेश आहे. ‘अ’ आणि ‘ब’ गटातील अव्वल दोन संघ १२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील, तर अंतिम सामना १४ नोव्हेंबर रोजी खेळला जाईल.

भारत आपल्या मोहिमेची सुरुवात ६ नोव्हेंबर रोजी नेपाळविरुद्ध करेल. त्यानंतर टीम इंडिया ८ नोव्हेंबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना करेल. यानंतर, १० नोव्हेंबरला युएईविरुद्ध सामना खेळला जाईल.

आर्यवीर सेहवाग अन्वय द्रविडचा संघात प्रवेश

भारताचे माजी महान सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवाग याचा मुलगा आर्यवीर सेहवाग याची भारतीय १९ वर्षांखालील संघात निवड झाली आहे. आर्यवीरने अलीकडील देशांतर्गत १९ वर्षांखालील स्पर्धा आणि इंडिया ‘अ’ संघाच्या सामन्यांमध्ये आपल्या आक्रमक आणि सातत्यपूर्ण फलंदाजीने लक्ष वेधून घेतले होते.

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि महान फलंदाज राहुल द्रविड याचा मुलगा अन्वय द्रविड याचाही संघात विकेटकीपर-फलंदाज म्हणून निवड झाली आहे. देशांतर्गत आणि भारत U19 सराव सामन्यांमध्ये अन्वयने आपल्या उत्कृष्ट फलंदाजीने आणि अप्रतिम विकेटकीपिंगने सर्वांना प्रभावित केले.

भारताचा अंडर-१९ संघ: लक्ष्य रायचंदानी (कर्णधार), आर्यवीर सेहवाग, व्ही.के. विनीत, यशवर्धन सिंग चौहान (उपकर्णधार), कुशाग्र ओझा, अर्जुन राजपूत, मनाल चौहान, अन्वय द्रविड (यष्टीरक्षक), रजत बघेल (यष्टीरक्षक), आर्यन सवसानी, मोहित उल्वा, काव्या पटेल, शविन विनोद, ईशान सूद.

IPL 2027 आधी मुंबई इंडियन्सचा मोठा गेमप्लॅन! पोलार्डनंतर आता रॉबिन उथप्पाकडे मोठी जबाबदारी; मॅक्लेनघनचीही टीममध्ये एन्ट्री

Web Title: U19 asia cup 2026 bcci announced india squad anvay dravid aaryavir sehwag selected pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 05:18 PM

Topics:  

  • Aaryavir Sehwag
  • Anvay Dravid
  • bcci
  • Rahul Dravid

संबंधित बातम्या

IPL 2027 Auction: खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडणार! फ्रँचायझींची तयारी सुरू; मिनी ऑक्शनची तारीख समोर
1

IPL 2027 Auction: खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडणार! फ्रँचायझींची तयारी सुरू; मिनी ऑक्शनची तारीख समोर

Asia Cup :  भारत-पाक पुन्हा भिडणार, Cricket Fans महासंग्रामाची ‘ही’ तारीख नोट करून ठेवा
2

Asia Cup : भारत-पाक पुन्हा भिडणार, Cricket Fans महासंग्रामाची ‘ही’ तारीख नोट करून ठेवा

ज्युनिअर क्रिकेटमध्ये नव्या पर्वाची सुरुवात; Parvinder Awana निवड समितीचे अध्यक्ष, BCCI चा मोठा निर्णय
3

ज्युनिअर क्रिकेटमध्ये नव्या पर्वाची सुरुवात; Parvinder Awana निवड समितीचे अध्यक्ष, BCCI चा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.