अफगाणिस्तानने २०२६ साठी सर्व संघ सज्ज होत आहेत. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा आधीच झाली आहे. १७ ऑगस्ट रोजी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानेही आपला संघ जाहीर केला. संघात पंधरा खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. २०२६ च्या आशियाई खेळांसाठीच्या अफगाणिस्तान संघात बहुतांश युवा खेळाडूंचा समावेश आहे. तसेच, काही असेही खेळाडू आहेत ज्यांनी यापूर्वी अफगाणिस्तानच्या वरिष्ठ संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
अफगाणिस्तानने २०२६ च्या आशियाई खेळांसाठी दरवेश रसूलीला कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अफगाणिस्तानचे प्रतिनिधित्व केलेल्या नजीबुल्लाह जादरान आणि करीम जन्नत यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे. राशीद खान, रहमानुल्लाह गुरबाज आणि अझमतुल्लाह उमरझाई यांना विश्रांती देण्यात आली असून, संघात स्थान दिलेले नाही. मोहम्मद अक्रम, हसन इसाखिल, खालिद तनीवाल, इम्रान मीर आणि फैसल खान शिनोझादा यांसारख्या युवा खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे.
२०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुषांचे क्रिकेट सामने १७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर दरम्यान खेळले जातील. अफगाणिस्तानला जपान आणि नेपाळसोबत ‘अ’ गटात स्थान देण्यात आले आहे. ‘ब’ गटात हाँगकाँग, चीन, मलेशिया आणि ओमान यांचाही समावेश आहे. भारत, पाकिस्तान, बांग्लादेश आणि श्रीलंका थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करतील. उपांत्य फेरीचे सामने २० सप्टेंबर रोजी खेळले जातील. कांस्य आणि सुवर्णपदकाचे सामने २२ सप्टेंबर रोजी खेळले जातील. भारतीय चाहते या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत आहेत.
आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानची कामगिरी उत्कृष्ट आहे. या संघाने २०१०, २०१४ आणि २०२२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते. आता त्यांचे लक्ष पहिल्यांदाच सुवर्ण पदक जिंकण्यावर असेल. पुरुष आणि महिला या दोन्ही गटांमध्ये एकूण १० संघ सहभागी होतील. भारत पुरुष आणि महिला या दोन्ही गटांमध्ये सध्याचा गतविजेता आहे.
दरवेश रसूली (कर्णधार), मोहम्मद इशाक (यष्टीरक्षक), मोहम्मद अकरम, हसन इस्खिल, खालिद तानिवाल, इमरान मीर, फैसल खान शिनोजादा, नजीबुल्ला जादरान, फरमानुल्लाह सफी, इस्मत आलम, करीम जनत, नांग्याल खरोती, अरब गुल मोमंद, फरीदून दाऊदझाई, अब्दुल्लाह अहमदझई.