Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Games 2026: फायनलचा काउंटडाऊन सुरू! गोल्ड मेडलसाठी IND vs PAK भिडणार; कधी अन् कुठे पाहाल Live ॲक्शन?

Ind vs Pak final Asian Games 2026 Schedule: आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ च्या सुवर्णपदकाच्या सामन्यात भारतीय संघ कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा सामना करेल. दोन्ही संघांमधील हा हाय-व्होल्टेज सामना कधी, कुठे आणि किती वाजता रंगणार, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 02, 2026 | 03:14 PM
Ind vs Pak final Asian Games 2026

Ind vs Pak final Asian Games 2026

Follow Us
Follow Us:
  • भारत-पाकिस्तान आमनेसामने
  • Asian Games फायनल किती वाजता?
  • कुठे पाहाल Live सामना?
आशियाई क्रीडा २०२६ च्या (Asian Games 2026) मध्ये पुरुष क्रिकेटचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जाणार आहे. हे दोन्ही संघ ३ ऑक्टोबर रोजी सुवर्णपदकासाठी एकमेकांविरुद्ध खेळतील. गतविजेत्या भारताने उपांत्य फेरीत श्रीलंकेला १२४ धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत करून अंतिम फेरीत स्थान मिळवले. तर, पाकिस्तानने बांग्लादेशला विकेट्सने पराभूत करून विजेतेपदाच्या सामन्यात आपले स्थान निश्चित केले. आता, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ पाकिस्तानला पराभूत करून सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकण्याच्या प्रयत्नात असेल. भारत-पाकिस्तानचा हा महामुकाबला कधी आणि कुठे रंगणार आहे. जाणून घेऊयात.

Asian Games 2026: कोरियाचा गड भेदला, ४८ वर्षांचा विक्रम मोडला! कुमकुम-अंकिता-कीर्तीचा सुवर्णवेध; रिकर्व्हमध्ये भारताला पहिले गोल्ड

भारत-पाकिस्तान सामना केव्हा आणि कुठे खेळला जाईल?

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मधील पुरुषांच्या क्रिकेटचा सुवर्णपदकाचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात शनिवार, ३ ऑक्टोबर २०२६ रोजी खेळला जाईल. दोन्ही संघांमधील हा हाय-व्होल्टेज सामना जपानमधील निशिन येथील कोरोगी स्पोर्ट्स पार्क येथे आयोजित केला जाईल.सुवर्णपदकाचा हा स्थानिक वेळेनुसार दुपारी १:३० वाजता सुरू होईल. तर, भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी १०:०० वाजता सुरू होईल. टॉस अर्धा तास आधी, म्हणजेच सकाळी ९:३० वाजता होईल. भारताचे कर्णधारपद श्रेयस अय्यर भूषवेल, तर पाकिस्तानचे नेतृत्व साहिबजादा फरहान करेल.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना कुठे पाहाल?

भारत विरुद्ध पाकिस्तान अंतिम सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर थेट प्रक्षेपित केला जाईल. हा सामना सोनी स्पोर्ट्स ३ वर हिंदीमध्ये, तर सोनी स्पोर्ट्स ४ वर तमिळ, तेलगू आणि कन्नडमध्ये प्रसारित केला जाईल. याव्यतिरिक्त, सामन्याचे थेट प्रक्षेपण डीडी स्पोर्ट्सवर उपलब्ध असेल. भारतीय चाहते डीडी स्पोर्ट्स वाहिनीवर सामना पूर्णपणे विनामूल्य पाहू शकतात.

जर तुम्हाला भारत-पाकिस्तान सामना तुमच्या मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेट किंवा स्मार्ट टीव्हीवर पाहायचा असेल, तर SonyLIV वर थेट प्रक्षेपण (लाइव्ह स्ट्रीमिंग) उपलब्ध असेल. चाहते SonyLIV ॲप आणि वेबसाइटद्वारे सामन्याचा थेट आनंद घेऊ शकतात.

हेड टू हेड रेकॉर्ड

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण १७ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले असून, त्यांत भारतीय संघाचे वर्चस्व राहिले आहे. भारताने यापैकी १४ सामने जिंकले असून, पाकिस्तानने तीन सामने जिंकले आहेत.

Asian Games 2026: सुवर्ण हुकले, इतिहास घडला! कुमकुम-धीरजची तिरंदाजीत कमाल; रिकर्व्हमध्ये भारताला पहिल्यांदाच रौप्य

Web Title: Asian games 2026 ind vs pak final match timing live streaming where to watch

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 03:14 PM

Topics:  

  • asian games 2026
  • IND VS PAK
  • India vs Pakistan

संबंधित बातम्या

Asian Games 2026 : बॉक्सिंगमध्ये भारताला दुसरे सुवर्ण पदक, परवनी हुड्डाचा दमदार ‘पंच’
1

Asian Games 2026 : बॉक्सिंगमध्ये भारताला दुसरे सुवर्ण पदक, परवनी हुड्डाचा दमदार ‘पंच’

Asian Games 2026 : डिंगी सेलिंगमध्ये नेत्रा कुमाननची कमाल, भारताला मिळवून दिलं कांस्य पदक
2

Asian Games 2026 : डिंगी सेलिंगमध्ये नेत्रा कुमाननची कमाल, भारताला मिळवून दिलं कांस्य पदक

Asian Games 2026: कोरियाचा गड भेदला, ४८ वर्षांचा विक्रम मोडला! कुमकुम-अंकिता-कीर्तीचा सुवर्णवेध; रिकर्व्हमध्ये भारताला पहिले गोल्ड
3

Asian Games 2026: कोरियाचा गड भेदला, ४८ वर्षांचा विक्रम मोडला! कुमकुम-अंकिता-कीर्तीचा सुवर्णवेध; रिकर्व्हमध्ये भारताला पहिले गोल्ड

Asian Games 2026: सुवर्ण हुकले, इतिहास घडला! कुमकुम-धीरजची तिरंदाजीत कमाल; रिकर्व्हमध्ये भारताला पहिल्यांदाच रौप्य
4

Asian Games 2026: सुवर्ण हुकले, इतिहास घडला! कुमकुम-धीरजची तिरंदाजीत कमाल; रिकर्व्हमध्ये भारताला पहिल्यांदाच रौप्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.