Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Games 2026: भारताच्या पदक खात्याचा श्रीगणेशा! इलावेनिल-सोनम-विदर्साचा अचूक निशाणा, १० मीटर एअर रायफलमध्ये रौप्यपदक

India Women Win Silver 10m Air Rifle At Asian Games 2026: भारतीय संघाने २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पदकाची कमाई केली. भारताच्या महिलांच्या १०-मीटर एअर रायफल एलावेनिल वलारिवन, सोनम म्हस्कर आणि विदरसा या संघाने रौप्य पदक जिंकले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 20, 2026 | 03:15 PM
India Women Win Silver 10m Air Rifle

India Women Win Silver 10m Air Rifle

Follow Us
Follow Us:
  • पदकाच्या शर्यतीत भारताची दमदार सुरुवात
  • महिला १० मीटर एअर रायफल टीमचा रौप्यवेध
  • एलावेनिलला वैयक्तिकही स्पर्धेतही रौप्य
आयची-नागोया आशियाई क्रीडा ( Asian Games 2026) स्पर्धेला सुरुवात झाली आहे. भारताने आपल्या पदक मोहिमेला सुरुवात केली आहे. भारताला पहिले पदक नेमबाजी स्पर्धेत मिळाले. भारता्चाय एलावेनिल वलारिवन, सोनम मस्कर आणि विदरसा कोचलुमकल या त्रिकुटाने महिलांच्या १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्य पदक जिंकले. १६ संघांच्या या स्पर्धेत भारतीय संघाने एकूण १८९७ गुणांसह दुसरे स्थान पटकावले. दरम्यान, चीनच्या महिला संघाने याच स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले.

IND W vs BAN W: बांग्लादेशला धूळ चारत टीम इंडिया Asian Games 2026 च्या फायनलमध्ये; आता श्रीलंकेशी ‘गोल्ड मेडल’ची लढाई

भारताने जिंकले रौप्य पदक

एलावेनिल वलारिवन, सोनम म्हस्कर आणि विनोद विदरसा यांनी मिळून एकूण १८९८ गुण मिळवले. चीनने १९०४.२ गुणांच्या विश्वविक्रमी गुणसंख्येसह सुवर्णपदक पटकावले. यजमान जपान १८९७.१ गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिला. भारत आणि जपान यांच्यात केवळ ०.१ गुणांचा फरक होता. आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मधील भारताचे हे पहिले पदक आहे. परंतु, सुचिका तारियालने एमएमए (MMA) मध्ये उपांत्य फेरी गाठल्यामुळे भारताने आधीच एक पदक निश्चित केले होते.

सहा सीरीजमधील भारताची कामगिरी

पहिल्या सीरीजनंतर, भारतीय त्रिकुटाने एकूण ३१६.९ गुण मिळवले. दुसऱ्या सीरीजमध्ये, संघाने ३१६.८ गुण मिळवले. तिसऱ्या मालिकेत, भारतीय नेमबाजांनी उत्तम कामगिरी करत ३१७.९ गुण मिळवले आणि एकूण धावसंख्या ९५१.६ वर नेली. चौथ्या सीरीजमध्ये, भारताने ३१६.२ गुण मिळवून एकूण धावसंख्या १२६७.८ वर नेली. पाचव्या सीरीजमध्ये संघाची धावसंख्या ३१४.८ होती, परंतु शेवटच्या सीरीजमध्ये ३१५.४ गुणांसह, भारतीय संघाने एकूण १८९७ गुण मिळवून रौप्य पदक पटकावले.

वैयक्तिक प्रकारातही एलावेनिल, सोनमची चमकदार कामगिरी

महिलांच्या १० मीटर एअर रायफल वैयक्तिक प्रकारातही एलावेनिल, सोनम आणि विदरसा यांनी चांगली कामगिरी केली. एलावेनिल वलारिवन आणि सोनम मस्कर यांनी अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली आहे. सोनमने ५७ नेमबाजांमध्ये ६३४.१ गुणांसह तिसरे स्थान पटकावले, तर एलावेनिलने ६३३.५ गुणांसह सातवे स्थान मिळवले. तिसरी भारतीय नेमबाज, विदरसा, ६३०.४ गुणांसह १२व्या स्थानावर राहिली आणि पहिल्याच फेरीत बाद झाली.

अखेरीस, भारतीय १० मीटर एअर रायफल महिला वैयक्तिक प्रकारात एलावेनिल वलारिवानने रौप्य पदकही पटकावले. सोनम म्हस्कर सहाव्या स्थानावर राहिली. यासह एलावेनिल वलारिवानने अवघ्या काही तासांत भारतासाठी दोन पदके जिंकली. मात्र, तिचे सुवर्णपदक केवळ ०.०६ सेकंदांनी हुकले. यासह, भारताच्या पदकतालिकेत आता दोन रौप्य पदकांची भर पडली आहे.

भारताच्या खात्यात दुसरे पदक

एलावेनिलचे रौप्यपदक हे २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचे दुसरे पदक आहे. यापूर्वी, एलावेनिल, सोनम आणि विदरसा या त्रिकुटाने महिलांच्या १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्यपदक जिंकले होते.

BCCI ने Ajit Agarkar चा केला गेम की स्वतःच सोडलं Chief Selector पद? समोर आली मोठी माहिती

Web Title: Asian games 2026 india women elavenil sonam won 10m air rifle silver medal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • asian games 2026
  • Shooting
  • Silver Medal

संबंधित बातम्या

Asian Games 2026 : भारतीय महिला हॉकी संघाने उज्बेकिस्तानला रडवले, १९-० अशा एकतर्फी विजयात दीपिकाचे दणादण ८ गोल
1

Asian Games 2026 : भारतीय महिला हॉकी संघाने उज्बेकिस्तानला रडवले, १९-० अशा एकतर्फी विजयात दीपिकाचे दणादण ८ गोल

IND W vs BAN W: बांग्लादेशला धूळ चारत टीम इंडिया Asian Games 2026 च्या फायनलमध्ये; आता श्रीलंकेशी ‘गोल्ड मेडल’ची लढाई
2

IND W vs BAN W: बांग्लादेशला धूळ चारत टीम इंडिया Asian Games 2026 च्या फायनलमध्ये; आता श्रीलंकेशी ‘गोल्ड मेडल’ची लढाई

Akshar patel : अफगाणिस्तानविरुद्धच्या चांगल्या कामगिरीचे फळ, अक्षर ठरला या ‘पदकाचा’ मानकरी
3

Akshar patel : अफगाणिस्तानविरुद्धच्या चांगल्या कामगिरीचे फळ, अक्षर ठरला या ‘पदकाचा’ मानकरी

Asian-Games : भव्य-दिव्य उद्घाटन सोहळ्याने ‘एशियन गेम्स 2026’च्या महाकुंभाला सुरुवात, मनु-पवनने क्रीडानगरीत दिमाखात फडकवला तिरंगा
4

Asian-Games : भव्य-दिव्य उद्घाटन सोहळ्याने ‘एशियन गेम्स 2026’च्या महाकुंभाला सुरुवात, मनु-पवनने क्रीडानगरीत दिमाखात फडकवला तिरंगा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.