Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाघिणी जिंकल्या आता वाघ सज्ज! Asian Games 2026 मध्ये टीम इंडिया ‘या’ दिवशी उतरणार मैदानात

Indian Men's Cricket Team Schedule In Asian Games 2026: भारतीय पुरुष क्रिकेट संघ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी जपानमध्ये दाखल झाला आहे. टीम इंडिया आपला पहिला सामना कधी खेळणार, जाणून घेऊयात.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 23, 2026 | 02:39 PM
Men's Cricket Team Schedule In Asian Games 2026

Men's Cricket Team Schedule In Asian Games 2026

Follow Us
Follow Us:
  • टीम इंडिया कधी उतरणार मैदानात?
  • एशियन गेम्सच्या पहिल्या सामन्याची तारीख समोर
  • भारत- पाकिस्तान एकाच दिवशी सुरू करणार मोहीम
भारतीय पुरुष क्रिकेट संघ आता आशियाई क्रीडा (Asian Games 2026) स्पर्धेसाठी सज्ज आहे. जपानमधील आयची-नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात श्रीलंकेला हरवून सुवर्णपदक जिंकले. आता सर्वांचे लक्ष भारतीय पुरुष क्रिकेट संघावर लागले आहे. भारतीय संघ जपानमध्ये दाखल झाला असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ लवकरच एशियम गेम्समधील सामन्यांसाठी मैदानात उतरणार आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत टीम इंडिया आपला पहिला सामना कधी खेळेल, जाणून घेऊयात.

Asian games 2026: २८ वर्षांचा दुष्काळ संपला! Mirabai chanu ने रचला इतिहास; वेटलिफ्टिंगमध्ये भारताला पहिलं पदक

जपानविरुद्ध सामन्यात विजय

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ जपानमध्ये दाखल झाला आहे. आशियाई स्पर्धेतील सामन्यांच्या आधी भारत आणि जपान यांच्यात एक टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला. हा सामना २० षटकांचा नियोजित होता, परंतु खराब हवामानामुळे तो केवळ पाच षटकांचा करण्यात आला. हा सामना अत्यंत रोमांचक होता. भारताने शेवटच्या चेंडूवर केवळ दोन धावांनी हा सामना जिंकला. या सामन्यानंतर हे स्पष्ट झाले की, येथील खेळपट्ट्यांवर भारताला सावधपणे खेळावे लागेल.

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा पहिला सामना कधी?

२०२६ आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुषांची क्रिकेट स्पर्धा २४ सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे. यजमान जपान आणि अफगाणिस्तान यांच्यात पहिला गट सामना होईल. त्याच दिवशी हाँगकाँग, चीन आणि मलेशिया हे संघही खेळतील. गट फेरी पूर्ण झाल्यानंतर, २८ सप्टेंबर रोजी उपांत्यपूर्व फेरीचे सामने सुरू होतील. भारतीय संघाला उपांत्यपूर्व फेरीत थेट प्रवेश देण्यात आला आहे.

भारतीय संघ आशियाई क्रीडा स्पर्धेतील आपला पहिला सामना सोमवार, २८ सप्टेंबर रोजी खेळणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी १०:०० वाजता सामन्याला सुरूवात होईल. परंतु, भारताचा सामना कोणत्या संघाशी होईल हे अद्याप ठरलेले नाही. या स्पर्धेत भारतीय संघाला ‘अ’ गटात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे, उपांत्यपूर्व फेरीत भारतीय संघाचा सामना जपान, नेपाळ किंवा अफगाणिस्तान यांपैकी एका संघाशी होऊ शकतो.

पाकिस्तानही आपला पहिला सामना याच दिवशी खेळणार

भारतीय संघाप्रमाणेच, पाकिस्तानही २८ सप्टेंबर रोजी आपल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील मोहिमेला सुरुवात करेल. पाकिस्ताननेही उपांत्यपूर्व फेरीत थेट स्थान मिळवले आहे. पाकिस्तानचा पहिला सामना २८ सप्टेंबर रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ५:३० वाजता सुरू होईल. परंतु, पाकिस्तानविरुद्ध खेळणारा संघही अद्याप निश्चित झालेला नाही. उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी भारत आणि पाकिस्तान दोघेही उपांत्यपूर्व फेरीतील विजय मिळवण्याचा प्रयत्न करतील.

तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत ओतूरच्या ‘चैतन्य’ची बाजी, ६ खेळाडूंची जिल्हास्तरासाठी निवड; चाकण येथे रंगणार स्पर्धा

Web Title: Asian games 2026 when team india mens cricket first match schedule

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 02:39 PM

Topics:  

  • asian games 2026
  • indian cricket team
  • Japan
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

Asian Games 2026: गर्वाने छाती फुलली! जय मीणाने जिंकले ‘Bronze’; सॉफ्ट टेनिसमध्ये प्रथमच…
1

Asian Games 2026: गर्वाने छाती फुलली! जय मीणाने जिंकले ‘Bronze’; सॉफ्ट टेनिसमध्ये प्रथमच…

Asian games 2026: २८ वर्षांचा दुष्काळ संपला! Mirabai chanu ने रचला इतिहास; वेटलिफ्टिंगमध्ये भारताला पहिलं पदक
2

Asian games 2026: २८ वर्षांचा दुष्काळ संपला! Mirabai chanu ने रचला इतिहास; वेटलिफ्टिंगमध्ये भारताला पहिलं पदक

Asian Games 2026: महिला स्किट शूटिंग टीमने मिळवून दिलं भारताला आठवं मेडल, रायजा-परिनाझची कमाल
3

Asian Games 2026: महिला स्किट शूटिंग टीमने मिळवून दिलं भारताला आठवं मेडल, रायजा-परिनाझची कमाल

ब्रिटिशांवर भारतीय पडले भारी; Team India ने इंग्लंडला मागे टाकत ICC Rankings मध्ये पटकावले पहिले स्थान
4

ब्रिटिशांवर भारतीय पडले भारी; Team India ने इंग्लंडला मागे टाकत ICC Rankings मध्ये पटकावले पहिले स्थान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.