
Asian Games : हा तर, चक्क वेडेपणा, एशियन गेम्समधील 'या' गोष्टींवर वैतागला एच. एस. प्रणॉय
भारतीय बॅडमिंटन खेळाडू एच.एस. प्रणॉयने एशियन गेम्स 2026 मधील सामन्यातील वेळापत्रकाबाबत चिंता व्यक्त केली आहे. खेळाडूंना पहिल्या व दुसऱ्या सामन्यामध्ये आरामासाठी योग्य वेळ मिळत नसल्याचे ठाम मत त्याने व्यक्त केले आहे.
प्रणॉयचे हे वक्तव्य अशावेळी आले, जेव्हा भारताचा युवा शटलर आयुष शेट्टी आणि उन्नती हुड्डा यांना शनिवारी एकाच दिवशी दोन सामने खेळावे लागले. त्यांचा दुसरा सामना संध्याकाळी होणाऱ्या राउंड ऑफ 16 च्या सामन्याच्या काही तासांआधीच संपला होता. प्रणॉयच्या मते, एवढ्या कमी वेळात सलग दुसरा सामना खेळल्याने खेळाडूला शारीरिक व मानसिक रुपात आव्हानात्मक गोष्टींचा सामना करावा लागतो.
खासकरून अशा मोठ्या स्पर्धांमध्ये खेळाडूंना रिकव्हरी आणि पुढील सामन्याच्या तयारीसाठी योग्य वेळ मिळायला हवा. त्याने संकेत दिले की, अशा व्यस्त वेळापत्रकाचा प्रभाव खेळाडूच्या कामगिरीवरही पडू शकतो.
प्रणॉयने आपला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करताना लिहिले की, या वर्षाच्या एशियन गेम्सचे वेळापत्रक साउत झोन चॅम्पियनशीपसारखे वाटत आहे. सांघिक पदक वाटप समारंभाचा कार्यक्रम रात्री 11 वाजेपर्यंत चालला, अशात अनेक खेळाडूंचा पुढील सामना हा दुसऱ्या दिवशी होता. आता तर एकाच दिवशी दोन सामने ठेवण्यात आले. हा तर चक्क वेडेपणाच आहे.
वेळापत्रकाबाबतची चर्चा अशावेळी समोर आली, जेव्हा आयुष आणि उन्नती हे दोघे राउंड ऑफ 16 मध्ये पोहचले आणि त्यांना आपले पुढील एकेरी सामने खेळण्यासाठी पुन्हा एकदा संध्याकाळी कोर्टवर उतरावे लागणार होते. आयुषने कजाकिस्तानच्या मखसुत ताजीबुल्लायेवचा फक्त 21-7, 21-7 असे, तर उन्नतीने मलेशियाच्या वाँग लिंग चिंगचा 21-14, 20-22, 21-19 असा पराभव केला. उन्नतीला या विजयासाठी तब्बल 79 मिनिटे लागली.
या दोघांचेही सामने सकाळच्या सत्रात होते, त्यामुळे त्यांना थेट शनिवारी संध्याकाळच्या सत्रात आता सामने खेळायचे आहेत. याचाच अर्थ असा की, दोन्ही स्टार शटरर्सला आता आपापल्या प्री-क्वॉर्टर सामन्याआधी स्वतःला रिकव्हर करावा लागेल.
थेट वृद्धाश्रमात! सचिनचा सखा Vinod Kambli चा भावूक Video Viral; म्हणाला, ‘मी या ठिकाणी…’
जागतिक 20 व्या क्रमांकावरील खेळाडू आयुषने तीजीबुल्लायेवविरुद्धच्या सामन्यात आपले वर्चस्व कायम राखले. त्याने कजाकिस्तानच्या शटलरला लय प्राप्त करण्याची कोणतीच संधी दिली नाही. सरळ सेटमध्ये सामना जिंकणाऱ्या आयुषचा पुढील सामना चिनी ताइपेच्या चाउ टिएन-चेनविरुद्ध असणार आहे.
तर उन्नतीला जागतिक 38 व्या क्रमांकाची खेळाडू वाँगविरुद्ध अतितटीचा सामना करावा लागला. उन्नतीने पहिला साट 21-14 असा जिंकला, पण त्यानंतर वाँगने पुनरागमन करताना दुसरा सेट 22-20 असा आपल्या नावे केला, मात्र उन्नतीनी तिसरा सेट आपल्या नावे करत हा सामना आपल्या खिशात घातला.