
Asian Games : टाईट शेड्युलचा सिंधुला फटका; क्वार्टर फायनलमध्येच आव्हान संपुष्टात, आयोजन समितीच्या कार्यभारावर प्रश्नचिन्ह
दरम्यान, सिंधुचा मागील 24 तासांतील हा तिसरा सामना असल्याने एशियन गेम्स आयोजन समिताच्या कार्यभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. कॉन्टिनेंटल इव्हेंटमध्ये भारताच्या बॅडमिंटन मोहिमेची सुरुवात पुरुष संघाच्या वतीने कांस्य पदकाने झाली होती. त्यानंतर बॅडमिंनटच्या इतिहासात कोणीही एकेरी, दुहेरी किंवा संमिक्ष दुहेरी (Mixed Doubles) मध्ये भारतीय खेळाडू पदक जिंकू शकले नाहीत.
दरम्यान, पी. व्ही. सिंधुचा मागील २४ तासांतील हा तिसरा सामना होता. त्यामुळे तिला काही प्रमाणात थकवा आला होता. सिंधुने टोकियो ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेती विरोधात दमदार कामगिरी केली होती व पहिला सेट 21-11 असा आपल्या नावे केला. दुसरा सेट खूपच संघर्षपूर्ण राहिला. सिंधु ब्रेकपर्यंत 11-10 अशी आघाडीवर होती, पण त्यानंतर हा सेट 16-16 असा बरोबरीवर आला. सिंधुने एक मोठा स्मॅश लावत जोरदार पुनरागमन करत 17-16 अशी आघाडी मिळवली, पण त्यानंतर चिनी खेळाडूने पुनरागमन करताना दुसरा सेट 21-18 असा आपल्या नावे करत सामना निर्णायक सेटपर्यंत ढकलला.
दरम्यान, पहिल्या सेटप्रमाणे सिंधु तिसऱ्या सेटमध्ये खेळताना दिसली नाही. मागील सलग २४ तासांतील तिचा हा तिसरा सामना असल्याने तिला थकवा आला होता. तसेच दुसरा सेट गमावल्याचा दबावही तिच्यावर पाहण्यास मिळाला, कारण निर्णायक सेटमध्ये चेनने तिच्यावर 11-7 अशी एकतर्फी आघाडी मिळवली होती. येथूनच तिने सामन्यावर आपले नाव कोरले.
कधी काळी भारताची पदक जिंकण्याची ताकद असलेल्या बॅडमिंटन प्रकारात यंदा भारताला फक्त एकाच पदकावर समाधान मानावे लागले. अशा मोठ्या स्पर्धांत हॉकी, बॅडमिंटन, बॉक्सिंग, कुस्ती, कबड्डी यात भारत सरस आहे. या विभागातूनच भारताला पदकाची अपेक्षा असते, पण यंदा मात्र बॅडमिंटनपटूंनी अक्षरशः भारताला निराश केले, त्याबाबत विचार करण्याची बॅडमिंटन फेडरेशनला गरज आहे.
सिंधुच्या सामन्याआधी उन्नती तीन वेळची विश्वविजेती अकाने यामागुचीकडून 16-21, 21-14, 17-21 अशी पराभूत झाली. दुसरीकडे विश्वविजेती कांस्य पदकधारी ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांना जागतिक पाचव्या क्रमांकावरील मलेशियन जोडी थिनाह मुरलीधरन आणि पर्ली टन यांच्याकडून 21-18, 21-8 असा पराभव पत्कारावा लागला. ज्यामुळे रविवारी सकाळीच महिला दुहेरीतील भारताचे आव्हान संपुष्टात आले होते.
त्यानंतर भारताच्यात निशा क्रेस्टो आणि ध्रुव कपिला मिक्स्ड डबल्समध्ये आपल्या क्वार्टर फायनलमध्ये जागतिक क्रमांक एकची चीनी जोडी यान जे फँग आणि डोंगपिंग हुआंगकडून 14-21, 21-18, 18-21 अशा पराभूत झाल्या.