लक्ष्य सेनचे आव्हान संपुष्टात (फोटो- ians)
जपानमधील ऐची-नागोया येथे सुरू असलेल्या एशियन गेम्स 2026 मध्ये भारताला धक्का बसला आहे. लक्ष्य सेनचे आव्हान संपुष्टात आले आहे. सिंगापूरच्या माजी जागतिक विजेत्या लोह कीन यू याने लक्ष्य सेनचा पराभव केला आहे. पुरुष एकेरीच्या या महत्त्वाच्या सामन्यात सिंगापूरच्या लोह कीन यू याने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली होती.
Asian Games : हा तर, चक्क वेडेपणा, एशियन गेम्समधील ‘या’ गोष्टींवर वैतागला एच. एस. प्रणॉय
लोह कीन यू याने त्याच्या खेळावर आधीपासूनच नियंत्रण राखले होते. त्यामुळे लोह कीन यू याने उत्तम नियंत्रण आणि वेगवान शॉट्सच्या जोरावर पहिला सेट १२-२१ असा सहज खिशात घातला. दुसऱ्या सेटमध्ये लक्ष्य सेनने जोरदार कमबॅक केले. आपल्या कौशल्याचा वापर करत त्याने हा सेट २१-१५ असा जिंकून सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. मात्र त्याला ही आघाडी त्याला राखता आली नाही.
शेवटच्या आणि निर्णायक सेटमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये जोरदार लढत पाहायला मिळाली. मात्र, मोक्याच्या क्षणी सिंगापूरच्या खेळाडूने केलेल्या आक्रमक खेळापुढे लक्ष्यचा निभाव लागला नाही आणि त्याला हा सेट १४-२१ असा पराभव स्वीकारावा लागला. हा सामना १२-२१, २१-१५, १४-२१ असा गमवावा लागल्यामुळे लक्ष्य सेनचे वैयक्तिक एकेरीतील आव्हान संपुष्टात आले आहे. या पराभवामुळे तो पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.
जपानच्या ऐची-नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत शनिवारचा दिवस भारतासाठी निराशाजनक ठरला आहे. ई-स्पोर्ट्स, पुरुष टेबल टेनिस, कॅनो स्प्रिंट आणि पुरुष सेबर (तलवारबाजी) या महत्त्वाच्या क्रीडा प्रकारांमध्ये भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आले आहे.






