Saransh Jain
२०२६-२७ रणजी ट्रॉफीमध्ये सर्व संघ आपला तिसरा सामना खेळत आहेत. मध्य प्रदेशचा आणि बिहार यांच्यात होळकर स्टेडियमवर सामना सुरु आहे. बिहारचा कर्णधार साकिबुल गनीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याचा हा निर्णय व्यर्थ ठरला. बिहारचा संपूर्ण संघ ९९ धावांवर तंबूत परतला झाला. रणजी ट्रॉफीमध्ये १०० धावांपर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरण्याची ही बिहारची चौथी वेळ ठरली.
होळकर स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्याचा पहिला दिवस पूर्णपणे सारांश जैनच्या नावावर होता. त्याने १३ षटकांत केवळ ४० धावा दिल्या आणि ७ विकेट्स घेतले. बिहारचा एकही फलंदाज त्याच्यासमोर टिकू शकला नाही. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ही सारांशची सर्वोत्तम कामगिरी होती. यासोबतच त्याने आपले २०० विकेट्सही पूर्ण केले. आदित्य राज त्याचा २०० वा विकेट ठरला.
बिहारच्या फलंदाजांनी पुन्हा अत्यंत निराशाजनक सुरुवात केली. आवेश खानने पहिल्याच षटकात नमन गौरव आणि श्रमन निग्रोध यांना बाद केले. त्यानंतर आयुष लोहरुखा सारांश जैनने १८ धावांवर बाद झाला. ३७ धावांवर असताना बिहारला चौथा धक्का बसला. सारांशने कर्णधार घनीला बाद केले. जैनने लगेचच आकाश राजला शून्यावर बाद केले. ३७ धावांवर बिहारचा निम्मा संघ तंबूत परतला होता. सारांशने रघुवेंद्र प्रताप सिंगला बाद करून आपले चार विकेट्स पूर्ण केले. यानंतर, बिहारचे विकेट पडण्याचे सत्र सुरुच होते. आदित्य राजला बाद करून आपली पाचवी विकेट घेतली. बिहारचा कोणताही फलंदाज सारांशच्या फिरकीसमोर टिकू शकला नाही. संपूर्ण संघ ९९ धावांवर सर्वबाद झाला.






