Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आत्माराम गांगर्डे यांना कॉमनवेल्थ मास्टर्स आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत तिहेरी कास्यपदक

खेळाचा वारसा घरातूनच त्यांच्या मोठ्या भावंडाकडून मिळाला होता. मोठा भाऊ उत्तम क्रिकेट खेळाडू तर दुसरा राज्यस्तरीय धावपटू होता.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Nov 24, 2023 | 04:15 PM
आत्माराम गांगर्डे यांना कॉमनवेल्थ मास्टर्स आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत तिहेरी कास्यपदक
Follow Us
Follow Us:

कल्याण : १८ ते २१ नोव्हेंबर दरम्यान प्रथम कॉमनवेल्थ मास्टर्स आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धा हैदराबाद येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत मुंबई महानगरपालिकेमध्ये सहा. क व स. (एन) विभागात कार्यरत असलेले आत्माराम गांगर्डे यांनी भारतीय पथकाचे प्रतिनिधित्व करत पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी आणि मिश्र दुहेरी या तिन्ही प्रकारात ब्राँझ मेडल पटकावले. अशाप्रकारे तिन्ही प्रकारात कॉमनवेल्थ आंतरराष्ट्रीय मास्टर्स टेबल टेनिस स्पर्धेत चमकदार कामगिरी करत त्यांनी सदर स्पर्धेवर आपला ठसा उमटवला.

त्यांना पुरुष दुहेरी मधील जोडीदार अशोक कळंबे (नागपूर) व मिश्र दुहेरी मधील जोडीदार मनीषा प्रधान (मुंबई) यांची मोलाची साथ लाभली. आत्माराम गांगर्डे हे नगर जिल्ह्यातील निमगाव (गांगर्डा) या खेडेगावातील मूळ रहिवासी आहेत आणि सध्या कल्याण येथे नोकरी निमित्त स्थायिक आहेत. त्यांच्या या नेत्रदीपक कामगिरीमुळे त्यांनी निमगाव (नगर) व मोहने (कल्याण) या गावांचे नाव अटकेपार नेले. त्यांनी या खेळाची सुरुवात इयत्ता ५ वी च्या वर्गात १० वर्षाचे असताना पासून एन.आर.सी. स्पोर्ट्स क्लबमध्ये केली.

त्यांना खेळाचा वारसा घरातूनच त्यांच्या मोठ्या भावंडाकडून मिळाला होता. मोठा भाऊ उत्तम क्रिकेट खेळाडू तर दुसरा राज्यस्तरीय धावपटू होता. त्यामुळे घरातील वातावरण खेळासाठी पोषक होते. त्यांनी शालेय व राज्यस्तरीय स्पर्धेत चांगली कामगिरी करत, सतत ७ वर्ष महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले. तसेच ब्राझील, स्वीडन, चीन, इंडोनेशिया, अमेरिका, मंगोलिया व ओमान येथील जागतिक मास्टर्स टेबल टेनिस स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत उत्तम कामगिरी केली.

अशा त्यांच्या नेत्रादिपक कामगिरी बद्दल सुभाष पाटील अध्यक्ष ग्रामस्थ मंडळ मोहने, सामाजिक कार्यकर्ते रवी गायकवाड व परिसरातील नागरिकांनी त्यांचा सत्कार आयोजित करून त्यांचा गौरव केला व पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना गांगर्डे यांनी टेबल टेनिससाठी प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा आणि त्यातून देशासाठी खेळाडू तयार करण्याचा मनोदय व्यक्त केला. तसेच मतिमंद आणि अपंग मुलांसाठी, खेडेगावातील व तळागाळातील गरीब मुलांना या खेळाबाबत आवड निर्माण करून त्यातून उत्तम खेळाडू घडवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Atmaram gangarde triple bronze medal in commonwealth masters international table tennis championship sport

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2023 | 04:15 PM

Topics:  

  • international sports
  • kalyan
  • maharashtra
  • Mumbai Municipal Corporation

संबंधित बातम्या

KDMC Mayor Controversy: महापौरांच्या खासगी देवदर्शनासाठी सरकारी गाडीचा वापर? नवीन सिंह यांचा शिंदे गटाला टोला
1

KDMC Mayor Controversy: महापौरांच्या खासगी देवदर्शनासाठी सरकारी गाडीचा वापर? नवीन सिंह यांचा शिंदे गटाला टोला

Devendra Fadnavis: शिक्षणासाठी ९० हजार कोटींची तरतूद; शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावल्याचा फडणवीसांचा दावा
2

Devendra Fadnavis: शिक्षणासाठी ९० हजार कोटींची तरतूद; शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावल्याचा फडणवीसांचा दावा

Maharashtra Farmers: पाच हजारांच्या मदतीला कागदपत्रांचे ग्रहण! शेतकऱ्यांचा सरकारकडे मोठा आग्रह
3

Maharashtra Farmers: पाच हजारांच्या मदतीला कागदपत्रांचे ग्रहण! शेतकऱ्यांचा सरकारकडे मोठा आग्रह

District Bank Election 2026: जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! सात दिग्गजांचे अर्ज कायम राहणार की माघार? सीमोल्लंघनानंतर फैसला
4

District Bank Election 2026: जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! सात दिग्गजांचे अर्ज कायम राहणार की माघार? सीमोल्लंघनानंतर फैसला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.