Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AUS vs BAN: हसन महमूदने ऑस्ट्रेलियाचा पाडला फडशा, 6 विकेट्स घेत 198 धावात केले गारद

AUS vs BAN: बांगलादेशी वेगवान गोलंदाज हसन महमूदने आपल्या भेदक गोलंदाजीने एकहाती ऑस्ट्रेलियन संघातील निम्म्याहून अधिक खेळाडूंना बाद केले. डार्विनमध्ये ऑस्ट्रेलियाला केवळ १९८ धावांत गारद केले

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 13, 2026 | 12:33 PM
AUS vs BAN: बांग्लादेशचा धुमाकूळ (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

AUS vs BAN: बांग्लादेशचा धुमाकूळ (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय बांग्लादेशने घेतला
  • ऑस्ट्रेलियासारख्या भक्कम संघाला पहिल्याच दिवशी १९८ धावांमध्ये लोळवले
  • हसन महमूदने अर्ध्यापेक्षा अधिक संघ गारद केला 
२००३ नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आलेल्या बांगलादेशी संघाने धुमाकूळ घातला. डार्विनमधील मारारा स्टेडियमवर सुरू झालेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९८ धावांवर सर्वबाद झाला. तब्बल २३ वर्षानंतर ऑस्ट्रेलियाच्या भूमीत बांग्लादेशने आपले वर्चस्व राखले आहे. बांगलादेशचा उंच वेगवान गोलंदाज हसन महमूदने ५५ धावांत सहा बळी घेत आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी केली, तर ऑस्ट्रेलियाचा ज्येष्ठ फलंदाज स्टीव्ह स्मिथने ७१ धावा करून सर्वाधिक धावा केल्या.

AUS vs BAN: उलटा पडला डाव! बांग्लादेशी ठरले वरचढ, 29 धावातच ऑस्ट्रेलियाचे 4 गडी बाद, झाली दमछाक

हसन महमूदने सहा बळी घेतले

आपले प्रमुख वेगवान गोलंदाज नाहिद राणा, मुस्तफिजुर रहमान आणि शोरिफुल इस्लाम यांच्याशिवाय पहिली कसोटी खेळणाऱ्या बांगलादेशी संघासाठी हसन महमूद हिरो ठरला. या २७ वर्षीय उंच वेगवान गोलंदाजाने जेक वेदरॉल्ड (२३), ट्रॅव्हिस हेड (२२), स्टीव्ह स्मिथ (७१), पॅट कमिन्स (९), मिचेल स्टार्क (१) आणि नॅथन लायन (७) यांचे बळी घेतले. हसन महमूदची ५५/६ ही गोलंदाजीची आकडेवारी कसोटी क्रिकेटमधील कोणत्याही बांग्लादेशी वेगवान गोलंदाजाची तिसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याच्या आधी शहादत होसेन आणि इबादत होसेन यांचा क्रमांक लागतो, ज्यांनी प्रत्येकी सहा बळी घेतले, पण कमी धावा दिल्या.

वरची फळी, मधली फळी सर्व अपयशी

या पडझडीमुळे ऑस्ट्रेलियाची फलंदाजी पुन्हा एकदा टीकेची धनी झाली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना कांगारूंनी चांगली सुरुवात केली. ११ षटकांत धावसंख्या ४५ धावा होती, पण तिथून सुरू झालेली पडझड कधीच थांबली नाही. नियमित अंतराने विकेट्स पडत राहिल्या. स्टीव्ह स्मिथने एक बाजू सांभाळून धरली आणि आपले अर्धशतकही पूर्ण केले, पण त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही.

AUS vs BAN: 23 वर्षाच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर ऑस्ट्रेलियात लागणार बांग्लादेशच्या खेळाडूंची ‘कसोटी’, कुठे पाहता येणार Live Streaming

बांग्लादेशी वेगवान गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या सर्व १० विकेट्स घेतल्या

२३ वर्षांनंतर कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियात आलेल्या बांगलादेशला दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत व्हाईटवॉश मिळाला. २००३ मध्ये जेव्हा बांगलादेशने शेवटचा ऑस्ट्रेलिया दौरा केला होता, तेव्हा दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्यांचा व्हाईटवॉश झाला होता. ऑस्ट्रेलियाने पहिला सामना एक डाव आणि १३२ धावांनी, तर दुसरा सामना एक डाव आणि ९८ धावांनी जिंकला होता. यावेळी, कर्णधार नज्मल हसन शांतोच्या नेतृत्वाखालील बांगलादेशचा संघ इतिहास रचण्याच्या प्रयत्नात असेल.

Web Title: Aus vs ban australia all out on 198 runs first inning vs bangladesh hasan mahmud shines

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 12:33 PM

Topics:  

  • australia vs bangladesh
  • cricket news
  • Test cricket

संबंधित बातम्या

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
1

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

Chief Selector: अजित आगरकरनंतर प्रज्ञान ओझा अंतरिम मुख्य निवडकर्ता, गौतम गंभीरसह न्यूझीलंड दौऱ्याबाबत दीर्घ चर्चा
2

Chief Selector: अजित आगरकरनंतर प्रज्ञान ओझा अंतरिम मुख्य निवडकर्ता, गौतम गंभीरसह न्यूझीलंड दौऱ्याबाबत दीर्घ चर्चा

याला म्हणतात दणका! आराध्याचा तूफानी धडाका! शानदार खेळीने एलिट ॲकॅडमीचा दणदणीत विजय
3

याला म्हणतात दणका! आराध्याचा तूफानी धडाका! शानदार खेळीने एलिट ॲकॅडमीचा दणदणीत विजय

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल
4

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.