Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aus vs Ban: कांगारूंची शिकार! बांग्लादेशने ऑस्ट्रेलियाला घरातच लोळवलं; 9 विकेट्सने ऐतिहासिक विजय

Bangladesh Beat Australia in 1st test Darwin: डार्विन येथे खेळलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात बांग्लादेशने ९ विकेट्सने ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला. भारत व पाकिस्ताननंतर ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामना जिंकणारा बांग्लादेश तिसरा आशियाई संघ ठरला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 16, 2026 | 02:06 PM
Aus vs Ban: कांगारूंची शिकार! बांग्लादेशने ऑस्ट्रेलियाला घरातच लोळवलं; 9 विकेट्सने ऐतिहासिक विजय
Follow Us
Follow Us:
  • बांग्लादेशने कांगारूंना दिला दणका
  • 9 विकेट्सने धुव्वा उडवत रचला इतिहास
  • ऑस्ट्रेलियावर पहिला कसोटी विजय
Australia vs Bangladesh, 1st Test: ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश यांच्यात डार्विन येथे पहिला कसोटी सामना खेळला गेला. तब्बल २३ वर्षानंतर, बांग्लादेश दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात दाखल झाला. डार्विन मैदानावर खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात बांग्लादेशने यजमान संघाचा ९ विकेट्सने पराभव केला.ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर एक ऐतिहासिक कसोटी सामना जिंकून बांग्लादेशने इतिहास रचला. या विजयासह बांग्लादेशने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. बांगलादेश संघ हा भारत आणि पाकिस्ताननंतर ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायदेशात पराभूत करणारा तिसरा आशियाई संघ ठरला.

IND vs SL Live: गॉलमध्ये पावसाची बॅटिंग सुरूच! पहिलं सत्र रद्द, दुसऱ्या सत्रालाही विलंब; सामना कधी सुरू होणार?

बांग्लादेशने कांगांरुंना चारली धूळ

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने केवळ १९८ धावा केल्या.त्यानंतर बांग्लादेशचा संघ ४२६ धावांवर सर्वबाद झाला. यामुळे बांगलादेशला २२८ धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियाची फलंदाजी खराब झाली आणि संघाने २०७ धावांत सात विकेट्स गमावले. तर त्यानंतर ग्रीनने स्टार्कसोबत भागीदारी करून संघाला आघाडी मिळवून देण्यात यश मिळवले. चौथ्या दिवशी दुपारच्या जेवणाच्या विश्रांतीपर्यंत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात सात विकेट्स गमावून २४३ धावा केल्या होत्या. मात्र, जेवणाच्या विश्रांतीनंतर मिचेल स्टार्कच्या रूपाने ऑस्ट्रेलियाला आठवा धक्का बसला. ग्रीन आणि स्टार्कने आठव्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी केली. तस्किन अहमदने स्टार्कला बाद करून ही भागीदारी तोडली. स्टार्क १८ धावांवर बाद झाला. बांग्लादेशने दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाला २८४ धावांवर गुंडाळले.

बांग्लादेशचा ऐतिहासिक विजय

कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने बांग्लादेशसमोर ५७ धावांचे सोपे लक्ष्य ठेवले. बांग्लादेशने केवळ एक विकेट गमावून हे लक्ष्य पूर्ण केले. पहिल्या डावातील शतकवीर तन्झिद हसन तमीम पाच चेंडूंवर बाद झाला असला तरी, पाहुण्या संघाने केवळ १४.२ षटकांत आणि फक्त एक विकेट गमावून हे लक्ष्य सहज गाठले. हा विजय बांगलादेशसाठी ऐतिहासिक आहे, कारण त्यांनी यापूर्वी ऑस्ट्रेलियातील कसोटी सामन्यात ‘कांगारू’ संघाला कधीही पराभूत केले नव्हते.

३० वर्षांत ऑस्ट्रेलियात कसोटी जिंकणारा दुसरा आशियाई संघ

या ऐतिहासिक विजयासह, बांग्लादेश गेल्या ३० वर्षांत ऑस्ट्रेलियात कसोटी सामना जिंकणारा भारता नंतरचा दुसरा आशियाई संघ ठरला आहे. यापूर्वी, पाकिस्तानने ऑस्ट्रेलियात शेवटचा कसोटी विजय नोव्हेंबर-डिसेंबर १९९५ मध्ये मिळवला होता. यामुळे बांग्लादेश ऑस्ट्रेलियात सर्वात जलद कसोटी सामना जिंकणारा आशियाई संघ ठरला आहे. पाकिस्तानने ऑस्ट्रेलियात आपला पहिला कसोटी विजय सातव्या प्रयत्नात मिळवला, तर भारताला ऑस्ट्रेलियन भूमीवर आपला पहिला विजय नोंदवण्यासाठी १२व्या कसोटीपर्यंत वाट पाहावी लागली.

श्रीलंका दौऱ्यानंतर Ajit Agarkar ची खुर्ची जाणार? BCCI घेणार भवितव्याचा निर्णय; रोहित शर्मा वादाचीही होणार चर्चा?

Web Title: Aus vs ban bangladesh beat australia 9 wickets historic test win

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 02:06 PM

Topics:  

  • Australia Cricket Team
  • Bangladesh Cricket Team
  • Test Series

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.