
AUS vs ENG Ashes Test: Joe Root hits century in Brisbane Test! First time doing this feat on Australian soil
Joe Root’s century in Brisbane Test : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिका २०२५ मधील दुसरा कसोटी सामना ब्रिस्बेनमधील गॅबा स्टेडियमवर गुलाबी चेंडूने खेळवण्यात येत आहे. नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत पहिल्या दिवसाअखेर ९ बाद ३२५ धावा केल्या आहेत. इंग्लंडकरून जो रूटने शानदार शतक झळकवले आहे. त्याने या शतकासह ऑस्ट्रेलियन भूमिवर एक कारनामा रचला आहे. त्याबाबद्दल आपण जाणून घेऊया.
नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु त्याची सुरुवात खूपच निराशाजनक झाली. संघाने आपले पहिले दोन बळी फक्त ५ धावांमध्ये गमावले. इंग्लंड संघ जेव्हा संकटात सापडला होता तेव्हा जो रूटने एक बाजू सांभाळत संघाला चांगल्या स्कोअरपर्यंत पोहचवले. जो रूटने शतकासह इंग्लंडला कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यात मोठी भूमिका बजावली.
दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात जो रूटने त्याचे ४० वे कसोटी शतक झळकावले. उल्लेखनीय बाब म्हणजे, ऑस्ट्रेलियातील हे त्याचे पहिलेच शतक देखील ठरले. जो रूटची अॅशेस २०२५ ची सुरुवात त्याच्यासाठी चांगली झाली नव्हती, कारण त्याला पर्थ कसोटीत फलंदाजीने चांगली कामगिरी करता आलेली नाही. ब्रिस्बेनमध्ये खेळल्या जात असेलल्या सामन्यात, त्याने त्याच्या सर्व टीकाकारांना आपल्या बॅटने चोख उत्तर दिले आणि ऑस्ट्रेलियामध्ये त्याची दीर्घ प्रतीक्षा एका शानदार शतकाने यशस्वीरित्या संपुष्टात आणली.
जॉ रूट आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) मध्ये घराबाहेर सर्वाधिक शतके ठोकणारा फलंदाज ठरला आहे. त्याने परदेशात एकूण नऊ शतके झळकवली आहेत. ज्यामुळे त्याने आता ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज स्टीव्ह स्मिथला मागे टाकले आहे. स्मिथ आठ शतके ठोकली आहेत.
Joe Root savours his 40th Test ton in the Gabba Test 🤩👌#WTC27 | #AUSvENG 📝: https://t.co/BNKjBSJuJb pic.twitter.com/udXqJ3b9dB — ICC (@ICC) December 4, 2025
जो रूटची कामगिरी केवळ इंग्लंडसाठी महत्त्वपूर्ण राहिली नाही तर त्याच्या वैयक्तिक कारकिर्दीतील देखील एक मोठी कामगिरी ठरली आहे. ऑस्ट्रेलियातील त्याचे पहिले कसोटी शतक आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) मध्ये परदेशात सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम त्याच्या कामगिरीची विशेष ओळख करून देतो.
हेही वाचा : IND vs SA: ‘तो शतक करणार नाही असं कधीच…’ विराट कोहलीच्या सलग दुसऱ्या शतकावर सुनील गावस्कर हे काय बोलून गेले?
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामना ब्रिस्बेनमधील गाबा येथे खेळवण्यात येत आहे. या सामन्याचा पहिल्या दिवसाचा खेळ संपला असून इंग्लंडने जो रूटच्या शतकाच्या जोरावर ९ बाद ३२५ धावा केल्या आहेत. दिवस-रात्र कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात जो रूटने शानदार शतक लगावून संघाला तारळे आहे. तर ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने ६ विकेट्स घेतल्या आहेत.