Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AUS W vs WI W: ऑस्ट्रेलियाची फायनलमध्ये दणदणीत एन्ट्री; वेस्ट इंडिजचा 8 विकेट्सनी धुव्वा, सातव्या किताबापासून फक्त एक पाऊल दूर

Aus W Beat WI W women's t 20 world cup 2026 semifinal: महिला विश्वचषक स्पर्धेतील सेमिफायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा ८ विकेट्सने धुव्वा उडवला. यासह कांगारुंनी फायनलमध्ये दिमाखात एन्ट्री केली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 01, 2026 | 01:50 PM
AUS W vs WI W: ऑस्ट्रेलियाची फायनलमध्ये दणदणीत एन्ट्री; वेस्ट इंडिजचा 8 विकेट्सनी धुव्वा, सातव्या किताबापासून फक्त एक पाऊल दूर
Follow Us
Follow Us:
  • ऑस्ट्रेलियाची फायनलमध्ये दणदणीत एन्ट्री
  • वेस्ट इंडिजचा 8 विकेट्सनी धुव्वा
  • सातव्या किताबापासून फक्त एक पाऊल दूर
महिला टी२० विश्वचषक २०२६ (Womens t 20 world Cup 2026) आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाने स्पर्धेच्या पहिल्या सेमिफायनल सामन्यात वेस्ट इंडिजचा ८ विकेट्सने धुव्वा उडवला. या विजयासह त्यांनी फायनलमध्ये धडक मारली आहे. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियासमोर १२६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियाने केवळ १३ षटकांत दोन विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. सलामीवीर बेथ मूनीने ३६ चेंडूंमध्ये नाबाद ६१ धावा करून शानदार फलंदाजी केली आणि संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. वेस्ट इंडिजकडून हेली मॅथ्यूज आणि शिनेल हेन्री यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला. ऑस्ट्रेलिया आता, ५ जुलै रोजी होणाऱ्या फायनलमध्ये दुसऱ्या सेमिफायनल सामन्याच्या विजेत्या संघाशी भिडेल. ऑस्ट्रेलियाकडे ७ व्यांदा विजेतेपद जिंकण्याची संधी आहे.

अभिमानास्पद ! भारतीय जवानांनी वर्ल्ड रोइंग कपमध्ये रचला इतिहास; लक्ष्य–उज्ज्वल जोडीने जिंकले पहिले Gold Medal

वेस्ट इंडीजची फायनलची संधी हुकली

पहिल्या सेमिफायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजची कर्णधार हेली मॅथ्यूज आणि कियाना जोसेफ यांनी संघासाठी डावाची सुरुवात केली, तर ऑस्ट्रेलियाकडून लुसी हॅमिल्टनने नव्या चेंडूने गोलंदाजीची सूत्रे हाती घेतली. पॉवरप्लेच्या पहिल्या सहा षटकांमध्ये वेस्ट इंडिज संघाने एकही विकेट न गमावता ३५ धावा केल्या. यानंतर, जॉर्जिया वेअरहॅमने आपल्या पहिल्याच चेंडूवर कर्णधार हेली मॅथ्यूजला बाद केले. मॅथ्यूज २८ चेंडूंमध्ये ३० धावा करून बाद झाली. तिने पाच चौकार मारून डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता, पण स्वीप शॉट मारण्याच्या प्रयत्नात बोल्ड झाली. नवव्या षटकात सोफी मोलिनेक्सने वेस्ट इंडिजला आणखी एक धक्का दिला. तिने कियाना जोसेफला ॲशले गार्डनरकरवी झेलबाद केले. आपल्या डावाच्या सुरुवातीपासूनच संघर्ष करणाऱ्या जोसेफला २२ चेंडूंमध्ये १६ धावा करून बाद करण्यात आले. यानंतर टेलरही बाद झाली. अॅशले गार्डनरने ११व्या षटकात दोन विकेट्स घेतले. ४७ धावांवर पहिली विकेट गमावल्यानंतर वेस्ट इंडिजला २० षटकांत केवळ १२५ धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून सोफी मोलिन्यू, ॲशले गार्डनर आणि जॉर्जिया वेअरहॅम यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतले, तर ॲनाबेल सदरलँडने एक विकेट घेतला.

ऑस्ट्रेलियाची फायनमध्ये एन्ट्री

ऑस्ट्रेलियाला त्यांच्या डावाच्या सुरुवातीलाच पहिला धक्का बसला. जॉर्जिया बॉल ११ चेंडूंमध्ये १६ धावा करून बाद झाली. त्यानंतर वेस्ट इंडिजने आणखी एक महत्त्वपूर्ण यश मिळवले. फोबी लिचफिल्डदेखील मोठी खेळी करण्यात अपयशी ठरली आणि पाच चेंडूंमध्ये चार धावा करून हेली मॅथ्यूजच्या गोलंदाजीवर बाद झाली. दुसरी विकेट पडेपर्यंत ऑस्ट्रेलियाने ४.४ षटकांत ४३ धावा केल्या होत्या. मात्र, सुरुवातीला दोन विकेट गमावूनही ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी धावगती कमी होऊ दिली नाही. पॉवरप्लेच्या अखेरीस, त्यांनी सहा षटकांत दोन विकेट गमावून ६३ धावा केल्या होत्या. बेथ मुनीने हेली मॅथ्यूजच्या गोलंदाजीवर पुल शॉट खेळून आपले अर्धशतक पूर्ण केले. स्पर्धेतील हे तिचे दुसरे अर्धशतक होते. यापूर्वी तिने नेदरलँड्सविरुद्ध अर्धशतक झळकावले होते.

पहिल्या सेमिफायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा ८ विकेट्सने पराभव करुन अंतिम सामन्यात आपले स्थान निश्चित केले. लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी दमदार कामगिरी करत सहज विजय मिळवला. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सामना दुसऱ्या सेमिफायनल सामन्याच्या विजेत्याशी होईल.

IND vs IRE: टीम इंडियाला रडवणारा गोलंदाज नोकरीच्या शोधात; जय मुंद्राचे LinkedIn प्रोफाइल चर्चेत

Web Title: Aus w vs wi w australia reach womens t20 world cup 2026 final

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 01:50 PM

Topics:  

  • Aus vs WI
  • Australia Cricket Team
  • ICC T20 World Cup 2026
  • ICC Women's T20 World Cup

संबंधित बातम्या

WTC 2025-27:  बांग्लादेशच्या विजयाने समीकरणं बदलली; ऑस्ट्रेलियाची बादशाही धोक्यात! भारतालाही टाकलं मागे
1

WTC 2025-27: बांग्लादेशच्या विजयाने समीकरणं बदलली; ऑस्ट्रेलियाची बादशाही धोक्यात! भारतालाही टाकलं मागे

Aus vs Ban: कांगारूंची शिकार! बांग्लादेशने ऑस्ट्रेलियाला घरातच लोळवलं; 9 विकेट्सने ऐतिहासिक विजय
2

Aus vs Ban: कांगारूंची शिकार! बांग्लादेशने ऑस्ट्रेलियाला घरातच लोळवलं; 9 विकेट्सने ऐतिहासिक विजय

AUS Vs BAN: कांगारूंना लयं पळवलं! घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया अडचणीत, तंजिद हसनने…
3

AUS Vs BAN: कांगारूंना लयं पळवलं! घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया अडचणीत, तंजिद हसनने…

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल
4

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.