Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AUS W Beat IND W: ऑस्ट्रेलियाने भारताचा ८ विकेट्सने केला पराभव; वर्ल्ड कपआधी महिला टीम इंडियाची टेंशन वाढली

भारत-ऑस्ट्रेलिया महिला संघांमधील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताला ८ विकेट्सने पराभव पत्करावा लागला. प्रतिका रावल (६४), स्मृती मानधना (५८) आणि हरलीन देओल (५४) यांच्या अर्धशतकांनंतरही ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य सहज गाठले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 14, 2025 | 11:14 PM
IND W vs AUS W (Photo Credit - X

IND W vs AUS W (Photo Credit - X

Follow Us
Close
Follow Us:
  • ऑस्ट्रेलियाने भारताचा ८ विकेट्सने केला पराभव
  • स्मृती मानधना आणि प्रतिका रावलची अर्धशतकी खेळी व्यर्थ
  • वर्ल्ड कपआधी महिला टीम इंडियाची टेंशन वाढली

IND W vs AUS W 1st ODI 2025: भारतीय महिला क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलिया महिला संघाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ८ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २८२ धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे ऑस्ट्रेलियाने अवघ्या ४४.१ षटकांत २ विकेट्स गमावून पूर्ण केले. या पराभवामुळे भारतीय महिला संघाची आगामी एकदिवसीय विश्वचषकापूर्वीची चिंता वाढली आहे.

भारताच्या फलंदाजांचे अर्धशतक ठरले व्यर्थ

या सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताची सलामीची जोडी स्मृती मानधना (५८) आणि प्रतिका रावल (६४) यांनी दमदार सुरुवात करत ११४ धावांची भागीदारी केली. यानंतर, तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या हरलीन देओलनेही ५४ धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र, या तिघींव्यतिरिक्त अन्य कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. कर्णधार हरमनप्रीत कौरने पुन्हा एकदा निराशा केली आणि ११ धावा करून ती बाद झाली. भारताने निर्धारित ५० षटकांत ७ विकेट्स गमावून २८१ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मेगन शुट्टने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.

Australia win the ODI series opener. #TeamIndia will aim to come back stronger in the second ODI of the series. 👍 👍

Scorecard ▶️ https://t.co/Fw3TUl2thL#INDvAUS | @IDFCFirstBank pic.twitter.com/3Soxn1QgMg

— BCCI Women (@BCCIWomen) September 14, 2025

हे देखील वाचा: विराट-रोहित नाही, श्रेयस अय्यरही बाहेर; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा!

ऑस्ट्रेलियाने सहज गाठले लक्ष्य

२८२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने शानदार फलंदाजी केली. फोएब लिचफील्डने ८० चेंडूत ८८ धावांची दमदार खेळी केली आणि संघाच्या विजयाचा पाया रचला. त्यानंतर बेथ मूनी (७७*) आणि एनाबेल सदरलँड (५४*) यांनी नाबाद अर्धशतकी खेळी करत संघाला सहज विजय मिळवून दिला. भारताकडून क्रांती गौड आणि स्नेह राणा यांना प्रत्येकी १-१ विकेट मिळाली. फोएब लिचफील्डला तिच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल ‘प्लेयर ऑफ द मॅच’ चा पुरस्कार मिळाला. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

Web Title: Australia defeats india by 8 wickets tension rises for indian womens team ahead of world cup

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2025 | 11:14 PM

Topics:  

  • cricket
  • IND VS AUS
  • Sports
  • Sports News

संबंधित बातम्या

विराट-रोहित नाही, श्रेयस अय्यरही बाहेर; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा!
1

विराट-रोहित नाही, श्रेयस अय्यरही बाहेर; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा!

पहलगाम हल्ल्यानंतरही सामना का? ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनचा पंतप्रधान मोदी आणि BCCIला थेट सवाल
2

पहलगाम हल्ल्यानंतरही सामना का? ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनचा पंतप्रधान मोदी आणि BCCIला थेट सवाल

IND W vs AUS W: प्रतिका रावलची धुवांधार फलंदाजी; पहिल्या वनडेमध्ये ऑस्ट्रेलियासमोर भारताने ठेवले 282 धावांचे लक्ष्य
3

IND W vs AUS W: प्रतिका रावलची धुवांधार फलंदाजी; पहिल्या वनडेमध्ये ऑस्ट्रेलियासमोर भारताने ठेवले 282 धावांचे लक्ष्य

Virat आणि Rohit नाही, तरी ‘हे’ 2 खेळाडू पाकिस्तानवर पडणार भारी; Team India च्या विजयाची तयारी पूर्ण
4

Virat आणि Rohit नाही, तरी ‘हे’ 2 खेळाडू पाकिस्तानवर पडणार भारी; Team India च्या विजयाची तयारी पूर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.