Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑस्ट्रेलिया संघाचा आणखी एक दिग्गज खेळाडू संघाबाहेर, नव्या टीमची केली घोषणा, स्टीव्ह स्मिथकडे कर्णधारपद

जसजशी स्पर्धा जवळ येत आहे स्पर्धेतून संघातील खेळाडूंना बाहेर काढण्याचा ट्रेंड सुरूच आहे आणि आता त्यामध्ये आणखी एक नाव जोडण्यात आले आहे. जोडले जाणारे नवीनतम नाव म्हणजे अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 12, 2025 | 10:51 AM
फोटो सौजन्य - X सोशल मीडिया

फोटो सौजन्य - X सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ – ऑस्ट्रेलिया संघ : चॅम्पियन ट्रॉफीला फक्त सात दिवस शिल्लक आहेत. त्याआधी आता विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. जसजशी स्पर्धा जवळ येत आहे स्पर्धेतून संघातील खेळाडूंना बाहेर काढण्याचा ट्रेंड सुरूच आहे आणि आता त्यामध्ये आणखी एक नाव जोडण्यात आले आहे. जोडले जाणारे नवीनतम नाव म्हणजे अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचे. संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी आपला अधिकृत संघ जाहीर केला आहे, ज्यामध्ये एकूण ५ मोठ्या खेळाडूंना वगळण्यात आले आहे.

संघाबाहेर केल्यानंतर मोहम्मद सिराजची सोशल मीडियावर प्रतिक्रिया! असा आहे टीम इंडियाचा चॅम्पियन ट्रॉफीसाठी संघ

याआधी अनेक खेळाडू दुखापतीमुळे तर मार्कस स्टॉइनिसने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत स्टीव्ह स्मिथ कांगारू संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडलेल्या १५ सदस्यीय संघात स्टार्कचे नाव समाविष्ट नाही. त्याने वैयक्तिक कारणांमुळे या मेगा इव्हेंटमधून आपले नाव मागे घेतले आहे अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या मते, ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांमध्ये आता अनुभवहीन स्पेन्सर जॉन्सन, नॅथन एलिस, शॉन अ‍ॅबॉट आणि बेन द्वारशी यांचा समावेश असेल.

BREAKING 🚨

Australia’s final 15-player squad for the Champions Trophy has been announced… and there is no Mitchell Starc.

‘His loss is of course a blow’👉 https://t.co/Mc5bfU7pHB pic.twitter.com/3g4dTxZvAg

— Fox Cricket (@FoxCricket) February 12, 2025

हे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू झाले संघाबाहेर

यापूर्वी, कमिन्स, हेझलवूड आणि मिशेल मार्श दुखापतींमुळे स्पर्धेतून बाहेर पडले होते. अशाप्रकारे, कांगारू संघाकडे कमिन्स, स्टार्क आणि हेझलवूड हे वेगवान गोलंदाज असणार नाहीत. त्याच्याशिवाय, मार्कस स्टोइनिसने काही दिवसांपूर्वी अचानक एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती, ज्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या अडचणी आणखी वाढल्या. आता मिचेल स्टार्कने वैयक्तिक कारणामुळे तो संघाबाहेर झाल्याची माहिती समोर आली आहे.

🚨 BIG MISS FOR AUSTRALIA IN CHAMPIONS TROPHY 🚨

– Pat Cummins ruled out.
– Josh Hazelwood ruled out.
– Mitchell Starc ruled out.
– Mitchell Marsh ruled out.
– Cameron Green ruled out.
– Marcus Stoinis retired. pic.twitter.com/yVXwWDMjzB

— Tanuj Singh (@ImTanujSingh) February 12, 2025

सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ श्रीलंकेविरुद्ध दोन सामान्यांची एकदिवसीय मालिका खेळत आहे. आज या मालिकेचा पहिला सामना रंगला आहे. याआधी ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये दोन सामान्यांची कसोटी मालिका झाली यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने २-० ने ही मालिका जिंकली होती. एकदिवसीय मालिकेनंतर ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानला रवाना होईल. तर श्रीलंकेचा संघ टॉप ८ मध्ये स्थान न मिळवू शकल्यामुळे चॅम्पियन ट्रॉफी खेळू शकणार नाही.

२०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया संघ –

स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), शॉन अ‍ॅबॉट, अ‍ॅलेक्स केरी, बेन द्वारशीस, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, आरोन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्नश लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, अ‍ॅडम झांपा.

Web Title: Australia player mitchell starc out of the team new team announced steve smith as captain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2025 | 10:51 AM

Topics:  

  • Champions Trophy 2025
  • Mitchell Starc
  • SL vs AUS
  • Team Australia

संबंधित बातम्या

ऑस्ट्रेलियाला पहिला विश्वचषक जिंकून देणाऱ्या प्रशिक्षक Bob Simpson यांचे वयाच्या 89 व्या वर्षी झाले निधन
1

ऑस्ट्रेलियाला पहिला विश्वचषक जिंकून देणाऱ्या प्रशिक्षक Bob Simpson यांचे वयाच्या 89 व्या वर्षी झाले निधन

SA vs AUS : दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया भिडणार, वाचा कधी आणि कुठे पाहता येणार सामन्यांची लाईव्ह स्ट्रिमिंग?
2

SA vs AUS : दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया भिडणार, वाचा कधी आणि कुठे पाहता येणार सामन्यांची लाईव्ह स्ट्रिमिंग?

Rohit Sharma: चॅम्पियन्स ट्रॉफीचा ‘अनसीन व्हिडिओ’ आला समोर, रोहित शर्माने निवृत्तीवर दिली होती ‘ही’ प्रतिक्रिया
3

Rohit Sharma: चॅम्पियन्स ट्रॉफीचा ‘अनसीन व्हिडिओ’ आला समोर, रोहित शर्माने निवृत्तीवर दिली होती ‘ही’ प्रतिक्रिया

SA vs AUS : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या सामन्यामनंतर ऑस्ट्रेलियाच्या संघात झाले तीन बदल! वाचा सविस्तर
4

SA vs AUS : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या सामन्यामनंतर ऑस्ट्रेलियाच्या संघात झाले तीन बदल! वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.