Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑस्ट्रेलियन दिग्गज Bob Cowper यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन! कांगारूंच्या भूमीवर झळकावले पहिले कसोटी त्रिशतक

ऑस्ट्रेलियातील कसोटीतील हे पहिले त्रिशतक होते. ऑस्ट्रेलियन भूमीवर कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारे पहिले फलंदाज बॉब काउपर यांचे रविवारी वयाच्या ८४ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: May 11, 2025 | 05:12 PM
फोटो सौजन्य - X

फोटो सौजन्य - X

Follow Us
Close
Follow Us:

Bob Cowpwer passes away : ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटमध्ये अनेक दिग्गज खेळाडूंचा जन्म झाला आहे यामध्ये अनेक मोठ्या खेळाडूंचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियन भूमीवर कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारे पहिले फलंदाज बॉब काउपर यांचे रविवारी वयाच्या ८४ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. तो त्याच्या सुंदर स्ट्रोक प्लेसाठी, क्रीजवरचा संयम आणि ऑस्ट्रेलियासाठी मोठी धावसंख्या उभारण्याच्या क्षमतेसाठी ओळखला जात होता. त्याच्या २७ कसोटी कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा क्षण म्हणजे १९६६ मध्ये एमसीजी येथे इंग्लंडविरुद्धची त्याची ३०७ धावांची दमदार खेळी.

ऑस्ट्रेलियातील कसोटीतील हे पहिले त्रिशतक होते. बॉब काउपर यांच्या कुटूंबामध्ये पत्नी डेल आणि मुली ऑलिव्हिया आणि सारा असा परिवार आहे. काउपर हा डावखुरा फलंदाज होता.

बॉब काउपरची कसोटीतील कारकीर्द

१९६४ ते १९६८ पर्यंत खेळल्या गेलेल्या २७ कसोटी सामन्यांमध्ये, काउपरने ४८.१६ च्या सरासरीने २०६१ धावा केल्या आहेत. या त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये पाच शतके झळकावली आहेत. त्याने वयाच्या २८ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. काउपरने व्हिक्टोरियासाठी ८३ प्रथम श्रेणी सामने खेळले. काउपर यांनी नंतर आयसीसी मॅच रेफरी म्हणून काम पाहिले. २०२३ मध्ये त्यांना ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलियाचा पदक देण्यात आला.

Today, Australian Cricket is mourning the loss of Bob Cowper OAM.

Bob was an elegant left-handed batter who scored five Test centuries for Australia, including a superb Ashes triple-century at the MCG in 1966.

Our thoughts are with Bob’s family, friends and teammates. pic.twitter.com/Zod0pDRH9T

— Cricket Australia (@CricketAus) May 11, 2025

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष माइक बेयर्ड यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “बॉब काउपर यांच्या निधनाचे वृत्त ऐकून आम्हाला खूप दुःख झाले आहे. ते ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील एक अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व होते. बॉब हा एक हुशार फलंदाज होता जो एमसीजीवरील त्याच्या प्रसिद्ध त्रिशतकासाठी तसेच १९६० च्या दशकातील ऑस्ट्रेलियन आणि व्हिक्टोरियन संघांवर त्याच्या मजबूत प्रभावासाठी नेहमीच लक्षात ठेवला जाईल.”

IND VS SL : स्मृती मानधनाची शतकीय खेळी! श्रीलंकेसमोर ट्रॉफीसाठी 343 धावांचे लक्ष्य

माइक बेयर्ड म्हणाले: “त्यांनी आयसीसी मॅच रेफरी म्हणून इतर भूमिकांमध्येही क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वतीने, या दुःखद वेळी बॉबच्या कुटुंबा, मित्रांसोबत आणि माजी सहकाऱ्यांसोबत आमच्या मनापासून संवेदना आहेत.” १४७ प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळणाऱ्या बॉब काउपरने २२८ डावांमध्ये ५३.७८ च्या सरासरीने १०५९५ धावा केल्या. या फॉरमॅटमध्ये त्याने ५८ अर्धशतके आणि २६ शतके झळकावली. काउपरने त्याच्या कारकिर्दीत ४ लिस्ट ए सामनेही खेळले. या फॉरमॅटच्या ४ डावांमध्ये त्याच्या बॅटने ७७ धावा काढल्या.

Web Title: Australian legend bob cowper passes away at the age of 84

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2025 | 03:59 PM

Topics:  

  • Australia
  • cricket
  • Test cricket

संबंधित बातम्या

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद
1

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद

Photo : T20 आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज, या 2 भारतीयांचाही यादीत समावेश
2

Photo : T20 आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज, या 2 भारतीयांचाही यादीत समावेश

Asia Cup 2025 : सुर्याची टोळी आशिया कपसाठी तयार! शुभमन गिल दिसणार नव्या भूमिकेत, असा असेल भारताचा संपूर्ण संघ
3

Asia Cup 2025 : सुर्याची टोळी आशिया कपसाठी तयार! शुभमन गिल दिसणार नव्या भूमिकेत, असा असेल भारताचा संपूर्ण संघ

Aus vs SA : एडन मार्करमने ऑस्ट्रेलिया गोलंदाजांना धुतलं! ऑस्ट्रेलीयासमोर 297 धावांचे लक्ष
4

Aus vs SA : एडन मार्करमने ऑस्ट्रेलिया गोलंदाजांना धुतलं! ऑस्ट्रेलीयासमोर 297 धावांचे लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.