फोटो सौजन्य - BCCI Women
भारत विरुद्ध श्रीलंका सामान्यांच्या पहिल्या इनिंगचा : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्या श्रीलंकेत ट्राय सिरीज मालिकेचा फायनलचा सामना सुरू आहे. या सामन्यात भारताच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये भारताच्या महिला संघाने पहिले फलंदाजी करत ७ विकेट्स गमावून ३४२ धावा केल्या आहे. यामध्ये भारतीय महिला स्टार फलंदाज स्मृती मानधना हिने संघासाठी आजच्या सामन्यात शतकीय खेळी खेळली. या सामन्यात स्मृती मानधनाच्या जोरावर भारताचा संघ मोठी धावसंख्या उभी करण्यात यशस्वी झाला.
आजच्या सामन्यांमध्ये प्रतिका रावल आणि स्मृती मानधना या दोघींनी संघाला कमालीची सुरुवात करून दिली होती यामध्ये प्रतिका रावल हिने आजच्या सामन्यात ३० धावांची खेळी खेळली. तर संघासाठी बराच काळ एक अनुभवी फलंदाज म्हणून स्मृती मानधना खंबीर उभी राहिली. आजच्या सामन्यात स्मृती मानधना हिने संघासाठी १०१ चेंडूमध्ये ११६ धावा केल्या. यामध्ये तिने २ षटकार आणि १५ चौकार मारले. या शतकासह स्मृती मानधना हिने भारतीय संघासाठी एकदिवसीय क्रिकेटमधील ११ वे शतक झळकावले आहे.
CENTURY! 🙌
11th ODI HUNDRED for vice-captain Smriti Mandhana 👏👏
Updates ▶️ https://t.co/rVyie6SUw9#TeamIndia | #WomensTriNationSeries2025 | #INDvSL | @mandhana_smriti pic.twitter.com/RSxCm0jSz2
— BCCI Women (@BCCIWomen) May 11, 2025
त्याचबरोबर आजच्या सामन्यांमध्ये जेमिमा रॉड्रिक्स हिने संघासाठी ४४ धावांची खेळी खेळली. यामध्ये तिने चार चौकार मारले. हरलीन देओल हिने संघासाठी आज महत्वाची खेळी खेळली यामध्ये तिने संघासाठी ४७ धावांची खेळी खेळाची यामध्ये तिने चार चौकार मारले. भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या बॅटने देखील आजच्या सामन्यात महत्वाच्या धावा आल्या. हरमनप्रीत कौर हिने संघासाठी ३० चेन्डुमध्ये ४१ धावा केल्या यामध्ये तिने यामध्ये तिने १ षटकार आणि ४ चौकार मारले. रिचा घोष मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरली तिने आजच्या सामन्यात ९ चेंडू खेळले आणि ८ धावा करून विकेट गमावली.+
श्रीलंकेच्या गोलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर मालकी मदारा हिने आज संघासाठी २ विकेट्स घेतले यामध्ये तिने रिचा घोष आणि अमनजीत कौर हिला बाहेरचा रस्ता दाखवला. देवकी विहंगा हिने संघाला २ विकेट्स मिळवून दिले. तिने आजच्या सामन्यात स्मृती मानधनाचा महत्वाचा विकेट घेतला आणि हरलीन देवोलला बाहेरचा रस्ता दाखवला.