Ashley Gardner creates history! She becomes the first cricketer in the world to achieve this feat in the Women's ODI World Cup.
Ashley Gardner made history : आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या थराराला ३० सप्टेंबरपासून सुरूवात झाली आहे. या स्पर्धेत सलामीच्या सामन्यात भारताने श्रीलंकेला पराभूत करून विजयी सुरुवात केली होती. तर दूसरा सामना ऑस्ट्रेलिया महिला संघ आणि न्यूझीलंड महिला संघ यांच्यात खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा ८९ धावांनी पराभव केला. या सामान्यादरम्यान ऑस्ट्रेलियाची स्टार अष्टपैलू अॅशले गार्डनरने न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकावून इतिहास रचला आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक सामन्यात सहाव्या किंवा त्यापेक्षा कमी क्रमांकावर फलंदाजी करताना शतक झळकावणारी गार्डनर पहिली क्रिकेटपटू ठरली आहे.
इंदूर येथे खेळवण्यात आलेल्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात गार्डनर आली आणि तिने न्यूझीलंडविरुद्ध फक्त ७७ चेंडूत १०० धावा पूर्ण केल्या. ४६ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर न्यूझीलंडची कर्णधार सोफी डेव्हिनला चौकार खेचून आपले शतक पूर्ण केले.
हेही वाचा : PAK W vs BAN W : पाक महिला संघ करणार विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात बांग्लादेशशी सामना! वाचा Match Preview
अॅशले गार्डनरपूर्वी, महिला एकदिवसीय विश्वचषक सामन्यामध्ये सहाव्या किंवा त्यापेक्षा कमी क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम अॅलेक्स ब्लॅकवेलच्या नावावर जमा होता. २० जुलै २०१७ रोजी, डर्बी येथे झालेल्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषका २०१७ च्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात, ब्लॅकवेलने ऑस्ट्रेलियाकडून भारताविरुद्ध ५६ चेंडूत ९० धावांची खेळी केली होती. तथापि, हा विक्रम आता अॅशले गार्डनरच्या नावावर जमा झाला आहे.
ऑस्ट्रेलियन महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने सर्वबाद ३२६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून अॅशले गार्डनरने ११५ धावांची खेळी केली. अॅलिसा हीलीने १९, फोबी लिचफिल्डने ४५, एलिस पेरीने २२, बेथ मूनीने १२, तालिया मॅकग्रा २६, सोफी मोलिनो १४ आणि किम गार्थने ३८ धावा करून योगदान दिले. न्यूझीलंडकडून ब्री लिंगने २, जेस केरने ३, ली ताहुहूने ३ आणि अमेलिया केरने २ बळी टिपले.
प्रत्युत्तरादाखल, या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंड महिला संघाचा संघ २३७ धावांच करू शकला. न्यूझीलंडकडून सोफी डेव्हाईनने दमदार १११ धावांची खेळी केली, परंतु, टी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. अॅमेलिया केरने ३३ धावा, ब्रुक हॅलिडेने २८ धावा, मॅडी ग्रीनने २० धावा केल्या, आणि इसाबेल गेझने २८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून सोफी मोलिनोनेस आणि अॅनाबेल सदरलँडने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या आणि अलाना किंगने २ विकेट्स घेतल्या.