फोटो सौजन्य - सोशल मिडिया
आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकाचा आज तिसरा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान या दोन संघांमध्ये रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी तीन वाजता सुरू होईल. पाकिस्तानचे सर्व सामने हे श्रीलंकेमध्ये खेळवले जाणार आहेत त्यामुळे बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये होणारा सामना हा श्रीलंकेमधील कोलंबो येथील प्रेमदासा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामधील हेड टू हेड आकडेवारीवर नजर टाकली तर बांगलादेश महिला संघ विरुद्ध पाकिस्तान महिला संघ यांच्यामध्ये आतापर्यंत 16 सामने खेळवण्यात आले आहेत आणि दोन्ही संघाने आतापर्यंत 8-8 सामने खेळवण्यात आले आहेत म्हणजेच बरोबरीचा मुकाबला आतापर्यंत पाहायला मिळाला आहे. दोन्ही संघांसाठी हा पहिला सामना महत्त्वाचा असणार आहे हे दोन्ही संघ महिला विश्वचषकाच्या या स्पर्धेत विजयाने सुरुवात करण्याच्या हेतूनेच मैदानात उतरतील.
A crucial match at #CWC25 as two Asian rivals take on each other in Colombo 🔥 Details on how to watch 👉https://t.co/7wsR28PFHI pic.twitter.com/sKsZeYIG5p — ICC (@ICC) October 2, 2025
बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये महिला विश्वचषकाचा हा सामना टेलिव्हिजनवर पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी स्टार स्पोर्ट नेटवर्कवर हा सामना पाहून आता येणार आहे तर या सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग ही जिओहॉटस्टारवर पाहू शकतात. या सामन्याचे नाणेफेक सामन्याच्या अर्ध्या तासा आधी होणार आहे म्हणजेच 2.30 मिनिटांनी या सामन्याचे नाणेफेक होईल.
गेल्या एकदिवसीय विश्वचषकात बांगलादेशी संघाला फक्त एकच सामना जिंकता आला, जो योगायोगाने पाकिस्तानविरुद्ध झाला होता. सात सामन्यांपैकी फक्त एका विजयासह संघाने दोन गुण मिळवले. निगार सुलतानाच्या नेतृत्वाखालील संघ स्पर्धेची विजयी सुरुवात करण्यासाठी आणखी एक विजय मिळविण्यास उत्सुक असेल.
२०२५ च्या महिला विश्वचषकातील हा तिसरा सामना श्रीलंकेतील कोलंबो येथे खेळला जाणार आहे. या सामन्यादरम्यान तापमान ३१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. सामन्यादरम्यान पावसाची शक्यता आहे, परंतु आर्द्रता सुमारे ६२% असण्याची अपेक्षा आहे. हा सामना श्रीलंकेतील कोलंबो येथे खेळला जाणार आहे. या मैदानावर खेळल्या गेलेल्या गेल्या सात सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने चार सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. पहिल्या डावात सरासरी धावसंख्या २७५ धावा आणि दुसऱ्या डावात सरासरी धावसंख्या २४६ धावा आहेत. कोलंबोच्या खेळपट्टीवर फिरकीपटूंनी वर्चस्व गाजवले आहे.
बांगलादेश महिला: फरगाना हक, शोभना मोस्तारी, शर्मीन अख्तर, निगार सुलताना (कर्णधार आणि यष्टीरक्षक), रितू मोनी, शोर्ना अख्तर, फहिमा खातून, नाहिदा अख्तर, राबेया खान, सुमय्या अख्तर, मारुफा अख्तर.
पाकिस्तान महिला : मुनीबा अली, ओमामा सोहेल, आयमान फातिमा, सिद्रा अमीन, नतालिया परवेझ, फातिमा सना (कर्णधार), सिद्रा नवाज (विकेटकीपर), आलिया रियाझ, नशरा संधू, डायना बेग, सादिया इक्बाल.