आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकातील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया महिला संघाने न्यूझीलंड महिला संघाचा ८९ धावांनी पराभव केला. या ऑस्ट्रेलियाची अॅशले गार्डनरने न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकवून इतिहास रचला आहे.
या महिन्यात म्हणजेच ३० सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या महिला एकदिवसीय विश्वचषकात दक्षिण आफ्रिका नव्या आत्मविश्वासाने प्रवेश करेल आणि पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठण्याचे ध्येय ठेवेल असे कर्णधार वोल्वार्डने म्हटले आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आता या मेगा इव्हेंटसाठी संघ जाहीर केला आहे. खराब फॉर्ममधून जात असलेल्या पाकिस्तान संघावर या स्पर्धेत खूप दबाव येणार आहे. पीसीबीने एका तरुण खेळाडूला कर्णधार बनवले आहे.
हरमनप्रीत कौर पुन्हा एकदा टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. आता टीम इंडियाने वर्ल्ड कपच्या तयारीसाठी एक विशेष योजना तयार केली आहे. २०२५ च्या विश्वचषकापूर्वी टीम इंडियाचा सराव शिबिर असेल.
30 सप्टेंबरपासून विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. या विश्वचषकासाठी भारत, इंग्लडच्या संघानी घोषणा केली आहे. त्याचबरोबर आता बांग्लादेशच्या संघाने देखील घोषणा केली आहे.
या विश्वचषकामध्ये भारताच्या महिला संघाने चांगली कामगिरी करावी अशी क्रिकेट चाहत्यांची इच्छा आहे. यासाठी आता भारताची माजी कर्णधार मिताली राज हिने टीम इंडियाला एक नवा गुरु मंत्र दिला आहे.