
चले तो चाँद तक, वरना...! कर्णधार झाला तरी नशीब फुटकचं; वेस्ट इंडिजविरुद्ध Babar Azam चा फ्लॉप शो
सध्या सुरू आहे पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी सामना
वेस्ट इंडिजने पाकिस्तानसमोर उभा केला धावांचा डोंगर
कर्णधार बाबर आजम ठरला अपयशी
West Indies Vs Pakistan WTC Test Series: सध्या वेस्ट इंडिजमध्ये पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. ही टेस्ट सिरिज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत खेळवली जात आहे. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. वेस्ट इंडिजने 311 रन्स केल्या. समोर पाकिस्तान फलंदाजी करण्यासाठी आला असताना कर्णधार बाबर आजम पुन्हा एकदा अपयशी ठरल्याचे दिसून आले आहे.
वेस्ट इंडिजने 311 रन्सचे ट्रायल दिल्यावर पाकिस्तानने फलंदाजी सुरू केली. या सिरिजसाठी बाबर आजमला कर्णधार करण्यात आले आहे. पहिल्या डावात तो एक लहानशी खेळी करून आउट झाला. तर माजी कर्णधार शान मसूदने एक शानदार खेळी केली आहे. तो अजून नॉट आउट खेळत आहे. मात्र बाबर आजम अपयशी ठरला आहे.
पाकिस्तानचा संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 311 रन्स केल्या. वेस्ट इंडिजचा कर्णधार शे होपने 92 रन्सची खेळी केली. मात्र तो शतक पूर्ण करू शकला नाही. पाकिस्तान फलंदाजी करण्यासाठी आला असतं त्यांचा सलामीवीर अजान उवेस शून्यावर आउट झाला. इमाम उल हक आणि माजी कर्णधार शान मसूद यांनी चांगली भागीदारी केली. इमाम उल हकने 63 रन्स केल्या.
कर्णधार बाबर आजाम चौथ्या नंबरवर खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. मात्र तो मोठी खेळी करू शकला नाही. पाकिस्तानचे कसोटी कर्णधारपद बाबर आजमकडे देण्यात आले आहे. मात्र तो केवळ 23 रन्सची खेळी करून आउट झाला. कर्णधार म्हणून तो मोठी खेळी करू शकला नाही. तर माजी कर्णधार शान मसूद अद्याप खेळत आहे. पाकिस्तानचा संघ सध्या 199 वर असून त्यांनी 3 विकेट्स गमावल्या आहेत. पाकिस्तानचा संघ 112 रन्सने मागे आहे.
PAK Vs WI: लढाई अस्तित्वाची! वेस्ट इंडिज अन् पाकिस्तान आमनेसामने; WTC मध्ये उलथापालथ…
वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानमध्ये सध्या दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. ही टेस्ट सिरिज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत खेळवली जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये पाकिस्तान शेवटच्या स्थानावर आहे तर वेस्ट इंडिज शेवतून दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे त्यांना डब्ल्युटीसीमध्ये खेळणीसाठी अनेक सामने जिंकावे लागणार आहेत.