वेस्ट इंडिज विरुद्ध पाकिस्तान टेस्ट सिरिज (फोटो- ians)
कधीपासून सुरू होणार?
वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यातील टेस्ट सिरिज 25 जुलै म्हणजेच उद्यापासून सुरू होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत ही सिरिज खेळवली जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना 7.30 वाजता सुरू होणार आहे. पूर्ण 90 ओव्हर्स पहिल्या दिवशी झाल्या तर पहिला मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास संपू शकतो.
भडका उडणार! India- Sri Lanka कसोटी मालिकेत जसप्रीत बुमराह खेळणार की नाही? बीसीसीआय लवकरच…
या सिरिजमध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बाबर आजमवर पुन्हा एकदा विश्वास दर्शवला आहे. पाकिस्तान कसोटी संघाचे नेतृत्व बाबर आजमकडे सोपविण्यात आले आहे. त्याच्या नेतृत्वात पाकिस्तानचा संघ खेळणार आहे. सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये हे दोन्ही संघ शेवटच्या स्थानांवर आहेत. वेस्ट इंडिज आठव्या तर पाकिस्तान नवव्या स्थानावर आहे.
वर्ल्ड टेस्टचॅम्पियनशिप अंतर्गत खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजच्या संघाने 10 पैकी केवळ एकच सामना जिंकला आहे. दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. तर सात सामने वेस्ट इंडिजचा संघ पराभूत झाला आहे. तर पाकिस्तान एकूण चार सामने खेळला आहे. त्यामध्ये पाकिस्तानचा संघ चार पैकी एकच सामने जिंकला आहे. तुम्हाला ही सिरिज भारतात पाहायची असल्यास फॅन कोडवर पाहू शकणार आहात.
NZ Vs ENG: इंग्लंडचा सूपडा साफ, तर न्यूझीलंडची गरुडझेप; WTC Points टेबलमध्ये मोठी उलथापालथ
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सशिपचा हिस्सा असणार भारत-श्रीलंका सिरिज
ऑगस्ट महिन्यात भारत अन् श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. लवकरच ही कसोटी मालिका सुरू होणार आहे. त्याआधीच भारताने अफगणिस्तानविरुद्ध एकमेव कसोटी सामना जिंकला होता. या कसोटी सामन्याचा समावेश वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सशिपमध्ये नव्हता. मात्र भारत अन् श्रीलंका टेस्ट सिरिजचा समावेश डब्लूटीसीमध्ये असणार आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी ही मालिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे.






