वेस्ट इंडिज विरुद्ध पाकिस्तान (फोटो- सोशल मिडिया)
वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यात सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी वेगवान गोलंदाज अल्जारी जोसेफ याने संघात खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. वेस्ट इंडिज संघाचा मुख्य प्रशिक्षक डैरेन सैमी यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. वेगवान गोलंदाज अल्जारी जोसेफ याने पाकिस्तानविरुद्ध शनिवारपासून सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळण्यास स्पष्ट नकार दिल्याचे समोर येत आहे.
PAK Vs WI: लढाई अस्तित्वाची! वेस्ट इंडिज अन् पाकिस्तान आमनेसामने; WTC मध्ये उलथापालथ…
‘आमच्यासाठी हा एक खूप मोठा धक्का आहे. तसेच संघाला मोठे नुकसान होऊ शकते. जोसेफ संघात निवड होण्यास देखील नकार दिला आहे. टेस्ट सिरिज सुरू होण्याच्या आधी झालेल्या पत्रकार परिषदेत वेस्ट इंडिजचे हेड कोच डॅरेन सामी यांनी माहिती दिली आहे. यामुळे विंडीजच्या गोलंदाजी आक्रमणाला मोठा धक्का बसणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या दृष्टीने ही टेस्ट सिरिज महत्वाची समजली जात आहे.
अल्जारी जोसेफची निवड करण्यात आली होती. तो नुकताच दुखापतीतून सावरून परतला होता. मात्र त्याने काही कारणाने नकार दिला. तो नुकताच दुखापतीमधून बरा झाला होता. मात्र त्याने संघात खेळण्यास नकार दिला आहे. हा निर्णय माझ्या अधिकार क्षेत्राबाहेरचा आहे. अल्जारी जोसेफने श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांमध्ये प्रभावी कामगिरी केली होती. त्याने या सामन्यांमध्ये एकूण 6 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांच्या वनडे सिरिजमध्ये चांगली कामगिरी केली होती. पहिल्याच सामन्यात त्याने 4 विकेट्स घेत शानदार प्रदर्शन केले होते.
भडका उडणार! India- Sri Lanka कसोटी मालिकेत जसप्रीत बुमराह खेळणार की नाही? बीसीसीआय लवकरच…
कधीपासून सुरू होणार?
वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यातील टेस्ट सिरिज 25 जुलै म्हणजेच उद्यापासून सुरू होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत ही सिरिज खेळवली जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना 7.30 वाजता सुरू होणार आहे. पूर्ण 90 ओव्हर्स पहिल्या दिवशी झाल्या तर पहिला मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास संपू शकतो.






