
फोटो सौजन्य AI
त्यामुळे आता होणाऱ्या बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेसाठी आयोजकांनी माकडांना स्पर्धेपासून दूर ठेवण्यासाठी कंबर कसली आहे . त्यांनी चक्क स्पर्धा होईपर्यंत माकडांचा एक विशिष्ठ आवाज काढून त्यांना घाबरवणारे आणि पाळायला भाग पाडणारे लोकं कामावर ठेवली आहेत . तसेच इतर प्राणी पक्षांसाठी सुद्धा उपाय यंत्रणा केली आहे .
तसेच वन्यजीव कायद्यानुसार आता लंगूर माकडाचा वापर करण्यावर बंदी आल्यानंतर आता काही प्रशिक्षित माणसं माकडाचा आवाज काढतात . या अश्या दिल्लीतल्या लोकांवर एक हिंदी सुंदर हिंदी सिनेमा ही येऊन गेला आहे . एब अलाय ओ असं त्या सिनेमाचं नाव आहे . हा सिनेमा नेटफ्लिक्स वर उपलब्ध आहे .
त्रासदायक पक्षांना स्पर्धेच्या ठिकाणापासून दूर ठेवण्यासाठी अमेरिकेतून पक्षांचा एक विशिष्ठ आवाज काढणारं मशीन मागवले आहे . खास कबुतरांना दूर पळवण्यासाठी आणि तात्पुरते पकडण्यासाठी एक बिन विषारी जेल बनवलं आहे . ज्याचे दरवाजे स्वयंचलित पद्धतीने बंद होतील आणि उघडतील अशी यंत्रणा त्याला आहे . याव्यतिरिक्त इतरही बऱ्याच उपाय योजना घेतल्या गेल्या आहेत . या सगळ्या खबरदारीमुळे आयोजकांनी सुटकेचा निश्वास तात्पुरता तरी टाकला आहे . असे बोलले जात आहे .
इंडिया ओपन स्पर्धे दरम्यान लायटिंगचा मुद्दा चर्चेत आला होता . सामना सुरु असताना कोर्टवर कमी लाइट्समुळे सावली पडता कामा नये म्हणून २२०० आणि २४०० प्रकाशमान देणारे दिवे कोर्टच्या समान अंतरावर बसवण्यात आले आहे . तसेच कोर्टच्या वरच्या बाजूला पांढरा प्रकाश देणारा दिवा सुद्धा बसवण्यात आला आहे . सामन्याच्या पुरस्कार वितरणावेळी सुद्धा खास दिव्यांची व्यवस्था करण्यात आली आहे . या सगळ्या लायटिंग मुळे यावेळची स्पर्धा दिमाखात पार पडेल असे आश्वासन आयोजकांनी दिले असल्याचे बोलले जात आहे .
Sarfaraz Khan: टीम इंडियात दमदार कमबॅक, सरफराज खानचं शेवटपर्यंत पक्कं नव्हतं नाव; Inside Story
माकडांचा आवाज काढणाऱ्या चार जणांपैकी एक माणूस जब्बार हा दिल्लीतल्या रोहिणी भागात राहतो . तो सांगतो कि त्याला ही कला त्याच्या वडिलांकडून मिळाली . पण त्याच्या मुलाने ही फक्त कला म्हणून शिकावी आणि व्यवसायासाठी दुसरं काहीही करावं . नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉक या अतिमहत्वाच्या आणि सत्ताकेंद्रांतही माकडं खूप उच्छाद मांडतात . अश्यावेळी जब्बार सारख्या मंडळींना सरकार रीतसर टेंडर काडून कामावर बोलावत . जब्बारला या कामाचे महिन्याला पंचवीस हजार रुपये मिळतात .