BAN vs SL Asia Cup 2023 Live : बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या बांगलादेशची सुरुवात निराशाजनकच झाली. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या बांगलादेशची सुरुवात थोडी निराशाजनकच झाली. बांगलादेशची सलामी जोडीची सुरुवात अडखळत झाली. तान्झीद हसन हा शून्यावरच तंबूत परतला, त्यानंतर मोहम्मद नाईम याने 16 धावा करुन धनंजय डिसल्वाच्या चेंडूवर पॅव्हेलिनचा रस्ता धरला. त्यानंतर आलेला नजमुल हुसेन शांतो सध्या 52 धावांवर खेळत आहे. बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन हा अवघ्या 5 धावा करून मथिशा पथिराणाच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्यानंतर तोव्हीद हिदोयला शांकाने पायचित करून 20 धावांवर तंबूत पाठवले. सध्या बांगलादेशचा विकेटकिपर मुस्तफिर रशिम आणि नजमुल हुसेन शांतो खेळत आहेत.
बांगलादेशच्या फलंदाजांची घसरगुंडी : मुस्तफीर राशिम विकेटकिपर आणि नजमुल हुसेन शांतो या दोघांमध्ये चांगली भागिदारी जमत असताना, मुस्तफीर मथीशा पथिरानाच्या गोलंदाजीवर करुणारत्नेद्वारे झेलबाद झाला. त्यानंतर आलेल्या मेहंदी हसन मीराझ अवघ्या 5 धावा करून रनआऊट झाला. त्यानंतर मेहंदी हसन हा पायचित होऊन अवघ्या 6 धावांवर तंबूत परतला. त्यानंतर अक्षरशः फलंदाजांची रांगच लागली. केवळ औपचारिकता म्हणून फलंदाज मैदानात येत होते आणि जात होते. शेवटच्या फळीतील तास्कीन अहमद, शोरफुल इस्लाम, मुस्तफिर रेहमान हे 2 धावांच्या पुढे देखील गेले नाहीत. बांगलादेशच्या फलंदाजांची अक्षरशः दाणादाण उडाली.