१० मिनिटांमध्ये साखरेचा वापर न करता झटपट बनवा मोरावळा
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवळा खायला खूप जास्त आवडतो. आवळ्याचे नाव ऐकल्यानंतर काहींच्या तोंडाला पाणी सुटते. चटकदार आवळ्यापासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. थंडीच्या दिवसांमध्ये बाजरात मोठ्या प्रमाणावर आवळे उपलब्ध असतात. कच्च्या आवळ्याचे सेवन केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. थंडीत शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आवळ्याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे तुम्ही दीर्घकाळ निरोगी राहता. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये साखरेचा वापर न करता मोरावळा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. सकाळी उठल्यानंतर एक मोरावळा खाल्ल्यास संपूर्ण दिवसभरात शरीरात ऊर्जा टिकून राहील आणि थकवा, अशक्तपणा जाणवणार नाही. चला तर जाणून घेऊया मोरावळा बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – istock)






