Batting legend dies! 12-year-old boy dies tragically on cricket field, read in detail..
फिरोजाबाद : भारतात क्रिकेट क्रिकेट प्रेम जगजाहीर आहे. अनेक जण क्रिकेट खेळताना आजूबाजूला दिसत असतात. अशातच उत्तर प्रदेशमधील फिरोजाबादमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. क्रिकेट मैदानावर अनुचित घटना घडल्याचे समोर आले आहे. १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू ओढवला. तो फलंदाजी करत असताना चेंडू त्याच्या छातीवर जाऊन आदळला, त्यानंतर तो बेशुद्ध पडला आणि नंतर त्याची प्राणज्योत मालवली.
उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यातील टुंडला पोलिस स्टेशन परिसरात क्रिकेट सामन्यादरम्यान ही घटना घडलिया आहे. दवाचा चेंडू लागल्याने १२ वर्षांचा मुलगा बेशुद्ध पडला आणि नंतर त्याचा एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांकडून याबद्दल माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलाचे नाव अंश असे असून तो फिरोजाबादचा रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा तो मैदानावर फलंदाजी करत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
शहर पोलिस अधीक्षक रविशंकर प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, नरखी पोलिस स्टेशन परिसरातील गढी रणछोर मोहल्ला येथील रहिवासी असणारा अंश सोमवारी संध्याकाळी फ्युचर क्रिकेट अकादमीच्या वतीने टुंडला येथे अंतिम सामना खेळण्यासाठी गेला होता. प्रसाद पुढे म्हणाले की, सामना खेळत असताना विरोधी गोलंदाजाचा चेंडू अंशच्या छातीवर आदळला, ज्यामुळे तो अचानक बेशुद्ध पडला. अधिकाऱ्याने सांगितले की, त्याला ताबडतोब एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तक्रारीच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे.
अंश त्याच्या पालकांचा एकुलता एक मुलगा होता. क्रिकेट हा खेळ त्याच्या आवड होती. टी त्याची ओळखही बनली होती. प्रतिभावान असल्याने, कुटुंबाने त्याला फ्युचर क्रिकेट अकादमीमध्ये भरती केले होते. जिथे तो सतत खेळाच्या बारकावे शिकत असल्याची माहिती मिळत आहे. दुर्दैवाने, या खेळासाठी त्याची असणारी आवड त्याच्याच मृत्यूचे कारण बनली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात आज अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल फायनल सामना होणार आहे. आयपीएल 2025 ला एक नवीन विजेता मिळणार आहे. हा सामना दोन्ही संघांना फारच महत्वाचा असणार आहे. कारण आज जो संघ विजयी होणार आहे तो संघ पहिल्यांदाच आयपीएलच्या इतिहासामध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकणार आहेत. यंदा आयपीएल २०२५ मध्ये आरसीबीचे कर्णधारपद हे रजत पाटीदार यांच्याकडे सोपवण्यात आले होते. श्रेयस अय्यर पंजाब किंग्सच्या संघाचे नेतृत्व करीत आहे.