भारत वि इंग्लंड लायन्स(फोटो-सोशल मीडिया)
IND Vs England Lions: इंडिया अ आणि इंग्लंड लायन्स यांच्यातील पहिला अनधिकृत कसोटी सामना अनिर्णित राहिला आहे. दोन्ही संघांच्या फलंदाजांनी सपाट फलंदाजीच्या ट्रॅकचा चांगलाच फायदा घेऊन भरपूर धावा केल्या आहेत. भारत अ संघाने पहिल्या डावात ५५७ धावा केल्या. तर इंग्लंड लायन्सने पहिल्या डावात ५८७ धावा उभारल्या होत्या. दुसऱ्या डावात, भारत अ संघाच्या फलंदाजांनी २ गडी गमावून २४१ धावा करून सामना अनिर्णित राखला.
इंग्लंड लायन्सच्या टॉप-ऑर्डर फलंदाजांनी शानदार कामगिरी केल्यानंतर, खालच्या ऑर्डरने देखील दमदार कामगिरी करत भारत अ गोलंदाजांना चांगले दमवले आहे. यजमान संघाने पहिल्या सत्रात वर्चस्व राखले आणि पहिल्या डावात ५८७ धावा करून ३० धावांची आघाडी देखील मिळवली. त्यानंतर यशस्वी जयस्वाल (६० चेंडूत ६४), कर्णधार अभिमन्यू ईश्वरन (८७ चेंडूत ६८), ध्रुव जुरेल (नाबाद ५३) आणि नितीश कुमार रेड्डी (४७ चेंडूत नाबाद ५२) यांनी अर्धशतके झळकावली असून ६ जून रोजी नॉर्थम्प्टन येथे सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी आत्मविश्वास वाढवला आहे.
हेही वाचा : IPL 2025 जिंकणाऱ्या संघावर होणार पैशांचा पाऊस! उपविजेत्या संघाला मिळणार इतकी रक्कम
भारत अ संघाने शेवटच्या दिवशी दुसऱ्या डावात ४१ षटकांत २ बाद २४१ धावा केल्या, त्यानंतर २५ षटके शिल्लक असताना सामना रद्द करण्यात आला. इंग्लंडविरुद्ध लीड्स येथे होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळणे जवळजवळ निश्चित असल्याने भारत अ संघाचे प्रशिक्षक ऋषिकेश कानिटकर यांनी रेड्डी यांना चौथ्या क्रमांकावर पाठवले. त्याचप्रमाणे, पहिल्या डावात ९४ धावा करणाऱ्या जुरेलने सामन्यातील दुसरे अर्धशतक झळकावलेया आहे.
जयस्वालने दुसऱ्या डावाची सुरुवात डावखुरा वेगवान गोलंदाज जोश हलला षटकार लगावून केली. जेवणानंतरच्या सत्रात जयस्वाल आणि ईश्वरन यांनी प्रत्येकी आठ चौकार लगावले होते. इंग्लंड लायन्सची गोलंदाजी भारतीय आक्रमणाइतकीच सामान्य दिसून आली होती आणि कोणीही फलंदाजांना कोणत्याही प्रकारच्या अडचणीत आणू इच्छित नव्हते असे दिसत होते.
पहिल्या डावात ९२ धावा करणारा सरफराज खान आणि पहिल्या डावात द्विशतक झळकवणारा करुण नायर यांना पुरेसा फलंदाजीचा वेळ मिळाला होता आणि त्यामुळे त्यांना फलंदाजीसाठी पाठवण्यात आले नाही. नायर कसोटी संघाचा भाग आहे. त्याआधी, इंग्लंड लायन्सने सात बाद ५२७ धावांवरून सुरुवात केली होती तेव्हा खालच्या फळीतील फलंदाजांनी ६० धावा केल्या होत्या.
हेही वाचा : टी-20 मालिकेसाठी संघ जाहीर! संघाची झाली घोषणा! 31 वर्षीय खेळाडूला केले कर्णधार
एडी जॅक (२५) आणि अजित सिंग डेल (नाबाद २७) यांनी शेवटच्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी रचत भारत अ संघाच्या गोलंदाजांना निराश केले. इंग्लंड लायन्सच्या डावामध्ये टॉम हेन्स (१७१), मॅक्स होल्डन (१०१) आणि डेन मौस्ली (११३) या तीन डावखुऱ्या फलंदाजांनी शतक लगावले आहेत. भारत अ संघाकडून, मुकेश कुमार हा इतर गोलंदाजांमध्ये सर्वोत्तम गोलंदाज ठरला आहे. त्याने २५ षटकांत ९२ धावांत ३ धावा घेतल्या, तर शार्दुल ठाकूरने २८ षटकांत १०५ धावांत २ बळी घेतले.