फोटो सौजन्य - ICC/PCB/BCCI सोशल मीडिया
ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे यंदा सोपवण्यात आले होते. पण ही स्पर्धा भारतीय संघाच्या सुरक्षेच्या कारणामुळे हायब्रीड पद्धतीने खेळवण्यात आली होती. त्यामुळे भारतीय संघाचे सर्व सामने दुबईमध्ये खेळवण्यात आले तर उर्वरित संघाचे सामने लाहोर, कराची या ठिकाणी खेळवण्यात आले होते. आता चॅम्पियन ट्रॉफी झाल्यानंतर आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक सुरु होणार आहे. या स्पर्धेचे आयोजन कुठे आयसीसी करणार यावर अजूनही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
SA Vs NZ : शतक ठोकूनही David Miller च्या डोळ्यात अश्रू! आणखी एकदा साऊथ आफ्रिकेच्या झोळीत निराशा
सध्याची चॅम्पियन्स ट्रॉफी संपल्यानंतर एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत, पाकिस्तानमध्ये आणखी एक आयसीसी स्पर्धा सुरू होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) महिला विश्वचषक पात्रता फेरीची घोषणा करणार आहे, जी पाकिस्तानमध्ये होण्याची शक्यता आहे. सहा संघांची ही स्पर्धा ४ एप्रिलपासून सुरू होण्याची अपेक्षा आहे. अद्याप याची पुष्टी झालेली नसली तरी, अंतिम सामना लाहोरमध्ये होईल असे मानले जाते.
महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ या वर्षी ऑक्टोबरमध्ये आयोजित केला जाणार आहे आणि भारताला त्याचे अधिकृत यजमानपद मिळाले आहे. परंतु स्पर्धेच्या पात्रता सामन्यांचे आयोजन भारताच्या शेजारील देश पाकिस्तानला देण्यात आले आहे. यावेळी २०२५ च्या महिला एकदिवसीय विश्वचषकात एकूण ८ संघ सहभागी होतील, ज्यात पाकिस्तान, स्कॉटलंड, आयर्लंड, श्रीलंका, थायलंड आणि वेस्ट इंडिज या संघांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, न्यूझीलंड आणि यजमान भारत यांनी या वर्षी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या ५० षटकांच्या स्पर्धेसाठी आधीच आपले स्थान निश्चित केले आहे.
19 वर्षानंतर Mushfiqur Rahim चा एकदिवसीय क्रिकेटला अलविदा, म्हणाला – मला कळले आहे की…
राजकीय कारणांमुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये दीर्घकाळापासून तणाव आहे आणि त्यामुळे दोन्ही देश एकमेकांविरुद्ध द्विपक्षीय मालिका खेळत नाहीत. भारताने सध्या सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता आणि आता हायब्रिड मॉडेलमुळे ते त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळत आहेत. जर पाकिस्तान महिला संघ विश्वचषकासाठी पात्र ठरला तर वादाचा मुख्य मुद्दा हा असेल की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना तिसऱ्या देशात होणार की नाही आणि जर सामना होणार असेल तर तो कुठे होईल? हे चित्र अजूनही अस्पष्ट आहे.
चॅम्पियन ट्रॉफीच्या यजमान पदावरून मोठा वाद पाहायला मिळाला होता. पाकिस्तानमध्ये झालेल्या घटनेमुळे ३० वर्षानंतर आयसीसी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा यावर वाद होण्याच्या शक्यता वर्तवली जात आहे. चॅम्पियन ट्रॉफीचा शेवटचा सामना दुबईमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्याचे आयोजन ९ मार्च रोजी करण्यात आले आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये या दोन संघामध्ये फायनलचा सामना रंगणार आहे.