फोटो सौजन्य - X सोशल मिडीया
Mushfiqur Rahim Retirement : चॅम्पियन ट्रॉफीचा आता शेवटचा सामना शिल्लक राहील आहे. यामध्ये फायनलच्या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड ट्रॉफीसाठी लढताना दिसतील. भारताच्या गटामध्ये बांग्लादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंड हे संघ होते. यामध्ये पाकिस्तान आणि बांग्लादेशच्या संघाची निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली आहे. बांग्लादेशच्या संघाला एकही सामन्यांमध्ये विजय मिळवता आला नाही आता टीम बांग्लादेशच्या संघाच्या दिग्गज खेळाडूच्या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.
SA vs NZ : टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या, आयसीसी स्पर्धेत 5 शतक, रचिन रवींद्र भारतासाठी धोका!
२०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याच्या आणि बांग्लादेश संघाच्या खराब कामगिरीनंतर बांग्लादेशचा यष्टीरक्षक-फलंदाज मुशफिकुर रहीमने निवृत्तीची घोषणा केली आहे. मुशफिकुर रहीम बांग्लादेशकडून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसणार नाही. बुधवार ५ मार्च रोजी मुशफिकुरने निवृत्तीची घोषणा केली. त्यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. बुधवारीच बांग्लादेश संघाचे वार्षिक करार जाहीर करण्यात आले. त्यानंतर लगेचच त्याने निवृत्तीची घोषणा केली. तो बांग्लादेशकडून जवळपास १९ वर्षे एकदिवसीय क्रिकेट खेळला.
मुशफिकुर रहीमने त्याच्या फेसबुक पेजवर लिहिले की, “मी आजपासून एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत आहे. सर्व गोष्टींसाठी अल्लाहू अकबर. जागतिक स्तरावर आपल्या कामगिरी मर्यादित असल्या तरी, एक गोष्ट निश्चित आहे, जेव्हा जेव्हा मी माझ्या देशासाठी मैदानावर पाऊल ठेवले तेव्हा मी समर्पण आणि प्रामाणिकपणाने १००% पेक्षा जास्त दिले.” या स्पर्धेत संघाचा प्रवास संपताच स्टीव्ह स्मिथने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याचा संघ उपांत्य फेरीत भारताकडून पराभूत झाला.
यष्टीरक्षक-फलंदाजाने पुढे लिहिले की, “गेले काही आठवडे माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होते आणि मला जाणवले आहे की हेच माझे नशीब आहे.” मुशफिकुरने ऑगस्ट २००६ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले. आता तो या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा बांगलादेशी खेळाडू आहे. त्याने २७४ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ३६.४२ च्या सरासरीने ७,७९५ धावा केल्या आहेत आणि त्याचा सर्वोत्तम स्कोर १४४ आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये नऊ शतकेही केली आहेत. यष्टिरक्षक म्हणून त्याने २४३ झेल घेतले आहेत आणि ५६ स्टंपिंग केले आहेत. तो शेवटचा सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. पाकिस्तान विरुद्धचा सामना रद्द करण्यात आला.