Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vaibhav Suryvanshi अन् ‘या’ खेळाडूंची Team India त एन्ट्री; श्रीलंकेविरुद्ध खेळणार

भारत अ आणि श्रीलंका अ तसेच 'अफगाणिस्तान अ' या संघांमध्ये सामने होणार आहे. या वन-से ट्राय सिरिजमध्ये अनेक युवा खेळाडू दिसणार आहेत. त्यामुळे आशियाई क्रिकेटमधील युवा खेळाडूंमध्ये तगडी स्पर्धा पाहायला मिळणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 14, 2026 | 05:33 PM
Vaibhav Suryvanshi अन् ‘या’ खेळाडूंची Team India त एन्ट्री; श्रीलंकेविरुद्ध खेळणार
Follow Us
Follow Us:

वैभव सूर्यवंशीची भारतीय संघात एन्ट्री 
टीम इंडिया ए ची घोषणा 
तिलक वर्मा करणार भारताचे नेतृत्व

Vaibhav Suryvanshi Entry In Team India: बीसीआयने भारतीय संघांची घोषणा केली आहे. भारतीय संघ लवकरच श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. जून महिन्यात सामने होणार आहेत बीसीसीआयने भारत अ संघाची घोषणा केली आहे. या दौऱ्यात बीसीसीआयने अनेक युवा खेळाडूना संधी दिली आहे. त्याबाबत जाणून घेऊयात.

जून महिन्यात भारत अ आणि श्रीलंका अ तसेच ‘अफगाणिस्तान अ’ या संघांमध्ये सामने होणार आहे. या वन-से ट्राय सिरिजमध्ये अनेक युवा खेळाडू दिसणार आहेत. त्यामुळे आशियाई क्रिकेटमधील युवा खेळाडूंमध्ये तगडी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. बीसीसीआयने या संघाची धुरा तिलक वर्माकडे सोपवली आहे. तर या संघाकडून वैभव सूर्यवंशी, प्रियांश आर्या यांना निवडकर्त्यांनी मोठी संधी दिली आहे. त्यामुळे ‘भारत अ’ संघाची फलंदाजी अधिक मजबूत झाली आहे. भविष्यातील सिनियर टीम इंडियाच्या दृष्टीने या युवा खेळाडूंसाठी हा दौरा सुवर्णसंधी मानला जात आहे.

बीसीसीआयने प्रियांश आर्या आणि वैभव सूर्यवंशीसह, आयुष बडोनी, निशांत सिंधू या नवख्या खेळाडूना संधी दिली आहे. श्रीलंका अ आणि अफगाणिस्तान अ विरुद्धची ही त्रिकोणीय मालिका या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील दबावाचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार करेल, असे बीसीसीआयचे म्हणणे असल्याचे समोर येत आहे.

प्रभसिमरन सिंग आणि कुमार कुशाग्र यांच्या खांद्यावर विकेट कीपिंगची जबाबदारी सांभाळणार आहेत. या दोन्ही खेळाडूंनी आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या स्फोटक फलंदाजीने आणि उत्कृष्ट विकेट कीपिंगने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. गोलंदाजीची धुरा यश ठाकूर, युद्धवीर सिंग, अंशुल कंबोज आणि अरशद खान या वेगवान गोलंदाजांवर असणार आहे.

‘भारत अ’ श्रीलंका दौरा २०२६: ट्राय सिरिज शेड्युल

सामना क्र. दिवस दिनांक सामना (Fixture) मैदान (Venue)
१ मंगळवार ०९ जून २०२६ भारत अ vs श्रीलंका अ दांबुला (Dambulla)
२ गुरुवार ११ जून २०२६ भारत अ vs अफगाणिस्तान अ दांबुला (Dambulla)
३ शनिवार १३ जून २०२६ अफगाणिस्तान अ vs श्रीलंका अ दांबुला (Dambulla)
४ सोमवार १५ जून २०२६ भारत अ vs श्रीलंका अ दांबुला (Dambulla)
५ बुधवार १७ जून २०२६ भारत अ vs अफगाणिस्तान अ दांबुला (Dambulla)
६ शुक्रवार १९ जून २०२६ अफगाणिस्तान अ vs श्रीलंका अ दांबुला (Dambulla)
७ रविवार २१ जून २०२६ महाअंतिम सामना (FINAL)

Web Title: Bcci announcement vaibhav suryvanshi priyansh arya india team a against srilanka tri series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 05:33 PM

Topics:  

  • bcci
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

श्रीलंका दौऱ्यानंतर Ajit Agarkar ची खुर्ची जाणार? BCCI घेणार भवितव्याचा निर्णय; रोहित शर्मा वादाचीही होणार चर्चा?
1

श्रीलंका दौऱ्यानंतर Ajit Agarkar ची खुर्ची जाणार? BCCI घेणार भवितव्याचा निर्णय; रोहित शर्मा वादाचीही होणार चर्चा?

Live सामन्यादरम्यान गर्लफ्रेंडला केला मेसेज अन् बसला लाखोंचा फटका; तमिळनाडूच्या क्रिकेटपटूवर BCCIची कारवाई, नेमकं काय घडलं?
2

Live सामन्यादरम्यान गर्लफ्रेंडला केला मेसेज अन् बसला लाखोंचा फटका; तमिळनाडूच्या क्रिकेटपटूवर BCCIची कारवाई, नेमकं काय घडलं?

IND vs SL 1st Test: लंका पेटवण्यासाठी टीम इंडिया सज्ज! शुभमन गिलची खरी कसोटी; किती वाजता सुरू होणार सामना?
3

IND vs SL 1st Test: लंका पेटवण्यासाठी टीम इंडिया सज्ज! शुभमन गिलची खरी कसोटी; किती वाजता सुरू होणार सामना?

IND vs AFG: भारत-अफगाणिस्तान मालिकेआधी मोठी अपडेट! T20 च्या वेळापत्रकात बदल? कधी अन् कुठे पाहता येणार सामने?
4

IND vs AFG: भारत-अफगाणिस्तान मालिकेआधी मोठी अपडेट! T20 च्या वेळापत्रकात बदल? कधी अन् कुठे पाहता येणार सामने?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.